आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi
Showing posts with label शिवरायांचे मावळे. Show all posts
Showing posts with label शिवरायांचे मावळे. Show all posts

Sunday, January 22, 2012

शिवरायांचे मावळे- जीवा महाला

जिवबा महाला यांच्याबद्दल न जाणणारा असा कोण आहे ज्याला माहिती नाही,

श्री शिवछत्रपतींच्या प्रमुख मावळ्यापैकी  एक असे हे जीवा महाला !!

या मावळ्याचे संपूर्ण नाव म्हणजे जिवबा महाला संकपाळ असे होय,

प्रतापगडावरील महाराजांचा पराक्रम तर सर्वश्रुतच आहे त्यामुळे मी तुम्हाला त्या पराक्रमाचे विश्लेषण  सांगण्यापेक्षा इथे प्रेषित असलेल्या जिवबा महाला यांच्याबद्दल सभासद बखरीत असलेले प्रतापगडाच्या  लढाईचे वर्णन आणि जिवबा महाला यांचा पराक्रम सांगत अर्थात देत आहे :-



"छत्रपतींनी उजवे हातचे बिचव्याचा मारा चालवून खानची चरबी बाहेर काढली व चौथरीयाखाले उडी घालोन निघोन गेले..
इतक्यात सैदबंडा पटाईत धावला, त्याने राजे जवळ केले, पट्ट्याचे वार राजियावरी चालविले. तो राजियाने जिऊ महालिया जवळील आपला हुद्दीयाचा पट्टा घेऊन, पट्टा व विचवा असे कातर करून सैदबंडा याचे चार वार ओढले.

पांचवे हाताने राजियास मारांवे तो इतकीयात जिऊ महाला याने फिरंगेने खांद्यावरी सैद्बंडीयास वार केला.

तो पट्टीयाचा हात हत्यार समेत तोडीला आणि खानाचे शीर घेऊन राजे सिताब गडावरी जिऊ महाला व संभाजी कावजी महालदार असे गेले."


आणि याच प्रतापगडावरील पराक्रमामुळे "होता जीवा म्हणून वाचला शिवा" अशी उक्ती प्रचलित झाली.

अश्या या पराक्रमी जिवबा महाला यांचे पुढे सन १७०९ मध्ये निधन झाले आणि त्यांची समाधी रोहीडा किल्यावर बांधण्यात आली....

अशा या पराक्रमी शिवरायांच्या मावळ्याला त्रिवार मानाचा मुजरा..


धन्य ते शिवराय आणि धन्य ते शिवरायांचे मावळे..

वेडात मराठे वीर दौडले सात


वेडात मराठे वीर दौडले सात.....

त्या सात योद्धांची नावे....

१) विसाजी बल्लाळ.
२) दीपोजी राउतराव.
३) विट्ठल पिलाजी अत्रे.
४) कृष्णाजी भास्कर.
५) सिद्धि हिलाल.
६) विठोजी शिंदे
७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर


त्याने रयतेवर अन्याय करणे चालू केले. महाराजांनी त्यास धुळीस मिळवण्याचा आदेश प्रतापरावांना दिला.

मराठ्यांच्या गनिमी काव्याने बहलोलखान जेरीस आला. वेळ प्रसंग पाहुन तो मरठयांना शरण आला आला. आता शरण आलेल्याला मारु नये असा हिंदु धर्म सांगतो; त्यामुळे त्या तत्वनीष्ठ मराठ्याने त्याला धर्मवाट दिली, व तो गनीम जिव वाचवून गेला.

पण नंतर दगाबाज बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालुन आला. आणि शिवरायांनी रयतेला त्रास देणारा बहलोलखानास सोडल्या बद्दल प्रतापरावांचि पत्र पाठऊन कानऊघडणी केली. त्या पत्रात एक वाक्य होत जे प्रतापरावांच्या जिवास लागल.
शिवरायांनी म्हटल होत की "बहलोलखानास पकडल्या शिवाय मला तोंड दाखवु नये".

हे वाक्य वाचुन त्यांनी आपल्या सहा सहकरयांकडे नजर टाकली आणी त्यांनी आपापले भाले सरसावले.त्या सात जणांनी मरणाला समोरा समोर ट्क्कर दीली.

Friday, December 23, 2011

शिवरायांचा मावळा

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामधील प्रत्येक मावळ्याचे भाग्य किती थोर !!

पुण्यवंत, नीतिवंत, कीर्तिवंत, शीलवंत शिवरायांचे दर्शन त्यांना झाले , शिवरायांच्या स्वराज्यासाठी प्रत्येक मावळा आणि त्याची तळपती तलवार नेहमीच शत्रूच्या
प्राणासाठी आसुसलेली होती,  शिवरायांचा शब्द काहीही झाले तरी कोणत्याही मावळ्याने खाली पडू दिला नाही,

एक ना अनेक असे मावळे होते कि ज्यांनी स्वताच्या कुटुंबाचा कधीही विचार केला नाही कारण सर्वांना खात्री होती कि शिवराय हे एकच भूषण आहे , अनेक बखरीमधील मावळ्यांचे शिवछत्रपती शिवरायांच्या बाबतीतील संभाषण याचा प्रत्यय देते..

कधी जीवाची पर्वा नाही, उन्हातान्हाची पर्वा नाही, खायची भिस्त नाही.... फक्त एकच ध्येय शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न..

तुम्हा सर्वांसाठी शिवकालीन मराठा मावळ्याचे रेखाचित्र इथे देत आहे..





धन्य ते मावळे आणि धन्य तो सह्याद्री ज्यांना शिवरायांचा सहवास लाभला..  नशिबाला कधीकधी उगाच दोष द्यावासा वाटतो कि शिवरायांचा मावळा म्हणून जन्म का नाही दिला.. ??


दिनेश सूर्यवंशी, तुळजापूर

Wednesday, December 21, 2011

काळ मागे फिरावा

काळ मागे फिरावा

जन्म फिरून शिवराज्यात व्हावा आणि संधी मिळावी मदत करण्यास..
१६ व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेणाऱ्या बाल शिवबाला साथ
देण्यार्या मर्द मावळ्यांना.

काळ मागे फिरावा

जन्म फिरून शिवराज्यात व्हावा आणि संधी मिळावी मदत करण्यास..
शेल्याची ढाल करून सिंहगडावर प्राणपणे लढणाऱ्या नरवीर
तानाजी मालुसरेंना .

काळ मागे फिरावा
जन्म फिरून शिवराज्यात व्हावा आणि संधी मिळावी मदत करण्यास..
पुरंदरावर शीर तुटले तरी तलवार चालवणाऱ्या मुरारबाजीना .

काळ मागे फिरावा
जन्म फिरून शिवराज्यात व्हावा आणि संधी मिळावी मदत करण्यास..
,प्रतापगडावर भास्कराचा दांडपट्टा स्वताच्या छातीवर घेउन
छत्रपतींचे प्राण वाचवणाऱ्या जीव महालाना .

काळ मागे फिरावा
जन्म फिरून शिवराज्यात व्हावा आणि संधी मिळावी मदत करण्यास..
घोट खिंडीत छत्रपतीसाठी प्राणांची आहुती दिलेल्या बाजीप्रभू
शिवा काशिद व बांदल सरदाराना.

काळ मागे फिरावा
जन्म फिरून शिवराज्यात व्हावा आणि संधी मिळावी मदत करण्यास..
औरंग्या च्या क़ैदित छत्रपतीनचे रक्षण करणाऱ्या फिरोजी फर्जंद व
मदारी मेहतर ना

काळ मागे फिरावा
जन्म फिरून शिवराज्यात व्हावा आणि संधी मिळावी मदत करण्यास..
छत्रपतीनच् या शब्दाखातर नेसरीत लाखो बल्लोल खान सैन्यावर
आवघ्या ६ वीरांसोबत तुटून पडलेल्या प्रतापराव गुज्जरांना

काळ मागे फिरावा
जन्म फिरून शिवराज्यात व्हावा आणि संधी मिळावी मदत करण्यास..
औरंग्याला महाराष्ट्रात सळो कि पळो व पाण्यात
हि दिसणाऱ्या संताजी जाधव व धनाजी घोर्पडेना .

खरच मला शिवराज्यात परत जन्म देशील का रे देवा ? हीच माझी इच्छा..
आम्हाला पुन्हा स्वामिभक्त , देशभक्ती , स्वराज्याभक्ती चे पाठ
शिकवाल हो ?
खरच मला शिवराज्यात परत जन्म देशील का रे देवा ? हीच माझी इच्छा..
वाट चुकलेल्या मराठ्यांच्यात पुंन्हा स्वराज्याची व स्वाभिमानाची क्रांती मशाल पेट्वाल का हो ?

दिनेश सूर्यवंशी, तुळजापूर

Monday, December 19, 2011

रामसेजची झुंझ


किल्ले रामसेज ! नाशिकपासून अवघ्या १४ किमी अंतरावर हा किल्ला आहे. हिंदवी स्वराज्य गिळण्यासाठी दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाने शहबुद्दीखान या नामवंत सरदाराची रामसेज च्या मोहिमेवर रवानगी केली. आणि रामसेज वेढ्यात अडकला. शहाबुद्दीखान सोबत शुभकर्ण बुंदेला - रतनसिंह हे पितापुत्र, दलपत बुंदेला हे कसलेले सरदार होते. तर रामसेजच्या किल्लेदाराची शिबंदी होती केवळ ५०० मराठ्यांची !
      संख्येने कमी असले तरी या मुठभर मर्द मावळ्यांनी शहबुद्दीखान आणि त्याच्या सगळ्या सरदारांना सळो कि पळो करून सोडले. किल्ल्याला सुरुंग लावणे. मोर्चे बंडाने असे अनेक उपाय करूनही रामसेज दाद देईना तेव्हा खानाने लाकडी धाम्धामे (बुरुज) उभे करून त्यावरून किल्ल्यावर गोळ्यांचा मारा सुरु केला. पण मराठ्यांनी शहाबुद्दीन खानाचे सगळे मनसुबे मराठ्यांनी उधळून लावले. किल्ल्यावरचे मराठे शरण येत नाहीत हे कळताच औरंजेबाने कासिमखानाला शहाबुद्दीन खानाच्या दिमतीला पाठवले.
      किल्ल्यावरची अल्प शिबंदी एवढ्या मोठ्या फौजेच्या वेढ्याला किती काळ टक्कर देणार ? शहबुद्दीनखानाचा वेध मोडून काढण्यासाठी शंभूराजांनी मानाजी मोरे व रुपाजी भोसले यांना पाठवले. शहाबुद्दीन खानाच्या तोफा गडाच्या बुरुजावरील दरवाजावर एकसारख्या आग ओकू लागल्या. भिंत कोसळली आणि अनेक सैनिक जखमी झाले. वेढा उठवण्यासाठी रुपाजी भोसले राम्सेज्च्या पायथ्याशी येऊन मोगलांना भिडले. घनघोर युद्धाला तोंड फुटले. करणसिंह या मोगली सरदारावर त्वेषाने तुटून पडलेले रुपाजी भोसले तलवार गाजवताना स्वतः जखमी झाले.
     इरेला पेटलेला खान आता निर्णायक विजय मिळवण्यासाठी किल्ल्याच्या दरवाजाला भिडला. त्याने मोर्चे लावले आणि लाकडी धमधमा (बुरुज) उभा करून तो किल्ल्यातील मराठ्यांवर एकसारखा गोळ्यांचा मारा करू लागला. इतक्यात वेढा फोडण्यासाठी मराठ्यांची ताज्या दमाची नवी कुमुक आली आणि त्यांनी मोगलांवर एकच हल्ला केला. किल्ल्यात येऊन घुसलेल्या चारही सैनिकांना मराठ्यांनी कापून काढले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे खानची प्रचंड मोठी हानी झाली आणि गुडघे टेकून त्याने माघार घेतली.
     संतापलेल्या औरंजेबाने शहाबुद्दीन खानाला माघारी बोलवून त्याजागी बहादुरखानाची नेमणूक केली. १५,००० फौजेनिशी बहादुरखानाने रामसेजला विळखा घातला होता. मराठे आणि मोगल एकमेकांचे हल्ले चुकवून आपल्या सैनिकांना रसद पुरवत होते. शरीफखान नावाचा मोगली अधिकारी बहादुरखानाला रसद पुरवण्यासाठी निघाला होता. सात हजार मराठे एकाचवेळी त्यावर तुटून पडले आणि त्यांनी जाहीरखान फैजुल्लाखान अशा अनेक सरदारांना कापून काढले. मोगलांची जबरदस्त पिछेहाट झाली.            
मराठ्यांच्या शौर्याला कोणतीही माया लागू होत नाही हे पाहून बहादूर खानाने एक योजना आखली. एका बाजूने लढाईची तयारी चालू आहे असे दाखवायचे. किल्ल्याच्या या बाजूला दारुगोळा, तोफखाना आणि मोगल सैन्याची हालचाल दाखवून मराठ्यांच्या डोळ्यात धूळ फेकायची आणि दुसऱ्या बाजूने कोणतीही चाहूल लागू न देता निवडक सैन्याने गडावर चढायचे असा बेत आखला. सावध असलेल्या रामसेजच्या किल्लेदाराने बहादुरखानाचा हा डाव  अचूक ओळखला.
ज्या बाजूने मोगल किल्ल्यावर हल्ला चढवायचे भासवत होते तिथे मराठा किल्लेदाराने नगरे - नौबती कर्णे अशा रणवाद्यांचा कल्लोळ सुरु केला. किल्ल्यावरून खाली दगडांचा मारा सुरु झाला. तेलाने पेटवून माखलेले कपडे पेटवून खाली फेकण्यात येवू लागले. आणि दुसरीकडे बहादूर खानाचे सैन्य ज्या बाजूने वर चढणार त्या ठिकाणी सशस्त्र मावले दबा धरून बसले.                                        बहादूर खानाचे बेसावध मोगली सैनिक गडावर पाय ठेवतात न ठेवतात तोच ते मराठ्यांच्या तलवारीचे बळी ठरले. मोगली सैनिकांच्या किंकाळ्या आसमंतात दुमदुमल्या आणि वरून कोसळणाऱ्या सैनिकांमुळे खालून वर चढणारे हि थेट खाली आपटले. किल्लेदाराने बहादूर खानची चांगलीच फजिती केली.
बहादूर खानाचा मोतद्दार हा एक मांत्रिक होता. या मांत्रिकाने "भूतांना वश केल्याशिवाय किल्ला जिंकता येणार नाही." असा सल्ला दिला. या कामात आपण पटाईत असून १०० तोळे वजनाचा एक सोन्याचा साप बनवून दिलात तर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत सुरक्षित नेवून सैन्याला सोडू असे म्हणून त्याने खानास पटवले.
ठरलेल्या वेळी हा साप हातात घेवून मोतद्दार पुढे निघाला. अर्ध्या वाटेत आल आणि इतक्यात किल्ल्यावरून गोफणीने फेकलेला गोळा त्याच्या छातीत घुसला अन तो धाडकन कोसळला !
आत मात्र बहादूर खानाने वेढा उठवण्याची तयारी सुरु केली, बादशहाच्या हुकुमानुसार खाली मान घालून तो परत फिरला. किल्ल्यावर मोर्चे बांधण्यासाठी व चढाई करण्यासाठी त्याने प्रचंड लाकडे साठवली होती. ती सगळी लाकडे त्याने परत जाताना पेटवली. औरंग्याच्या स्वप्नाची त्या होळीत राखरांगोळी होत असताना रामसेजच्या तटावर नगरे आणि चौघडे झडत होते आणि किल्ल्यावर मराठे विजयोत्सव साजरा करत होते !
पण बादशहाची हौस अजून फिटली नव्हती म्हणूनच त्याने कासीमखान किरमाणी या सरदाराची या वेढ्यासाठी नियुक्ती केली. पण तरीही रामसेज झुकला नाही. मराठ्यांच्या तळपत्या तलवारीचे चटके कासीम खानाला सहन झाले नाहीत. सगळे वर झेलून आणि सगळे हल्ले परतवून रामसेजच्या बालेकिल्ल्यावर भगवा जरीपटका अजूनही डौलाने फडकतच होता ! रामसेजचा तो किल्लेदार म्हणजे मूर्तिमंत शौर्याचा धगधगता आविष्कार ! त्या नररत्नाच नाव दुर्दैवाने आजही इतिहासाला माहित नाही ! त्याच्या विलक्षण धैर्याचा आणि अतुलनीय शौर्याचा मनाचा पोशाख, रत्नजडित कडे आणि रोख रकमेचा पुरस्कार देवून म्हणून त्याची नियुक्ती दुसऱ्या एका प्रमुख किल्ल्यावर केली आणि रामसेज वर दुसरा किल्लेदार नेमण्यात आला.
पूर्वी मोगलाईत असलेल्या रामसेज पुन्हा जिंकायचा हि औरंगजेबाची महत्त्वकांक्षा धुळीला मिळाली. नामवंत मातब्बर सरदार, प्रचंड मोठी फौज, दारुगोळा आणि खजिना ओतूनही रामसेज सारखा एक सामान्य डोंगरी किल्ला अजूनही जिंकता येत नव्हता. किल्ल्यासाठी पुरवलेल्या दारूगोळ्याची  आणि सगळ्या खर्चाची चौकशी करण्याचे आदेश बादशाहने आपल्या अधिकाऱ्यांना दिले.
कदाचित रामसेज हा मोगलाईच्या अंतापर्यंत असाच राहिला असता. अढळ आणि अजिंक्य ! पण मुल्हेरचा किल्लेदार नेकनामखान नवीन किल्लेदाराला फितवले ! आणि दुर्दैव.. ! अनेक सरदारांना पाच वर्ष झुंजून जे साध्य झाले नाही ते लाच देऊन लगेच साध्य झाले ! केवळ फितुरीमुळे गड मोगलांना मिळाला !
एका सामान्य मैदानी किल्ल्याने मोगलांना एक न दोन तब्बल पाच वर्ष अहोरात्र झुंजवले ! एका मैदानी किल्ल्याने मोगलाची हि दयनीय अवस्था केली तर मग सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेले स्वराज्यतले दुर्गम किल्ले कसे काय जिंकणार या एकाच विचाराने औरंगजेबाची झोप पार उडाली ! कधी संताप तर कधी भीतीने त्याचा उभा देह थरथरू लागला ! अस्वस्थ होवून तो एकसारखा येरझाऱ्या घालू लागला !
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मराठ्याच भगवं वादळ घोंघावत होत ! टीचभर वाटणार हिंदवी स्वराज्य आज गर्वाने छाती फुगवून ताठ मानेन उंच उभ होत आणि अवघ्या हिंदुस्थानचा शेहनशहा होण्याची इच्छा मनी बाळगणारा औरंग्या संताप आणि मनस्तापाच्या खोल गर्तेत आकंठ बुडाला होता !!
राम्सेज्ची झुंझ इतिहासाच्या सोनेरी पानात ज्यांनी सुवर्णाक्षरांनी लिहिली त्या सर्व ज्ञात-अज्ञात योध्याच्या चरणी विनम्र अभिवादन !

प्रतापराव गुजर


कुड्तोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे.
एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर.
यावेळी शिवाजी महाराजांनी कुड्तोजी यांना स्वराज्याचा विचार दिला आणि कुड्तोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं.
पुढे कुड्तोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले.
बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.
मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.
शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न प्रतापरावांना दिवसरात्र सतावीत होता. जिवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.
अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.
बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिले. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. हे सात शिपायी म्हणजे प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी होते.
अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.
प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.
वेडात मराठे हे गीत पहिल्यांदा ऐकल्यावर अंगावर शहारा आला होता. हा काय प्रकार आहे याची कल्पना नव्हती. मग माग काढायला सुरवात केली. काही पुस्तके मिळवली आणि अधाश्यासारखी वाचून काढली. अनेकवर्षांपुर्वी वाचलेली ही शौर्य कथा वर दिली आहे.
प्रतापरावांसारख्या वरिष्ठ योध्याने असं वागायला नको होतं असं सर्वाचंच मत. पण प्रतापरावांची बनावट आणि शिवाजीमहाराजाचे शब्द यांचा परिपाक म्हणजे त्यांची ती कृती असावी असं मला वाटतं . महाराजांनी हरतऱ्हेने पारखून घेतलेले प्रतापराव मूर्ख असतील असं मला वाटत नाही. मुळात त्याकाळी शिवाजी महाराज होणे हा एक चमत्कार आहे असं म्हणायला अडचण वाटत नाही. एक उदाहरण घेऊया. लढाईत एकतर मारायचं किंवा मरायचं असे दोनच पर्याय मराठी शिपाई गड्याजवळ असायचे. तेथे शिवाजी महाराजांनी गनीमीकावा आणि यशस्वी माघार यांसारखे प्रकार रुजवले. येथे शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसून येते.
महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे. माघार – पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका. असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठा शिपाईगडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले प्रतापरावसुद्धा याच प्रकारातले.
पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठेच झाकोळला गेला नाही. प्रतापराव आणि त्या अनाम सहा वीरांना मानाचा मुजरा