आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Monday, January 23, 2012

शिवरायांबद्दल गौरवोद्गार

नमस्कार मित्रहो,

शिवरायांच्या किर्तीबद्दल अनंत व्यक्तींनी स्तुती केलेली आपण ऐकलीच आहे, आपल्या शिवरायांना केवळ हिंदुस्थानातीलाच नव्हे तर संपूर्ण जगभरातून अनेक महान व्यक्तींनी प्रेरणास्थान मानले आहे,

जगातील कानाकोपर्यातून शिवरायांबद्दल गौरवोद्गार ऐकायला मिळतात, त्यापैकी काही मी इथे सदर करत आहे:-



मि. अनाल्ड टायबर्न (जगविख्यात इतिहासकार) -
"छत्रपती शिवाजी महाराज्यांसारखे राजे जर आमच्या देशात होऊन गेले असते तर, त्यांच्या स्मृतींचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन नाचलो असतो."

इब्राहीम-लि-फ्रेडर (डच गव्हर्नर) -
"छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाप्रसंगी सोन्याच्या सिंहासनावर बसताच सर्व मराठ्यांनी अत्यंत प्रेमाने "छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी गर्जना केली."

मार्शल बुल्गानिन (मा. पंतप्रधान - रशिया) -

"साम्राज्यशाही विरुद्ध बंद उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजीमहाराज्यांनी रोवली."

प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड) -

"छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे."

ब्यारन कादा (जपान) -

"छत्रपती शिवाजी महाराज हे सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानवजातीचे हित केले."

अन्तिनिओ (पोर्तुगीज व्हायसराय) -

"छत्रपती शिवरायांच्या नौदलातमुळे सागरी किल्ल्यात वाढ झाली. राज्यांच्या नाविक दलाची शत्रूला भीती वाटते."

मि. मार्टिन मांडमोगरी (फ्रेंच गव्हर्नर) -

"छत्रपती शिवाजी राजे त्यांच्या गुप्तहेरांना भरपूर पगार आणि बक्षिसे देत असत. त्यांची तलवार यशासाठी आदीव तत्पर असे."

डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार) -

"स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत."


वरील काही उदाहरणे आणि इतरही अनेक अशी उदाहरणे तुम्हाला मिळतील , त्यामुळेच माझ्या या राजांचे गुणगान गाताना छाती गर्वाने फुलली नाही तर नवलच..


जय शिवराय..

No comments:

Post a Comment