आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Monday, January 23, 2012

शाहिरी

शाहिरी म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज.

तुणतुण्याला ताण देऊन डफावर थाप पडली की मराठी मन शहारून उठतं.
नसानसातून शूरत्वाचा वारसा सळसळू लागतो.
देदिप्यमान इतिहासाबद्दल अनन्यसाधारण अभिमान बाळगणारे मराठी मन पोवाड्यांमधील पराक‘मांच्या वर्णनाने भारावून जाते.


शाहिरी ही संकल्पना जरी अन्य भाषेतून घेतली गेली असली, तरी तिचा गाभा मात्र मराठीपणाने रसरसलेला आहे. ही कला पूर्णत्वाने महाराष्ट्राच्या जीवनाशी एकरूप झालेली आहे.
तिच्या अंतरंगातून महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांचा इतिहास उलगडत जातो. वीरांच्या गाथा मांडताना शाहिरांचा डफ जसा कडाडून उठतो, तसाच तो पळपुट्यांवर तुच्छतेनं हसतो देखील. पण त्याचं हसण किंवा त्याचं कडाडणं हे सर्वस्वी अवलंबून आहे ते मराठी माणसाच्या भावनांवर. मराठी मन जसा विचार करत असेल, तसाच पोवाडा बोलत राहतो.
मनोरंजनाची माध्यमे बदलली, समाजप्रबोधनाची साधने बदलली आणि शाहिरी कालौघात नष्ट होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. इतिहासाचा मागोवा, पराक्रमाचा जयजयकार आणि प्रबोधनातून शूर जन्माला घालणारी ही कला येत्या पिढीला घडविण्याच्या कामी येऊ शकते व त्यासाठी तिचे संगोपन व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

1 comment:

  1. शाहिरी म्हणजे शूर वीरांचे प्राथमिक हत्यारच, शाहिरी एकली कि कोणत्याही माणसाचे मन शूर होईलच, जय हिंद

    ReplyDelete