आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Friday, December 23, 2011

शिवरायांचा मावळा

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामधील प्रत्येक मावळ्याचे भाग्य किती थोर !!

पुण्यवंत, नीतिवंत, कीर्तिवंत, शीलवंत शिवरायांचे दर्शन त्यांना झाले , शिवरायांच्या स्वराज्यासाठी प्रत्येक मावळा आणि त्याची तळपती तलवार नेहमीच शत्रूच्या
प्राणासाठी आसुसलेली होती,  शिवरायांचा शब्द काहीही झाले तरी कोणत्याही मावळ्याने खाली पडू दिला नाही,

एक ना अनेक असे मावळे होते कि ज्यांनी स्वताच्या कुटुंबाचा कधीही विचार केला नाही कारण सर्वांना खात्री होती कि शिवराय हे एकच भूषण आहे , अनेक बखरीमधील मावळ्यांचे शिवछत्रपती शिवरायांच्या बाबतीतील संभाषण याचा प्रत्यय देते..

कधी जीवाची पर्वा नाही, उन्हातान्हाची पर्वा नाही, खायची भिस्त नाही.... फक्त एकच ध्येय शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न..

तुम्हा सर्वांसाठी शिवकालीन मराठा मावळ्याचे रेखाचित्र इथे देत आहे..





धन्य ते मावळे आणि धन्य तो सह्याद्री ज्यांना शिवरायांचा सहवास लाभला..  नशिबाला कधीकधी उगाच दोष द्यावासा वाटतो कि शिवरायांचा मावळा म्हणून जन्म का नाही दिला.. ??


दिनेश सूर्यवंशी, तुळजापूर

Thursday, December 22, 2011

हरिहर गड

नमस्कार मावळ्यांनो,

आपल्यापैकी काहीजणांच्या आग्रहास्तव हरिहर गडाची मी माझ्या परीने माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे,

नाशिक जिल्ह्यापासून अवघ्या २० किमी अंतरावरील हा किल्ला..
याचे नाव हरिहर गड तसेच हर्षगड असे दोन्ही आहेत.. इ.स. १६७० मध्ये मोरोपंत इंगाल्यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात जणू सुवर्णमुहूर्त रोवली..

असा हा किल्ले हरिहर..


हा किल्ला शिवरायांकडे जवळपास १४८  वर्ष ताब्यात होता.. पुढे इंग्रजांनी १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला..

हा किल्ला सर करताना तुम्हाला खरेच शिवरायांचा गड सर करण्याचा अनुभव येयील यात दुमत नाही कारण दगडी बांधकाम, बोगदे, वेडीवाकडी वळणे....तसेच काही ठिकाणी चित्तथरारक अनुभव..
मुळात हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असून हा किल्ला जवळपास समुद्रसपाटीपासून ११०० मीटर उन्चावारती आहे.. या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे हा गड चढताना असलेल्या पायऱ्या..
हा किल्ला मुळात निजामशहाकडे होता आणि शहाजीराजांनी हा किल्ला १६३६ मध्ये त्र्यंबकगड घेताना जिंकून घेतला..   

आपण जेव्हा हा किल्ला पाहण्यासाठी जाल तेव्हा तुमच्या लक्षात येयील कि मी पायऱ्यांचे वर्णन कशासाठी केलेले आहे, गडाच्या पायथ्यापासून तुम्हाला गडाच्या उत्तुंगपणाची  जाणीव होईल यात शंकाच नाही, एक  एक पायरी काळजीपूर्वक चढून गेल्यानंतर पुढे शेवटी नव्वद पायऱ्या चढल्यानंतर तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराशी पोहचल.. चढताना मात्र अतोनात काळजी घ्यावी कारण याचा मार्ग अत्यंत अरुंद असून एका वेळेस एकाच व्यक्तीला या पायऱ्या चढता येतील..
प्रवेशद्वाराच्या  शेजारीच दोन छोटे  बुरुज आहेत जे प्रवेशद्वाराची शोभा वाढवतात..
इथून पुढे जाताना आपणास प्रथम गणपतीचे तसेच नंतर मारुतीरायांची मूर्ती दिसतील त्याचे दर्शन घेताना शेजारीच असलेल्या शिवलिंगाचे आणि नंदीचे दर्शन हि आपसूकच होईल..
पुढे पायवाटेच्या उजव्या हातास ५०-६० फूट उंचीची एक टेकडी आपणास दिसते. हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा असणारी ही टेकडी आपण शेवटचा कातळटप्पा चढून पार करायची. येथे माथ्यावर पोहोचताच अगदीच छोटया सपाटीवर देवांची दाटी दिसते. या टेकडीच्या माथ्यावरून सभोवारचे दृश्य मात्र फारच छान दिसते. उत्तरेला नजर फेकताच वाघेरा तर दक्षिणेला वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनई व त्रिंगलवाडी किल्ल्याचे डोंगर फारच आकर्षक दिसतात. पूर्वेला कापडया, ब्रह्मा व त्यांच्या मागे ब्रह्मगिरीचा किल्ला उर्फ त्र्यंबकगड दिसतो.
खाली उतरून समोरील घुमटाकार माथा असलेल्या दगडी ३० फूट लांब व १२ फूट रुंद अशा या दगडी कोठीत जावे. कोठीचा   प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या  खिडकीसारखे असून या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. इतिहास काळातील ही दारूकोठाराची वास्तू गडावरील एकमेव छत शाबूत असलेली इमारत आहे. येथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फारच सुंदर दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गडफेरी व्यवस्थितरीत्या पूर्ण करण्यास दोन तास लागतात. गड पाहून परत उतरताना मात्र आपणास काळजीपूर्वक उतरावे लागते.

असा हा माझ्या नजरेतील किल्ले हरिहर, एकवेळ सवडीत सवड काढून अवश्य भेट द्यावा असा जाताना सोबत पाणी तसेच खाद्यपदार्थ नेण्यास नक्कीच विसरू नका आणि तुम्हास माझे आश्वासन कि तुम्ही खूपच आनंदित व्हाल एका विशिष्ट आकाराच्या गडाला भेट दिल्याबद्दल..
आणि हो  मावळ्यांनो भेट दिल्यानंतर माझ्या या समूहावर प्रतिक्रिया मात्र अवश्य द्या..
चला आता निरोप घेतो.. भेटू असेच एका नवीन शिवरायांच्या माहितीसोबत..
जय शिवराय..

Wednesday, December 21, 2011

काळ मागे फिरावा

काळ मागे फिरावा

जन्म फिरून शिवराज्यात व्हावा आणि संधी मिळावी मदत करण्यास..
१६ व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेणाऱ्या बाल शिवबाला साथ
देण्यार्या मर्द मावळ्यांना.

काळ मागे फिरावा

जन्म फिरून शिवराज्यात व्हावा आणि संधी मिळावी मदत करण्यास..
शेल्याची ढाल करून सिंहगडावर प्राणपणे लढणाऱ्या नरवीर
तानाजी मालुसरेंना .

काळ मागे फिरावा
जन्म फिरून शिवराज्यात व्हावा आणि संधी मिळावी मदत करण्यास..
पुरंदरावर शीर तुटले तरी तलवार चालवणाऱ्या मुरारबाजीना .

काळ मागे फिरावा
जन्म फिरून शिवराज्यात व्हावा आणि संधी मिळावी मदत करण्यास..
,प्रतापगडावर भास्कराचा दांडपट्टा स्वताच्या छातीवर घेउन
छत्रपतींचे प्राण वाचवणाऱ्या जीव महालाना .

काळ मागे फिरावा
जन्म फिरून शिवराज्यात व्हावा आणि संधी मिळावी मदत करण्यास..
घोट खिंडीत छत्रपतीसाठी प्राणांची आहुती दिलेल्या बाजीप्रभू
शिवा काशिद व बांदल सरदाराना.

काळ मागे फिरावा
जन्म फिरून शिवराज्यात व्हावा आणि संधी मिळावी मदत करण्यास..
औरंग्या च्या क़ैदित छत्रपतीनचे रक्षण करणाऱ्या फिरोजी फर्जंद व
मदारी मेहतर ना

काळ मागे फिरावा
जन्म फिरून शिवराज्यात व्हावा आणि संधी मिळावी मदत करण्यास..
छत्रपतीनच् या शब्दाखातर नेसरीत लाखो बल्लोल खान सैन्यावर
आवघ्या ६ वीरांसोबत तुटून पडलेल्या प्रतापराव गुज्जरांना

काळ मागे फिरावा
जन्म फिरून शिवराज्यात व्हावा आणि संधी मिळावी मदत करण्यास..
औरंग्याला महाराष्ट्रात सळो कि पळो व पाण्यात
हि दिसणाऱ्या संताजी जाधव व धनाजी घोर्पडेना .

खरच मला शिवराज्यात परत जन्म देशील का रे देवा ? हीच माझी इच्छा..
आम्हाला पुन्हा स्वामिभक्त , देशभक्ती , स्वराज्याभक्ती चे पाठ
शिकवाल हो ?
खरच मला शिवराज्यात परत जन्म देशील का रे देवा ? हीच माझी इच्छा..
वाट चुकलेल्या मराठ्यांच्यात पुंन्हा स्वराज्याची व स्वाभिमानाची क्रांती मशाल पेट्वाल का हो ?

दिनेश सूर्यवंशी, तुळजापूर

Tuesday, December 20, 2011

शिवरायांची दुर्मिळ चित्रे

नमस्कार मावळ्यांनो,
इथे मी आपल्यासाठी शिवरायांची दुर्मिळ अशी काही छायाचित्र देत आहे..
१. पहिले छायाचित्र मीर मोहम्मद नामक चित्रकाराने काढले असून ऐतिहासिक दृष्ट्या या चित्राला खूप महत्व आहे..
२.दुसरे छायाचित्र एका डच कलाकाराने  काढलेले आहे.
३.तिसरे छायाचित्र शिवकालीन आहे परंतु याच्या चित्रकाराचे नाव उपलब्ध नाही.
४.चवथे छायाचित्र राजा रवी वर्मा नामक भारतीयाने काढलेले आहे.
५. पाचवे छायाचित्र तर सर्वांनी पाहिलेलेच आहे कारण This is an Official painting for Government of Maharashtra and Government of India






शिवरायांचे अष्टप्रधानमंडळ

नमस्कार मावळ्यांनो,

छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली.
या समारंभ प्रसंगी शिवाजीं महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले.
छत्रपती हाच स्वराज्याचा सार्वभौम व सर्वसत्ताधारी होता. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते.

याचप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत.
राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान पद्धती पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रीपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात येत असत. या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते.

  1. पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.
  2. पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र निलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकार्‍यांकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून ते तपासून महाराजांसमोर सादर करावे लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.
  3. पंत सचिव (सुरनिस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणार्‍या येणार्‍य पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकार्‍यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
  4. मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
  5. सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
  6. पंत सुमंत (डाबीर) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या सहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
  7. न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
  8. पंडीतराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : रघुनाथराव पंडीत. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडीत, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमीत चालणार्‍या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती. व्यक्तीचे गुणदोष पाहूनच नेमणूक केली जाई. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतांनाही केवळ ते मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रीपद देण्यास महाराजांचा विरोध होता

शिवकालीन जमाखर्च प्रत

नमस्कार मावळ्यांनो,
शिवरायांच्या काळातील हिशेब पत्राची अत्यंत दुर्मिळ असलेली सत्य प्रत मी इथे त्याच्या मराठी अनुवादासकट देत आहे..  





 
शिवरायांचा मैदानी युद्धात जसा हातखंडा होता तसाच इतरही सर्व बाबतीत त्यांचा राज्यकारभार अगदी चोख होता..
त्यामुळेच " शिवराज्य पुहा नांदावे या संसारी " अशी थोरवी अनेक कवी गाताना आपणास दिसतात..  

शिवरायांचा दरारा

संशोधकांना शिवाजी महारांजांबद्दलचा संदर्भ "लंडन गॅझेट" या पत्राच्या १६७२ च्या आव्रुत्तीत सापडला हे मला काही दिवसांपूर्वी समजल्यानंतर मी त्याविषयी शोध घेत होतो आणि प्रयत्नांती फळ म्हणतात त्याप्रमाणे मला हा संदर्भ बातमीसकट मिळून आला,
मराठ्यांनी जेव्हा सुरतेवर हल्ला चढवला तेव्हा जे पत्र तत्कालीन ब्रिटीश अधिकार्याने त्याच्या वरिष्ठांना लिहिले ते अगदी तंतोतंत मी इथे देत आहे, यावरून आपल्या शिवछत्रपतींचा  त्याकाळी मुघलावरती आणि इंग्रजामध्ये असलेला दबदबा लक्षात येईल.. ओळी कमीच आहेत पत्राच्या परंतु अर्थ भलताच मोठा आहे....
ते पत्र :-
Two days since we received Letters from
India, written by the English President residing
at Suratte, who acquaints us with
the daily fears they have there, from Sevagee
the Rebel, who having beaten the
Mogul in several Battels, remains almost Master of
that Countrey

 हिंदुस्थानच्या इतिहासात अठरावे शतक हे मराठ्यांचे शतक आहे....  
शिवरायांची अभेद्य नजर कोणाही शत्रूवर पडल्यावाचून कधीही राहिली नाही,  भविष्याचा अंदाज शिवरायांनी कधीच ओळखून ठेवला होता हे आपण सर्व जाणताच, शिवछत्रपतींचे  मावळे, शिवछत्रपतींचे गनिमी युद्ध, शिवरायांचे अनुमान, शिवरायांचे ध्येय या सगळ्या गोष्टी किमान आपल्या समजण्याच्या पलीकडच्याच होत्या.. 
उपरोक्त पत्रावरून स्पष्टपणे दिसून येते कि ज्यांनी हिंदुस्थानावर इतकी वर्षे राज्य केली त्यांच्यामध्ये शिवरायांचा किती दरारा होता..


दिनेश सूर्यवंशी , तुळजापूर

Monday, December 19, 2011

रामसेजची झुंझ


किल्ले रामसेज ! नाशिकपासून अवघ्या १४ किमी अंतरावर हा किल्ला आहे. हिंदवी स्वराज्य गिळण्यासाठी दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाने शहबुद्दीखान या नामवंत सरदाराची रामसेज च्या मोहिमेवर रवानगी केली. आणि रामसेज वेढ्यात अडकला. शहाबुद्दीखान सोबत शुभकर्ण बुंदेला - रतनसिंह हे पितापुत्र, दलपत बुंदेला हे कसलेले सरदार होते. तर रामसेजच्या किल्लेदाराची शिबंदी होती केवळ ५०० मराठ्यांची !
      संख्येने कमी असले तरी या मुठभर मर्द मावळ्यांनी शहबुद्दीखान आणि त्याच्या सगळ्या सरदारांना सळो कि पळो करून सोडले. किल्ल्याला सुरुंग लावणे. मोर्चे बंडाने असे अनेक उपाय करूनही रामसेज दाद देईना तेव्हा खानाने लाकडी धाम्धामे (बुरुज) उभे करून त्यावरून किल्ल्यावर गोळ्यांचा मारा सुरु केला. पण मराठ्यांनी शहाबुद्दीन खानाचे सगळे मनसुबे मराठ्यांनी उधळून लावले. किल्ल्यावरचे मराठे शरण येत नाहीत हे कळताच औरंजेबाने कासिमखानाला शहाबुद्दीन खानाच्या दिमतीला पाठवले.
      किल्ल्यावरची अल्प शिबंदी एवढ्या मोठ्या फौजेच्या वेढ्याला किती काळ टक्कर देणार ? शहबुद्दीनखानाचा वेध मोडून काढण्यासाठी शंभूराजांनी मानाजी मोरे व रुपाजी भोसले यांना पाठवले. शहाबुद्दीन खानाच्या तोफा गडाच्या बुरुजावरील दरवाजावर एकसारख्या आग ओकू लागल्या. भिंत कोसळली आणि अनेक सैनिक जखमी झाले. वेढा उठवण्यासाठी रुपाजी भोसले राम्सेज्च्या पायथ्याशी येऊन मोगलांना भिडले. घनघोर युद्धाला तोंड फुटले. करणसिंह या मोगली सरदारावर त्वेषाने तुटून पडलेले रुपाजी भोसले तलवार गाजवताना स्वतः जखमी झाले.
     इरेला पेटलेला खान आता निर्णायक विजय मिळवण्यासाठी किल्ल्याच्या दरवाजाला भिडला. त्याने मोर्चे लावले आणि लाकडी धमधमा (बुरुज) उभा करून तो किल्ल्यातील मराठ्यांवर एकसारखा गोळ्यांचा मारा करू लागला. इतक्यात वेढा फोडण्यासाठी मराठ्यांची ताज्या दमाची नवी कुमुक आली आणि त्यांनी मोगलांवर एकच हल्ला केला. किल्ल्यात येऊन घुसलेल्या चारही सैनिकांना मराठ्यांनी कापून काढले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे खानची प्रचंड मोठी हानी झाली आणि गुडघे टेकून त्याने माघार घेतली.
     संतापलेल्या औरंजेबाने शहाबुद्दीन खानाला माघारी बोलवून त्याजागी बहादुरखानाची नेमणूक केली. १५,००० फौजेनिशी बहादुरखानाने रामसेजला विळखा घातला होता. मराठे आणि मोगल एकमेकांचे हल्ले चुकवून आपल्या सैनिकांना रसद पुरवत होते. शरीफखान नावाचा मोगली अधिकारी बहादुरखानाला रसद पुरवण्यासाठी निघाला होता. सात हजार मराठे एकाचवेळी त्यावर तुटून पडले आणि त्यांनी जाहीरखान फैजुल्लाखान अशा अनेक सरदारांना कापून काढले. मोगलांची जबरदस्त पिछेहाट झाली.            
मराठ्यांच्या शौर्याला कोणतीही माया लागू होत नाही हे पाहून बहादूर खानाने एक योजना आखली. एका बाजूने लढाईची तयारी चालू आहे असे दाखवायचे. किल्ल्याच्या या बाजूला दारुगोळा, तोफखाना आणि मोगल सैन्याची हालचाल दाखवून मराठ्यांच्या डोळ्यात धूळ फेकायची आणि दुसऱ्या बाजूने कोणतीही चाहूल लागू न देता निवडक सैन्याने गडावर चढायचे असा बेत आखला. सावध असलेल्या रामसेजच्या किल्लेदाराने बहादुरखानाचा हा डाव  अचूक ओळखला.
ज्या बाजूने मोगल किल्ल्यावर हल्ला चढवायचे भासवत होते तिथे मराठा किल्लेदाराने नगरे - नौबती कर्णे अशा रणवाद्यांचा कल्लोळ सुरु केला. किल्ल्यावरून खाली दगडांचा मारा सुरु झाला. तेलाने पेटवून माखलेले कपडे पेटवून खाली फेकण्यात येवू लागले. आणि दुसरीकडे बहादूर खानाचे सैन्य ज्या बाजूने वर चढणार त्या ठिकाणी सशस्त्र मावले दबा धरून बसले.                                        बहादूर खानाचे बेसावध मोगली सैनिक गडावर पाय ठेवतात न ठेवतात तोच ते मराठ्यांच्या तलवारीचे बळी ठरले. मोगली सैनिकांच्या किंकाळ्या आसमंतात दुमदुमल्या आणि वरून कोसळणाऱ्या सैनिकांमुळे खालून वर चढणारे हि थेट खाली आपटले. किल्लेदाराने बहादूर खानची चांगलीच फजिती केली.
बहादूर खानाचा मोतद्दार हा एक मांत्रिक होता. या मांत्रिकाने "भूतांना वश केल्याशिवाय किल्ला जिंकता येणार नाही." असा सल्ला दिला. या कामात आपण पटाईत असून १०० तोळे वजनाचा एक सोन्याचा साप बनवून दिलात तर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत सुरक्षित नेवून सैन्याला सोडू असे म्हणून त्याने खानास पटवले.
ठरलेल्या वेळी हा साप हातात घेवून मोतद्दार पुढे निघाला. अर्ध्या वाटेत आल आणि इतक्यात किल्ल्यावरून गोफणीने फेकलेला गोळा त्याच्या छातीत घुसला अन तो धाडकन कोसळला !
आत मात्र बहादूर खानाने वेढा उठवण्याची तयारी सुरु केली, बादशहाच्या हुकुमानुसार खाली मान घालून तो परत फिरला. किल्ल्यावर मोर्चे बांधण्यासाठी व चढाई करण्यासाठी त्याने प्रचंड लाकडे साठवली होती. ती सगळी लाकडे त्याने परत जाताना पेटवली. औरंग्याच्या स्वप्नाची त्या होळीत राखरांगोळी होत असताना रामसेजच्या तटावर नगरे आणि चौघडे झडत होते आणि किल्ल्यावर मराठे विजयोत्सव साजरा करत होते !
पण बादशहाची हौस अजून फिटली नव्हती म्हणूनच त्याने कासीमखान किरमाणी या सरदाराची या वेढ्यासाठी नियुक्ती केली. पण तरीही रामसेज झुकला नाही. मराठ्यांच्या तळपत्या तलवारीचे चटके कासीम खानाला सहन झाले नाहीत. सगळे वर झेलून आणि सगळे हल्ले परतवून रामसेजच्या बालेकिल्ल्यावर भगवा जरीपटका अजूनही डौलाने फडकतच होता ! रामसेजचा तो किल्लेदार म्हणजे मूर्तिमंत शौर्याचा धगधगता आविष्कार ! त्या नररत्नाच नाव दुर्दैवाने आजही इतिहासाला माहित नाही ! त्याच्या विलक्षण धैर्याचा आणि अतुलनीय शौर्याचा मनाचा पोशाख, रत्नजडित कडे आणि रोख रकमेचा पुरस्कार देवून म्हणून त्याची नियुक्ती दुसऱ्या एका प्रमुख किल्ल्यावर केली आणि रामसेज वर दुसरा किल्लेदार नेमण्यात आला.
पूर्वी मोगलाईत असलेल्या रामसेज पुन्हा जिंकायचा हि औरंगजेबाची महत्त्वकांक्षा धुळीला मिळाली. नामवंत मातब्बर सरदार, प्रचंड मोठी फौज, दारुगोळा आणि खजिना ओतूनही रामसेज सारखा एक सामान्य डोंगरी किल्ला अजूनही जिंकता येत नव्हता. किल्ल्यासाठी पुरवलेल्या दारूगोळ्याची  आणि सगळ्या खर्चाची चौकशी करण्याचे आदेश बादशाहने आपल्या अधिकाऱ्यांना दिले.
कदाचित रामसेज हा मोगलाईच्या अंतापर्यंत असाच राहिला असता. अढळ आणि अजिंक्य ! पण मुल्हेरचा किल्लेदार नेकनामखान नवीन किल्लेदाराला फितवले ! आणि दुर्दैव.. ! अनेक सरदारांना पाच वर्ष झुंजून जे साध्य झाले नाही ते लाच देऊन लगेच साध्य झाले ! केवळ फितुरीमुळे गड मोगलांना मिळाला !
एका सामान्य मैदानी किल्ल्याने मोगलांना एक न दोन तब्बल पाच वर्ष अहोरात्र झुंजवले ! एका मैदानी किल्ल्याने मोगलाची हि दयनीय अवस्था केली तर मग सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेले स्वराज्यतले दुर्गम किल्ले कसे काय जिंकणार या एकाच विचाराने औरंगजेबाची झोप पार उडाली ! कधी संताप तर कधी भीतीने त्याचा उभा देह थरथरू लागला ! अस्वस्थ होवून तो एकसारखा येरझाऱ्या घालू लागला !
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मराठ्याच भगवं वादळ घोंघावत होत ! टीचभर वाटणार हिंदवी स्वराज्य आज गर्वाने छाती फुगवून ताठ मानेन उंच उभ होत आणि अवघ्या हिंदुस्थानचा शेहनशहा होण्याची इच्छा मनी बाळगणारा औरंग्या संताप आणि मनस्तापाच्या खोल गर्तेत आकंठ बुडाला होता !!
राम्सेज्ची झुंझ इतिहासाच्या सोनेरी पानात ज्यांनी सुवर्णाक्षरांनी लिहिली त्या सर्व ज्ञात-अज्ञात योध्याच्या चरणी विनम्र अभिवादन !

छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यातील महत्वाच्या तारखा..

 
शंभू राजांचा जन्म                           १४ मे १६५७
सईबाईंचा मृत्यू                                 ५ सप्टेंबर १६५९
अफजलखानाचा वध                        ११ नोव्हेंबर १६५९
पुरंदरचा तह                                     १३ जून १६६५
शंभू राजे जयसिंगच्या छावणीत     १८ जून १६६५
शंभू राजांना मनसबदारी फर्मान      २२ सप्टेंबर १६६५
आग्र्या कडे प्रस्थान                           ५ मार्च १६६६
आग्र्याच्या सीमेवर                          ११ मे १६६६
आग्र्याचा दरबार                              १२ मे १६६६
महाराज नजरकैदेत                         २५ मे १६६६
सुटका                                               १७ ऑगस्ट १६६६
शंभू राजे राजगडावर                       २० नोव्हेंबर १६६६
शंभूराजे औरंगाबादेस मौअज्जम कडे निघाले ९ ऑक्टोबर १६६७
राजारामाचा जन्म                            २४ फेब्रुवारी १६७०
शंभू राजांना कारभार सोपवला         २६ जानेवारी१६७१
रामनगर जव्हार मोहिमेत                 १६७२
महाराजांचा राज्याभिषेक                   ६ जून १६७४
जिजाबाईंचे निधन                           १७ जून १६७४
शंभूराजांचे उपनयन                          ४ फेब्रुवारी १६७५
महाराजांच्या मृत्यूची अफवा डिसेंबर १६७५
गोवा, उत्तर कर्नाटक, भागानगर मोहिमा १६७५-१६७६
महाराजांचे दक्षिणेकडे प्रयाण           ऑक्टोबर १६७६
शंभूराजांचा कलशाभिषेक                 २३ मार्च १६७८
रायगडास महाराजांचे पुनरागमन     ११ मे १६७८
महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यास     १० सप्टेंबर १६७८
शंभूराजे सज्जनगडी                        २०ऑक्टोबर१६७८
दिलेरखानाकडे प्रयाण                       १३ डिसेंबर १६७८
भूपाळगडाची लढाई                           २ एप्रिल १६७९
दिलेरखानाकडून सुटका                    २२ नोव्हेंबर १६७९
विजापुराहून पन्हाळ्याकडे                  १ डिसेंबर १६७९
पितापुत्रांची भेट                                १३ जानेवारी १६८०
राजारामाचा विवाह                           १५ मार्च १६८०
शिवरायांचे निधन                             ३ एप्रिल १६८०
राजारामाचे मंचकरोहण                   २१ एप्रिल १६८०
शंभूराजे रायगडावर                         १८ जून १६८०
पुतळाबाई सती गेल्या                     २७ जून १६८०
शंभूराजांचे मंचकरोहण                    २० जुलै १६८०
मोरोपंतांचा मृत्यू                            ऑक्टोबर १६८०
शंभूराजांचा राज्याभिषेक                 १६ जानेवारी १६८१
औरंगाबाद, जालना, मेहेकरवरील हल्ले मे १६८१
अकबराचे आगमन                           १ जून १६८१
रायगडावरील कठोर शासन            ऑगस्ट १६८१
सोयराबाईचे निधन                        २७ ऑक्टोबर१६८१
अकबराची भेट                               १३ नोव्हेंबर १६८१
मराठ्यांची फौज अहमदनगरावर नोव्हेंबर १६८१
दंडाराजपुरीस वेढा                          एप्रिल १६८२
रामसेजचा वेढा                              एप्रिल १६८२
कल्याण - भिवंडीची लढाई              मे १६८२
येसूबाईना पुत्र झाला                     १८ मे १६८२
म्हैसूरकरांशी युद्ध                           जून १६८२
बादशहाची प्रतिज्ञा                         ३० जुलै १६८२
रामसिंगला संस्कृत पत्र                 १६८३
टीटवाळ्याची लढाई                       मार्च १६८३
तारापूरावर हल्ला                         १५ एप्रिल १६८३
चौलला वेढा                                 ऑगस्ट १६८३
रुहुल्लाखान परतला                     एप्रिल १६८३
मोअज्जमची दक्षिणकोकणात रवानगी   १३ सप्टेंबर १६८३
दिलेरखानाची आत्महत्या                         २० सप्टेंबर  १६८३ 
पोर्तुगीजांचा कोकणातील प्रभाव              ऑक्ट-नोव्हें १६८३
फोंड्याची लढाई सुरु                    १  नोव्हेंबर  १६८३
शंभूराजे फोंड्यात घुसले              १० नोव्हेंबर  १६८३
विजरेई आल्व्हारो  पळाला           ११ नोव्हेंबर  १६८३
जुवे बेत जिंकले                         २४ नोव्हेंबर १६८३
साष्टबारदेशावर चढाई                 ११ डिसेंबर   १६८३
मोअज्जमची फटफजिती             फेब्रुवारी १६८४
रायगडावरील फितुरांना अटक    ३० ऑक्टोंबर१६८४
शहाबुद्दीनचा पराभव                   १४ जानेवारी १६८५
धरणगाव लुटले                          फेब्रुवारी १६८५
विजापूर मदतीसाठी मराठी फौजा रवाना      मार्च १६८५
मोगलांचा विजापूरला वेढा           एप्रिल १६८५
मराठ्यांची भडोचकडे मोहीम        डिसेंबर १६८५
शहाजाद्याकडून माद्दंना  आकान्नाचा खून     १६ मार्च १६८६
मोअज्जमला बादशहाने कैद केले   २१ फेब्रुवारी १६८७
अकबर इराणकडे गेला                फेब्रुवारी १६८७
कुतुबाशाहीचा पाडाव                  २२ सप्टेंबर १६८७
वाईच्या लढाईत हंबीरराव ठार   ऑक्टोंबर १६८७
कवी कलशवर गणोजीचा  हल्ला               ऑक्टोंबर १६८८
शंभूराजांना संगमेश्वरी अटक      ३ फेब्रुवारी १६७९
कैद शंभूराजे बहादुरगडाजवळ      १५ फेब्रुवारी १६७९
शंभूराजांची धिंड                          १५ फेब्रुवारी १६७९
बादशहापुढे हजर                         १५ फेब्रुवारी १६७९
कवी कलश व शंभूराजे यांच्या जीभ व डोळे काढले  १७ फेब्रुवारी १६७९
मोघली छावणी भीमातीरी आली ३ मार्च १६८९
कवी कलश व शंभूराजे यांचा अत्यंत निर्दयी वध  ११ मार्च १६८९
 

संभाजी राजांची दुर्मिळ पत्र संग्रह

संभाजी राजांची दुर्मिळ पत्र संग्रह खास इतिहास प्रेमींसाठी..














येरमाळ्याची येडेश्वरी देवी


कळंब तालुक्याती येरमाळा हे गाव मुख्य राज्यमहामार्गावर येत असून बालाघाटाच्या कुशील वसले आहे. येथील श्री येडेश्वर देवी जागृत देवस्थान असून महाराष्ट्रासह इतर राज्यातील भक्तगणांचा मोठा जनसागर नारळी पौर्णिमा आणि नवरात्रात याठिकाणी हजेरी लावतो.
हे मंदिर गावच्या दक्षिण बाजूस ३०० ते ४०० फूट बालाघाटाच्या पर्वतीय रांगेत डोंगर माथ्यावर असून या मंदिरात जाण्यासाठी भक्तमंडळींना ४०० ते ४५० पाय-या चढून वर गेल्यानंतरच पुरातन कालीन हेमाडपंथी बांधकाम करण्यात आलेल्या मंदिराच्या आतमध्ये तीन-चार फूट व्यास असलेली यावर शेंदूर लेपून केलेल्या आणि डोक्यावर मुकूट, नाकात नथ, गळ्यात माळ अशा अलंकाराने नटविलेल्या श्री देवी येडेश्वरी तांदळ्याचे भाविकांना दर्शन होते.
देवीसमोर पुत्र परशुरामाची चांदीची मूर्ती आहे. मदिराच्या बाहेरील आवारात देवी मातंगी, हवन होम, श्री गणेश, श्री दत्त, महादेव आणि काळभैरवनाथांचे छोटी मंदिरे आहेत. मंदिरात पाच डिकमल आणि मंदिराच्या मागील डोंगरावर तुळजाभवानी मातेचे मंदिर व एक डिकमल आहे.
या ठिकणी देवीचे स्नानगृह असून देवी येडेश्वरी पार्वतीचे रुप असून रेणुका, अंबा, जगदंबा, तुकाई अशा अनेक नावाने प्रसिध्द असलेल्या असंख्य भक्तांचे देवस्थान म्हणजेच ग्रामीण भागातील येडाई होय. परंतु या देवीच्या कोनाशिला स्थापनेबाबत पुरातत्त्व खात्याकडे कोणतीही नोंद नाही. या देवीबाबात अख्यायिका सांगितली जाते.
एकदा प्रभू राम सितेच्या शोधात या भागात भटकंती करीत असताना देवी पार्वतीने विश्रांतीसाठी थांबलेल्या रामाची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप धारण करुन येताच रामाने ‘तुकाई तू तर माझी सीता नसून माझी व्याकुळता पाहून सितेचे रुप धारण केलेली तू तू माझी वेडी आई (वेडाई) आहेस’ असे म्हटले. यामुळे देवीस वेडाई या नावाने ओळखले जाते.
आबाजी पाटलांचे कुलदैवत माहूर गडची रेणुका देवी असल्याने त्यांना त्याठिकाणी देवीला वारंवार जाणे शक्य होत नसल्यामुळे त्यांनी येरमाळा येथे डोंगरावरच माहूरगडाप्रमाणे देवीचे हुबेहुब मंदिर बांधले. श्री येडेश्वरी देवीच्या तांदळा माहूरच्या रेणुका देवी प्रमाणेच असून येथील एकमुखी दत्तमंदिर आणि कल्लोळ याचे पुरावे म्हणून भक्तांना पाहवयास मिळतात. चालत आलेल्या परंपरेनुसार आजही नवरात्रामध्ये देवीला भल्यापहाटे पाच दिवस भक्तगण खेटे प्रदक्षिणा पाठीमागे न पाहता घालतात. आजही खेटे घालताना थुंकणे, पाठीमागे पाहणे अनिवार्य मानले जाते. यावेळीच भाविक पांढरा दोरा वाहून डोंगराभोवताली देवीच्या पायथ्यापासून नवसाचे साकडे घालतात. नवमीच्या दिवशी देवीला पहाटे अजाबळी देण्याची प्रथा रुढ झाली असून नवमीच्या पहाटे होमहवन तर अश्विन शुध्द दशमीस सिमोल्लंघन केले जाते. येथील देवी राज्यासह इतर राज्यातही प्रसिध्द असून भाविक, लोकप्रतिनधी यांच्या निधीतून सभामंडप, पाय-या कठडे आदी उभे करण्यात आले असून श्री देवी येडेश्वरी देवथान ट्रस्ट येरमाळ (ता. कळंब) यांच्या माध्यमातून भक्तांच्या सोयीसुविधांसाठी आणि त्यांना रांगेतच उभे राहवे लागते यासाठी उड्डाण पुलाची व्यवस्था आणि त्यावरील निवारा करण्यात आला आाहे. मलाकूर येथील पाझर तलावातून पाईपलाईन करून ती उपळाई येथील शेतक-यांच्या विहिरीत पाण्याची साठवण करून मंदिरात आणि मंदिर परिसरात कामयस्वरूपी पाणीपुरवठा करण्यात आला आहे. भाविकांसाठी शौचालय व्यवस्था, मंदिरासह परिसरात प्रकाश व्यवस्थाही केली आहे.
ट्रस्टच्यावतीने प्रसाद केंद्र चालविले जात असून, तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासठी जाण्यासाठी देवी ट्रस्टच्या माध्यमातून सिमेंट रस्ता व प्रकाश योजना राबविण्यात आली आहे.

शिवरायांच्या मंदिराची निमंत्रणपत्रिका..

नाव तर छापले आहे संग्रहालय पण मित्रहो वस्तुस्थिती मात्र वेगळीच

प्रतापराव गुजर


कुड्तोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे.
एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर.
यावेळी शिवाजी महाराजांनी कुड्तोजी यांना स्वराज्याचा विचार दिला आणि कुड्तोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं.
पुढे कुड्तोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले.
बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.
मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.
शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न प्रतापरावांना दिवसरात्र सतावीत होता. जिवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.
अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.
बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिले. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. हे सात शिपायी म्हणजे प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी होते.
अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.
प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.
वेडात मराठे हे गीत पहिल्यांदा ऐकल्यावर अंगावर शहारा आला होता. हा काय प्रकार आहे याची कल्पना नव्हती. मग माग काढायला सुरवात केली. काही पुस्तके मिळवली आणि अधाश्यासारखी वाचून काढली. अनेकवर्षांपुर्वी वाचलेली ही शौर्य कथा वर दिली आहे.
प्रतापरावांसारख्या वरिष्ठ योध्याने असं वागायला नको होतं असं सर्वाचंच मत. पण प्रतापरावांची बनावट आणि शिवाजीमहाराजाचे शब्द यांचा परिपाक म्हणजे त्यांची ती कृती असावी असं मला वाटतं . महाराजांनी हरतऱ्हेने पारखून घेतलेले प्रतापराव मूर्ख असतील असं मला वाटत नाही. मुळात त्याकाळी शिवाजी महाराज होणे हा एक चमत्कार आहे असं म्हणायला अडचण वाटत नाही. एक उदाहरण घेऊया. लढाईत एकतर मारायचं किंवा मरायचं असे दोनच पर्याय मराठी शिपाई गड्याजवळ असायचे. तेथे शिवाजी महाराजांनी गनीमीकावा आणि यशस्वी माघार यांसारखे प्रकार रुजवले. येथे शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसून येते.
महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे. माघार – पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका. असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठा शिपाईगडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले प्रतापरावसुद्धा याच प्रकारातले.
पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठेच झाकोळला गेला नाही. प्रतापराव आणि त्या अनाम सहा वीरांना मानाचा मुजरा

Sunday, December 18, 2011

शिवरायांचे मंदिर ??


नमस्कार मित्रहो,

गेल्या काही दिवसांपासून मनाला एक गोष्ट खूपच खटकत आहे, पण मनात ठेवल्याने बैचैन देखील होणारच म्हणून तुम्हा सर्वांसमोर मांडण्याचा अट्टाहास..

लोहगाव पुणे येथे ५ एकराच्या परिसरात फ्रेंच मधील एक गृहस्थ शिवरायांचे मंदिर उभारणीचे काम करत आहेत हि गोष्ट तुम्हाला माहितीच असेल..
...
मानवी कर्तुत्व आणि त्यांच्या स्थितीसापेक्ष परिसीमांना दैवी आधार देणे हे माझ्या मते खूप चुकीचे आहे,
छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य स्वतःच्या मनगटावर उभे केले आहे ना कि त्यांच्या मध्ये दैवी शक्ती होती ना कि ते चमत्कार करत असत.... हो ना ?
छत्रपती शिवाजी महाराज हे सह्याद्रीचे शूरवीर, आई जिजाऊ आणि शहाजी राजांचे पुत्ररत्न, कुणाही मराठी माणसाचा गर्व, समस्त महाराष्ट्राचे जनक, आपणा सर्वांचे आदर्श आहेत.. हो ना ?

मग त्यांच्या या कर्तुत्वाला दैवी आधार किंवा दैवत्व देणे कितपत योग्य आहे ?

याउलट छत्रपती शिवरायांना राष्ट्रीय महापुरुष म्हणून घोषित केले गेले पाहिजे, गांधीऐवजी हिंदुस्थानाच्या चलनावर शिवरायांना दर्शविले पाहिजे, शिवाजी राजांचा फोटो प्रत्येक कार्यालयात मानाने लावला गेला पाहिजे..

स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकर्तुत्वाने, स्वताच्या हिमतीवर आणि सह्याद्री खोर्यातील काही मावळ्यासोबत केली आहे,

छत्रपती शिवाजी राजांना आई भवानी मातेने जी तलवार दिली त्याचा इतिहास म्हणजे शिवरायांना भवानी मातेने गडावर शिवरायांना स्वप्नात साक्षात्कार दिला आहे असा आहे..

माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आपले आदर्श आणि स्वराज्यासंस्थापक वीरपुरुष मानलेलेच योग्य ठरेल आणि आपला निश्चय असावा शिवरायांच्या स्वराज्याला बळकटी देण्याचा..शिवछत्रपतींच्या मार्गावर चालण्याचा......

आज पहिले मंदिर उभारले जात आहे, काही दिवसांनी ठिकठिकाणी शिवरायांचे मंदिर उभारले जाईल,

आपल्या पुढच्या पिढीला यातून चुकीचा संदेश जाण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही कि शिवाजी महाराज एक देवच होते आणि दैवी शक्तीच्या जोरावरच त्यांनी स्वराज्यनिर्मिती केली, माझ्या लहान बुद्धीप्रमाणे असे होणे चुकीचे आहे..

महाराजांचा पराक्रम, महाराजांचे शौर्य, महाराजांचे आयुष्य आज ४०० वर्ष होत आले तरी आपणा सर्वांना नेहमीच प्रेरणादायी ठरलेले आहे तसेच आजही जेव्हा जेव्हा आपण शिवचरित्र, बखरी वाचतो तेव्हा शिवरायांच्या पराक्रमाने अंगावर काटे उभा टाकतात, रक्त सळसळते .. नाही का ?

मग अशा शौर्याचे, अशा पराक्रमाचे, अशा आदर्शाचे, अशा थोर पुत्राचे, अशा माझ्या शिवरायांचे मंदिर बांधून त्यांना देव करणे कितपत योग्य आहे ?

महाराजांचा इतिहासच दाखवायचा आहे ना.... मग मंदिर कशाला तिथे तुम्ही संग्रहालय बांधत आहातच ना मग त्यालाच अतिभव्य का नाही करता येणार ?

मला कदापि नाही पटणार कि मी माझ्या शिवरायांना भेटण्यास मंदिराची घंटी वाजवून भेटावे..

शिवरायांना भेटावे तर त्यांच्या गडावर जावूनच, त्यांच्या पराक्रमातील त्यांच्या शौर्यातील घटनातूनच....नाही का ?

शिवरायांचा धगधगता इतिहास प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात कायम सळसळत राहिला पाहिजे......

या जगाला कायम स्मृतीत राहिले पाहिजे कि शिवाजी महाराजांसारखे ना कोणी झाले ना कोणी होणार..

माझे ज्ञान काही मोठे नाही परंतु हि गोष्ट नेहमी मनाला बोचत होती आणि राहवले नाही म्हणून तुम्हा सर्व मित्रपरिवारासमोर मांडत आहे, चुकले असेल तर सांगावे..

जय भवानी.... जय शिवराय .......

दिनेश सूर्यवंशी, तुळजापूर

पानिपत


पानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल. मराठा सैन्य आपल्या आरंभीच्या यशाचा पाठपुरावा का करू शकले नाही, याचे हे लष्करी विश्लेषण! २५० वर्षे झाली तरी इतिहासातील हा धडा युद्धनीतीत महत्त्वाचा मानला जातो..
देशाच्या इतिहासात असा एखादा दिवस येतो तेव्हा काही तासांतच त्याच्या वर्तमानात आणि भविष्यामध्ये पराकोटीची उलथापालथ होते. ऑगस्ट- १९४५ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे अणुबॉम्ब टाकून अमेरिकेने बेचिराख केली, तेव्हा जपानची अशी स्थिती झाली होती. १४ जानेवारी १७६१ हे भारताच्या इतिहासातील असेच एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहे. मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिसऱ्या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता, की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी.
दुर्दैवाने त्या लढाईत मराठा सैन्याचा निर्णायक पराभव झाला. त्याचा मराठी मानसावर झालेला आघात इतका जबरदस्त आहे की, कोणत्याही असीम अपयशाला ‘पानिपत झाले’अशी उपमा दिली जाते. ही मानसिकता पुसून टाकणे आवश्यक आहे.
१४ जानेवारी १७६१ या दिवशी सकाळी आरंभ झालेल्या लढाईत मध्यान्हीपर्यंत विजयाचे पारडे मराठय़ांकडे झुकत होते; परंतु काही तासांतच फासे पलटले आणि उन्हे कलण्याच्या वेळेपर्यंत मराठा सेनेचा धुव्वा उडाला. भाऊसाहेब पेशवे आणि विश्वासराव हे सरसेनापती धारातीर्थी पडले. इब्राहिम गार्दी आणि जनकोजी शिंदे वगैरे धुरंधर शत्रूच्या हातात पडले. अनेक सेनापती आणि सरदार कामी आले. दोन्ही बाजूंचे पन्नास-साठ हजार सैनिक ठार झाले आणि लाखांवर निष्पापांची कत्तल झाली.
पानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन तीन शब्दांत करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल. मराठा सैन्य आपल्या आरंभीच्या यशाचा पाठपुरावा का करू शकले नाही, याचे हे लष्करी विश्लेषण!

युद्धविजयी घटक
प्रत्येक लढाईचे लष्करी इतिहासाच्या दृष्टिकोनातून निष्पक्ष परीक्षण होणे आवश्यक आहे. सैनिकी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात त्यांचा मोठा वाटा असतो. कोणतीही लढाई ही आधी घडलेल्या लढायांची पुनरावृत्ती असता कामा नये. युद्धातील प्रतिस्पध्र्याच्या प्रहारक्षमतेचे दोन प्रमुख घटक असतात- बल आणि बलगुणक. बल म्हणजे फौजफाटा, तोफा, घोडदळ वगैरे. बलगुणक (Force Multipliers) या लढाऊ क्षमता द्विगुणित करणाऱ्या गोष्टी.. सैन्याची लढण्याची इच्छाशक्ती, सैन्याच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता, रसदव्यवस्था, नेतृत्वाचा कस, शाठय़ आणि विस्मय या युद्धतंत्रांचा परिणामकारक वापर- हे काही बलगुणक. युद्धाचा निकाल म्हणजे दोन घटकांचे अजब आणि वैचित्र्यपूर्ण रसायन असते. त्यात भर पडते ती आणखी एका अनपेक्षित घटकाची- अतक्र्यता. कधी निसर्गातील अचानक बदल, तर कधी अगम्य घटनांमुळे युद्धाच्या यशापयशावर होणारा कल्पनातीत परिणाम. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत या घटकांचा अफलातून खेळ कोणत्याही वाचकाला अचंबित आणि मंत्रमुग्ध करून सोडतो.

लढाईपूर्व घटना
जानेवारी-१७५७ मध्ये भारतीय अफगाणी सरदार नजीब उद्दौलाच्या निमंत्रणावरून अफगाण राजा अहमदशहा अब्दालीने भारताची मोहीम हाती घेतली. त्याचा उपकर्ता नादीरशहाच्या मृत्यूनंतर त्याने सत्ता बळकावली होती. नादीरशहाबरोबर तो त्यापूर्वी भारतात आला होता. दिल्लीपर्यंत मजल मारून बारा करोड रुपयांची लूट घेऊन तो एप्रिल-१७५७ मध्ये स्वदेशी परतला. दरम्यान, राघोबादादा पेशव्यांनी जंगी फौजेसह नोव्हेंबर-१७५६ मध्ये उत्तरेकडे कूच केले. ऑगस्ट-१७५७ मध्ये दिल्लीला पोहोचेपर्यंत अब्दाली परतला होता. दिल्लीची सल्तनत पुनश्च स्थिरस्थावर करून त्यांनी १७५८ मध्ये अटकेपर्यंत भरारी मारली. त्यात नजीब उद्दौला त्यांच्या हातात सापडला, परंतु मल्हारराव होळकरांनी आपल्या या मानसपुत्राला जीवदान देण्याची गळ घालून नजीबला सोडणे भाग पाडले. ही घोडचूक ठरली.
१७५९ मध्ये मराठय़ांचे उत्तर हिंदुस्थानातील वर्चस्व आणि दिल्लीवरील भक्कम पकडीमुळे अस्वस्थ झालेल्या अब्दालीने हिंदुस्थानकडे पुनश्च मोर्चा वळवला. १० जानेवारी १७६० रोजी शुक्रतालच्या लढाईत पेशव्यांचा अग्रणी सरदार आणि उत्तर हिंदुस्थानातील प्रतिनिधी दत्ताजी शिंदे ठार झाला. अब्दालीचा बंदोबस्त करण्यासाठी मोठी फौज धाडण्याचा निर्णय नानासाहेब पेशव्यांनी घेतला. त्यानुसार त्यांचे चुलतबंधू सदाशिवराव भाऊसाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ साठ-सत्तर हजारांची फौज मार्चमध्ये उत्तरेकडे रवाना झाली. त्यात वाटेत मिळालेल्या शिंदे, होळकर यांच्या तुकडय़ाही होत्या. फौजेत चाळीस हजाराचे घोडदळ आणि इब्राहिम गार्दी या धुरंधर तोफचीच्या नेतृत्वाखाली आधुनिक २०० फ्रेंच तोफांचा तोफखाना होता. फौजेबरोबर लाख-दीड लाख बुणगे आणि चाळीस-पन्नास हजार यात्रेकरू होते. इतक्या मोठय़ा फौजेच्या दिमतीसाठी काही हजार बुणग्यांची निश्चित आवश्यकता होती; परंतु दीड लाखांची संख्या मर्यादेबाहेर होती. यात्रेकरूंचा लवाजमा तर नाहक होता. ही दोन्ही लोढणी मराठा सैन्याला प्राणघातक ठरली.
संथ चालीने ऑगस्ट-१७६० मध्ये मराठा सेना दिल्लीत पोहोचली. पंजाब-सिंधमधील चौथाई रक्कम अब्दालीने हडप केल्यामुळे भाऊंना पैशाची चणचण भासली. दिल्ली आणि आसपासचा मुलूख लुटण्याची परवानगी देण्याशिवाय त्यांना पर्याय राहिला नाही. शीख आणि जाट सरदारांना हे रुचले नाही. त्यामुळे त्यांच्या तुकडय़ा मराठा सेनेत सामील झाल्या नाहीत. बुणगे आणि यात्रेकरूंना आश्रय देण्याची तयारी मराठय़ांचा सहयोगी सरदार सूरजमलने दाखविली होती; परंतु भाऊंनी त्याला नकार दिला. या दोन्ही घटनांचे दूरगामी परिणाम मराठय़ांना भोगावे लागले.

पानिपतमधील मोर्चाबंदी
भाऊंनी सप्टेंबर-१७६० मध्ये पानिपतच्या दिशेने कूच केले. तिथे पोहोचल्यावर पश्चिमेस शहराभोवतीचा खंदक आणि पूर्वेस यमुना नदी यांच्या दरम्यान संरक्षक फळी उभी केली. १७ ऑक्टोबर रोजी पानिपतच्या उत्तरेला कुंजपुरा येथील अब्दालीच्या सैन्याच्या तुकडीवर मराठा सरदार विंचूरकरांनी यशस्वी हल्ला चढविला आणि कुंजपुरा काबीज केला. त्यावेळी पकडलेले एक हजार अफगाण सैनिक मात्र त्यांनी आपल्या शिबिरात  ठेवून घेतले आणि त्यांचा युद्धात आपल्या बाजूने वापर करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला.
मराठा सेनेची पानिपतजवळील मोर्चाबंदी आणि कुंजपुरा हातातून गेल्याने बिथरलेल्या अब्दालीने मराठय़ांच्या दक्षिणेस जाऊन त्यांची कोंडी करण्यासाठी धूर्त आणि दूरगामी डावपेच अमलात आणण्याची महत्त्वाची योजना आखली. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी यमुना ओलांडणे आवश्यक होते; परंतु अडचणींना न जुमानता त्याने २४ ते २६ ऑक्टोबर १७६० ला बाघपत येथे ते साधले आणि तेही मराठय़ांच्या नकळत. अब्दालीचे हे खंबीर पाऊल आणि तीन दिवस चालणारी ही कारवाई वेळेत शोधून न काढण्यातील मराठय़ांच्या टेहेळणीतील गफलत ही मराठा सेनेच्या अपयशाची नांदी म्हटली पाहिजे.
त्यानंतर अब्दालीने मराठय़ांच्या दक्षिणेस आपली मोर्चाबंदी केली. त्यामुळे मराठय़ांचे दक्षिणेकडून येणारे रसदमार्ग खुंटले. अब्दालीच्या सैन्याला मात्र अफगाण रोहिल्यांच्या दोआब (अंतर्वेदी) प्रदेशातून रसद मिळत राहिली. एकदा का आपल्या डावपेचाची पूर्तता झाल्यावर अब्दालीने त्याचा पद्धतशीर पाठपुरावा केला आणि वेगवेगळ्या कारवायांकरवी मराठय़ांच्या रसदेचा पूर्णपणे कोंडमारा केला. दिल्लीच्या बाजूने प्रचंड रक्कम घेऊन येणाऱ्या मराठय़ांचे उत्तरेकडील मामलतदार गोविंदपंत बुंदेल्यांची पाळत ठेवून हत्या करण्यात आली. अब्दालीच्या सैन्याचा मराठय़ांभोवतीचा विळखा अधिकाधिक आवळत गेला.  गवताच्या प्रचंड साठय़ांच्या गंजींना आग लावण्यात आली. कालव्याचे पाणी अडविण्यात आले. लाख-दोन लाखांच्या बुणगे आणि यात्रेकरूंच्या लोंढय़ामुळे अन्नपुरवठा आणखीनच क्षीण झाला. पानिपतमधील उरल्यासुरल्या नागरिकांचे अन्न हरपल्यामुळे तेही मराठय़ांविरुद्ध जाऊ लागले.
डिसेंबपर्यंत माणसे आणि जनावरे अन्नाशिवाय रोडावू लागली. पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या पराजयाचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे लढणाऱ्या सैनिकांची अक्षमता नव्हे, तर रसदीची वाण!

व्यूहरचना आणि रणनीती
दोन्ही बाजूंचे सेनाबळ बऱ्याच प्रमाणात समसमान होते. दोन्ही सेनांचे घोडदळ ४०,०००च्या घरात. दुराणी पायदळात काहीसे सरस. मराठय़ांच्या ३०-३५ हजारांसमोर अफगाणी ५०-५५ हजार, तर मराठय़ांचा तोफखाना संख्येत आणि बनावटीत दुराण्यांपेक्षा उजवा. ती कमतरता भरून काढण्यासाठी अब्दालीने उंटावरील हलक्या आणि फिरत्या अशा १००० तोफांची योजना केली होती. या तोफा कमालीच्या प्रभावी ठरल्या. अब्दालीच्या सैन्यात अफगाणिस्तानी आणि हिंदुस्थानी गिलचे सम प्रमाणात होते.
मराठा सैन्य, पश्चिमेस पानिपत खंदक आणि पूर्वेस यमुनेच्या दरम्यान पश्चिम-पूर्व सरळ रेषेत तैनात होते. पश्चिमेस होळकर व शिंद्यांच्या तुकडय़ा, मध्यभागी भाऊ आणि विश्वासरावांची शाही तुकडी आणि पूर्वेस इब्राहिम गार्दी, विंचूरकर आणि गायकवाड वगैरे तुकडय़ा. भाऊंनी राखीव अशी तुकडी मागे ठेवली नव्हती. शीख जाटांच्या अनुपस्थितीमुळे कदाचित त्यांना पायदळाची चणचण भासली असावी; परंतु हा असमर्थनीय प्रमाद होता. अब्दालीने सैन्याची रचना एका तिरकस रेषेत केली होती. अब्दालीचा हिंदुस्थानातील अफगाणी तुकडय़ांवर पूर्ण विश्वास नसावा. म्हणूनच त्याने दोन्ही कडांस अफगाणिस्तानातून आणलेल्या तुकडय़ा उभ्या केल्या होत्या. त्या हिंदुस्थानी अफगाणांवर कडी नजर ठेवण्यासाठी! त्यानुसार शहापसंद पश्चिमेस, त्यानंतर नजीब आणि शुजाउद्दौलाच्या तुकडय़ा, मध्यभागी त्याचा सेनापती शहावलीचा कणा, त्यांच्या पूर्वेस बुंदेखान, सदुल्ला या रोहिल्यांच्या तुकडय़ा आणि सर्वात पूर्वेस बरखुरदार आणि अमीरबेग यांची अफगाणी फौज. या सर्वाच्या दक्षिणेला काही अंतरावर अब्दालीच्या पंधरा हजार राखीव सैनिकांची तुकडी योग्य वेळी आणि ठिकाणी युद्धाचे पालटे फिरविण्यासाठी सज्ज होती. भाऊंसारखा अब्दाली आघाडीवर नव्हता. शहावलीवर सेनापतित्व सोपवून तो महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मागे मोक्याच्या ठिकाणी होता. राखीव तुकडीची योजना आणि अब्दालीचा आघाडीच्या रणतुंबडीपासून दुरावा हे दोन्ही युद्धविजयक घटक ठरले.
मराठा सैन्याच्या सेनापतींमध्ये रणनीतीबाबत मतभेद होते. इब्राहिम गार्दीचे मत गोलाईच्या लढाई बाजूने होते. गोलाईची लढाई म्हणजे सर्व फळ्या शाबूत ठेवून प्रथम शत्रूसैन्याला बलवत्तर तोफखान्याने भाजून काढायचे. शिंदे-होळकरांच्या मते गनिमी  काव्याला कौल होता; परंतु भाऊंनी गार्दीची सूचना स्वीकारली.

निर्णायक लढाई
अखेरीस कोंडीला आणि उपासमारीस कंटाळून १४ जानेवारीला भाऊंनी अब्दालीच्या सैन्यावर हल्ला चढविण्याचा निर्णय घेतला. सर्व संकटे आणि ओढाताणीला न जुमानता मराठय़ांनी अहमहमिकेने आणि निकराने सकाळीच लढाईला सुरुवात केली. काही गोळाफेक अब्दालीच्या आघाडीच्या तुकडय़ांपल्याड गेली तरी तोफखान्याचा मारा इतका  भयंकर होता की, पश्चिमेस रोहिल्यांच्या फळीत एक भले मोठे खिंडार पडले. त्याचबरोबर भाऊसाहेबांच्या शाही तुकडीनेही शहावलीला मागे रेटले. पूर्वेस शिंदे-होळकरांच्या तुकडय़ांना मात्र नजीबने तटवून धरले होते. बारा-एक वाजेपर्यंत मराठय़ांची सरशी स्पष्ट दिसत होती.
दुर्दैवाने तेव्हापासूनच पारडे पलटू लागले. सूर्य दक्षिणायनात असल्यामुळे भर दुपारी उत्तरेकडून दक्षिणेकडे चाल करून जाणाऱ्या घोडय़ांच्या डोळ्यांत सूर्यकिरणे पडू लागली आणि ते बुजू लागले. त्याचबरोबर उपासमारीने रोडावलेले घोडे आणि त्यांच्यावरील स्वार पार थकून गेले आणि जागीच कोसळू लागले. इब्राहिम गार्दीच्या तोफांनी पाडलेले खिंडार पाहून हल्ला करण्यास अधीर झालेले विंचूरकर आणि गायकवाड या दोघांनी इब्राहिमच्या आर्जवांना भीक न घालता अवेळी चढाई केली. बिनबंदुकीचे घोडेस्वार पाहून माघारी जाणाऱ्या रोहिल्यांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षांव केला आणि मराठी तुकडय़ा परत फिरल्या. भाऊ आणि विश्वासराव आपल्या हत्तीवरून खाली उतरून लढू लागले आणि ठार झाले. मोकळ्या अंबाऱ्या पाहून मराठा सैन्याचा धीर खचला आणि ते सैरावैरा धावू लागले. हीच संधी साधून अब्दालीने आपले ताजेतवाने राखीव सैन्य पुढे केले आणि पळणाऱ्या मराठी सैन्यावर प्राणघाती हल्ला चढवला. याचवेळी विंचूरकरांच्या शिबिरात ठेवलेल्या अफगाणांनीही उठाव केला. दुसरा कोणता पर्याय नसल्याचे पाहून होळकर आणि शिंद्यांच्या तुकडय़ांनी सापडलेल्या फटींमधून दक्षिणेकडे कूच केले.
सूर्यास्तापर्यंत मराठा सैन्याचा दारुण पराभव झाला. बाकी होती ती गिलच्यांकडून मराठी बंदी सेनेची, बुणग्यांची आणि यात्रेकरूंची निर्घृण कत्तल! तो एक केवळ काळा इतिहास!

युद्धतत्त्वांच्या निकषांवर परीक्षण
युद्धशास्त्रात युद्धाची दहा तत्त्वे (Principles of War) गठीत करण्यात आली आहेत. या निकषांवर तिसऱ्या लढाईचे परीक्षण-
उद्दिष्टाची निवड आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा (Selection and Maintenance of Aim)- याबाबतीत दोन्ही सरसेनापती अपुरे ठरले. अब्दाली आणि भाऊ या दोघांनी वारंवार तहाचा विचार केला आणि त्यामुळे दोघांच्याही युद्धशक्तीवर परिणाम झाला. याबाबतीत खरा ठरला तो नजीबद्दौला. मराठय़ांचा उत्तरेतून नायनाट करायचा, हे त्याचे उद्दिष्ट. त्यानेच जिहादची घोषणा करून अब्दालीला लढाईच्या भरीस घातले आणि आपले उद्दिष्ट तडीस नेले.
सुरक्षितता (Security)- सैन्यक्षेत्र, सैन्यदल आणि आपल्या रसद मार्गाची सुरक्षितता साधणे महत्त्वाचे आहे. यासाठी टेहळणी पथक आणि पहाऱ्याची आवश्यकता असते. मराठा सैन्याचा या बाबीतील हलगर्जीपणा त्यांना भोवला. बुणगे आणि यात्रेकरूंचे ओझे हा सुरक्षिततेला मोठा धोका ठरला.
इच्छाशक्ती टिकवणे (Maintenance of Morale)- मराठा सैन्याची लढण्याची इच्छाशक्ती दिवसागणिक क्षीण झाली होती. तरीसुद्धा सुरुवातीचा विजय हे त्यांच्या लढाऊ वृत्तीचे द्योतक आहे.
विस्मय आणि शाठय़ (Surprise and Deception)-  अब्दालीची यमुनापार चाल याबाबतीत निर्णायक ठरली. मराठय़ांची ही प्रमुख त्रुटी.
सैन्यबळाचे एकवटीकरण (Concentration of  Force)- युद्धशक्तीच्या प्रकाराचा हा सर्वात मोठा गुणक. आपली शक्ती वेगवेगळ्या जागी विभाजित करून ती खच्ची करणे, हे सेनापतीच्या अपरिपक्वतेचे दर्शक आहे. सर्व फळ्यांनी हल्ला करण्यापेक्षा एकच भगदाड पाडून बाकी सर्व ठिकाणी संरक्षणात्मक पवित्रा घेणे, हे फायदेशीर असते. मराठे याबाबतीतही कमी पडले.
सैन्यबलाचा वित्तव्यय (Economy of  Force)- अत्यंत धूर्त व्यूहरचना, मोक्याच्या ठिकाणी घणाघात आणि राखीव दलाच्या साहाय्याने हे सिद्ध होऊ शकते. मराठे हे साधू शकले नाहीत.
लवचिकता (Flexibility)- नवनव्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी युद्धयोजनेत लवचिकता हवी. शिवाजी महाराजांच्या सर्व लढाया ही याची उदाहरणे आहेत. यासाठी राखीव दलाची योजना आवश्यक आहे. भाऊंची ही एक महत्त्वाची चूक होती.
सहकार्य (Co-operation)- सैन्याच्या विविध अंगांमध्ये आणि तुकडय़ांत सहकार्याची नितांत गरज असते. मराठा सैन्यातील दुफळीने त्यांच्या क्षमतेवर दुष्परिणाम झाले.
व्यवस्थापन (Administration)- हा मराठा सैन्याचा सर्वात मोठा दोष. निर्णयकर्त्यांनी याच्याकडे पूर्णतया दुर्लक्ष केले. किंबहुना व्यवस्थापनाचा बोजडपणा आणि अनावश्यक यात्रेकरूंचे लोढणे हा मराठय़ांच्या अपयशाचा सर्वात मोठा पाईक आहे.

निर्णायक वळणे
पानिपतच्या लढाईत पाच मोक्याची वळणे नमूद करता येतील. पहिले- गरजेपेक्षा अधिक बुणगे आणि यात्रेकरू फौजेबरोबर पाठविण्याचा निर्णय आणि सूरजमलच्या प्रस्तावाला भाऊंचा नकार. दुसरे- अब्दालीचे यमुना उल्लंघन. तिसरे- नोव्हेंबरमध्येच अब्दालीवर हल्ला चढविण्याची गमावलेली संधी. चौथे- एकाच ठिकाणी प्रहार करून भगदाड पाडण्याऐवजी सैन्याची पसरण आणि पाचवे- राखीव दलाचा अब्दालीकडून वापर आणि त्याबाबतीत मराठय़ांची त्रुटी.
सदाशिवरावभाऊंच्या नेतृत्वावर बऱ्याच शंका घेतल्या जातात. अब्दाली त्यांच्यापेक्षा अधिक अनुभवी होता. भाऊ त्याआधी फक्त उदगीरची लढाईच जिंकले होते. पण तरीही अनेक अडचणींवर मात करून शत्रूवर हल्ला करण्याचा खंबीरपणा हे त्यांच्या अद्वितीय नेतृत्वाचे द्योतक आहे. ते अत्यंत शूर होते. जर मध्यान्हीनंतर नशीब फिरले नसते तर कदाचित आज एक उत्तुंग नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव झाला असता.
पानिपत ही एक भारतासाठी दिशादर्शक घटना होती. जर मराठेजिंकले असते तर ना इंग्रज बळावले असते किंवा ना हैदरअलीचा उदय झाला असता. कदाचित दिल्लीवर  मराठी झेंडा फडकला असता.
पानिपतची लढाईमुळे मराठी मानसात न्यूनगंड निर्माण न होता, तो मराठी अस्मितेचा उच्चांक ठरला पाहिजे. तो मराठी जनतेसाठी ऊर्जेचा, स्फूर्तीचा, निस्वार्थी देशभक्तीचा एक स्रोत व्हायला हवा. प्रत्यक्ष रणांगणात ठार झालेल्या अफगाणी शिपायांची संख्या कामी आलेल्या मराठय़ांच्या दीडपट होती, हा एकमेव घटक मराठा शूरत्वाची आणि ‘मोडेन पण वाकणार नाही’, या बाण्याची ग्वाही देतो.

शंभू राजे आणि कवी कुलेश

माणसाच्या आयुष्यात मित्र नाहीत असा माणूस सापडणे कठीण असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रत्तेक माणसाच्या आयुष्यात मित्र असतोच. जीवनाच्या प्रत्तेक वाटेवर एक नवीन मित्र भेटतो.तसे म्हटले तर मित्रांचे तीन प्रकार होतात.
१)सुखात सहभागी होणारे मित्र - अश्या मित्रांची संख्या माणसाच्या जीवनात फार असते. असे मित्र रोज भेटतात, पण संकटकाळी पळून जातात.असे मित्र वैयक्तिक स्वार्थी असतात.ते तुमच्याकडून आपला जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे पाहतात
२)सुख आणि दुखात सामील होणारे मित्र - काही मोजके मित्र सुखात तर सहभागी होतातच पण दुखातही साथ सोडत नाहीत, आणि असे मित्र जर भिन्न लिंगी असतील ( म्हणजेच त्री-पुरुष ) असतील तर ते पुढे जाऊन जीवन साथी बनतात आणि शेवटपर्यंत एक मेकांची साथ देतात. असे मित्र निस्वार्थी असतात पण त्यांना ओळखणे फार कठीण असते हि माणसे आपण केलेले कोणतेही काम तुम्हाला दाखून देत नाहीत किवा त्याचे श्रेय हि घेत नाहीत.
३)मरणात हि सोबत असणारे मित्र- आता तुम्ही म्हणाल असे मित्र कुठे आम्ही ऐकले नाही हो! पण असे मित्र असतात, जे शंभर वर्षात काही मोजक्या लोकांच्या आयुष्यात येतात. उदाहरणार्थ - नथुराम गोडसे आणि नाना आपटे, भगत शीह-राजगुरू आणि सुखदेव ,संभाजी महाराज आणि कवी कुलेश अशी काही मोजकी उदाहरणे आपल्याला सांगता येतील. असे मित्र थोर लोकांच्या आयुष्यात येतात आणि इतिहासात आपल्यासाठी एक सोनेरी पण ठेवून जातात. अश्या महान मित्रांच्या आयुष्यावर मी हि तीन भागांची मालिका लिहीत आहे सर्वात प्रथम म्हण मैत्री शंभू राजे आणि कवी कुलेश यांच्या गाढ आणि ह्रिदयस्पर्शी मैत्रीवर ! या दोघांच्या मैत्रीला जगात तोड असूच शकत नाही.
शंभू राजे आणि कवी कुलेश -
शंभू राज्यांना शिवाजी म्हराज्यांचा आदेश आला तुम्हाला भेटण्यासाठी उत्तर हिंदुस्थानातून २ आसामी आले आहेत त्यांना आपल्याकडे घेवून राजे आपल्याकडे येत आहेत. थोड्या वेळाने शिवराय त्या भगव्या वस्त्रातील दोन आसामींना घेवून शंभू राज्यांकडे आले.
" यांना आपण ओळखले का ?" महाराज्यानी एका असमिकडे बोट दाखवत विचारले.आणि त्या आसामिनी कमरेत वाकून मुजरा केला
."हे कविराज, कवी कुलेश " महाराज एका आसमिकडे बोट दाखवत म्हणाले.
"यांना कोण ओळखत नाही आग्र्याहून सुटका झाल्यावर यांनीच आपला जीव धोक्यात घालून आम्हास महाराष्ट्रात परत आणले होते" शंभू राजे
"युवराज हि मंडळी फक्त आपल्या भेटीसाठी आली आहेत आणि चार दिवस राहून परत जायचे म्हणत आहेत पण आम्ही आपले कविमन ओळखून यांना कायमचे इथेच ठेवू घेवू . तुम्हाला काय वाटते?" शिवाजी राजे. "आपला आग्रह रास्त आहे " शंभू राजे आपला झालेला आनंद दाबून ठेवत म्हणाले .
शिवाजी राजे त्याच्याकडे पाहून मनातच हसले. शिवाजी महाराज्यांची निवड होती ती चूकीची कशी असू शकते. आयुष्याच्या शेवटपर्यंत कवी शंभू राज्याच्या मागे अगदी सावलीप्रमाणे राहिले. हो कवी होतेच पण प्रसंगी शंभू राज्यांसाठी आपल्या हातात लेखणी सोडून तलवार पकडली.
वयक्तिक आणि राजकीय स्वार्थासाठी आण्णाजी दत्तो सारख्या मणसाने संभाजी राजे बदनाम कसे होतील आणि शिवाजी महाराज आणि शंभू राजे यांच्यात जास्तीत जास्त दुरावा कसा होईल हे पहिले.प्रसंगी त्यांनी सोयरा बाई यांनाही हाताशी धरले .या डावात अण्णाजी दत्तो काही अंशी सफल झालेही पण शंभू राज्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले ते कविराज! असे म्हणतात वाईट प्रसंगी आपली सावलीही साथ सोडते पण संभाजी राज्यांची सावली भक्कम होती. तिला लोभ ,मोह ,माया या गोष्टीचा नामोनिशान नव्हता .
संभाजी राजे तसे तापट स्वभावाचे त्याच्या रूपी रुद्रच जन्मला आला होता त्यांचा स्वभाव पाहता कोणाचे त्याच्याशी सहज पटेल असे शिवाजी महाराज्यानाही वाटले नसेल.संभाजी राज्यां ी आपल्या ९ वर्ष्याच्या कालावधीत अनेक लढाया करून मुघलांना सलो कि पळो करून सोडले या काळात कविराज शंभू राज्यांकडे सावलीप्रमाणे उभे राहिले. बंधू ,सखा , आणि एक निष्ठावंत सेवक अश्यातीन भूमिका त्यांना पार पडायच्या होत्या.
गणोजी शिर्क्यानी फितुरी केली वतनासाठी आपल्याच माणसाच्या पाठीत खंजीर खुपसले. संगमेश्वर ला दगा झाला. पकडले गेलेले मावळे कत्तलीसाठी एकत्र केले गेले. सामुहिक कत्तल केली गेली. शंभू राजे आणि कवी कुलेश यांना बांधून घेवून गेले.कोरेगावच्या शाही तलवार औरंगाजेबला शंभू राज्यांच्या अटकेची खबर मिळाली आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो तडक निघाला शंभू राज्यांना पाहायला पण त्या अगोदर त्या धुर्त माणसाने आपल्या मौलाविकडून शंभू राज्याच्या मृत्यूचे प्रमाणपत वदवून घेतले .
औरंगजेब संभाजी राज्यांपुढे उभा होता. आजवर त्याच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत कोणताही झाली नव्हती पण संभाजी महाराज्यांची नजर तसूभर हि ढळली नाही .
"आखे निकाल दो इस काफर कि " औरंगजेब रागाने म्हणाला.आणि त्याने कापडाने बांधलेले तोंड सोडण्याची आज्ञा केली.
" सुवर् के औलाद, हम मराठा सेर जैसे जीते है और शेर जैसे मारते है!"तोंडावरील कापड सुटताच संभू राजे कडाडले.आजवर असा अपमान कोणी केला नव्हता औरंगजेबचा तो रागाने लाल झाला आणि म्हणाला "आखे निकालनेसे पहले इसकी जबान काट डालो.और ये सजाये पहले इस कवी पर आजमाओ " औरंगजेब निघून गेला पण कवी कुलेश यांना सजा करावी असे सांगून त्याने फार मोठा डाव खेळला होता . कवी कुलाशाना होणाऱ्या सजा पाहून शंभू राज्याच्या काळजाचा थरकाप होईल ते जीवाची भीक मागून मुस्लीम धर्म स्वीकारायला तयार होतील असे त्याला वाटले.पण औरंगेबाला माहित नव्हते मराठ्याचा हा छावा आपल्या आईच्या दुधाला जगणारा होता.कवी कुलाशानी एक नजर शंभू राज्यांवर टाकली कारण ते परत या डोळ्यांनी शंभू राज्यांना पाहू शकणार नव्हते.कवी कलशांची पहिली जीभ कापली गेली नंतर हशामानी त्यांचे डोळे काढले. आणि याच शिक्षा नंतर शंभू राज्यांना झाल्या एव्हड्या शिक्षा झाल्या तरी शंभू राजे आणि कवी कुलेश दयेची भीक मागत नाहीत हे पाहुन इखालास खान अजून चिडला त्याने नव्या दमाची हश्माची फौज आणली
" देखते क्या हो उखड दो इन कुत्तोकी खाल और डालो नमक का पाणी इन् काफरो पर" इखालास खान ओरडला हशम पुढे सरसावले त्यांनी दोघांची कातडी सोलून काढली आणि त्यावर मिठाचे पाणी टाकले पण दोघांनी आपल्या तोंडातून हू कि चू केले नाही.
बाराव्या दिवशी सावलीने साथ सोडली कवी कुलेशांची प्राण जोत मावळली आणि नंतर शंभू राज्यांना भीमा इंद्रायणीच्या संगमावर देहाची विटंबना करून मारले. अशी हि गाढ मैत्री मृत्यू नंतर संपुष्टात आली पण मृत्यू च्या दारापर्यंत हि मैत्री अखंड होती अगदी मजबूत साखळदंडा प्रमाणे

Sunday, December 11, 2011

ज्ञानेश्वर माऊलीं- संजीवन समाधी

स्वतःला विज्ञानवादी समाजणारी अंनिस कृती करतांना मात्र तिच्या हिंदुद्वेषामुळे कशी अवैज्ञानिक वागते याचेच उदाहरण म्हणजे अंनिसने ज्ञानेश्वर माऊलींची समाधी फोडण्याचा केलेला प्रयत्न होय. तिच्या या प्रयत्नांना एका सश्रध्द विज्ञानवादी संधोधकाने कसे हाणून पाडले, तेच आज आपण या लेखात पहाणार आहोत.


समाधी घेतलेल्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज शरीररूपाने समाधीत असायला हवेत, असा अभ्यासहीन तर्क करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ते पहाण्यासाठी समाधीचे खोदकाम करण्याचे ठरवणे
‘खिस्ताब्द १९७२ साली अंधश्रद्धा-निर्मूलनाचे कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीबाबत वाटले, ‘जर ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली असेल, तर आज ते शरीररूपाने खाली असतील का ? जिवंत असतील का ? नसल्यास त्यांची हाडे, हाडांचा सांगाडा तरी त्या ठिकाणी नक्कीच असला पाहिजे. त्या ठिकाणी आपण खोदकाम करून पहायला हवे.’ जिवंत समाधीबद्दल म्हणजे संजीवन समाधीबद्दल सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करणार्‍या कार्यकर्त्यांनी जर अगोदर ‘संजीवन समाधी म्हणजे काय’ हे जाणून घेतले असते, तर त्यांना समाधी उकरून काढण्याची आवश्यकता भासली नसती. वैज्ञानिक शास्त्र इतके प्रगत झालेले आहे की, वेगवेगळ्या मापकांच्या साहाय्याने ‘आत काय आहे, आहे कि नाही, नसल्यास का नाही आणि ‘आहे’ म्हणतात, तर ते नेमके काय आहे’, हे कळते. वाचकांना ते कळावे, म्हणून या ठिकाणी त्या वेळी घडलेल्या घटनांचा सविस्तर ऊहापोह करीत आहे.
संजीवन समाधी घेतल्यावर शरिरातील पंचमहाभूते ब्रह्मांडातील पंचतत्त्वांशी एकरूप होऊन विरून जात असल्याने त्या ठिकाणी फक्त चैतन्य, ऊर्जा किंवा स्पंदने शिल्लक रहात असणे, तसेच अशी समाधी घेणार्‍यांना पंचमहाभूतांतून हे सगळे पुन्हा गोळा करून शरीर धारण करणे शक्य असणे
‘संजीवन समाधी म्हणजे काय’, हे पातंजलयोगशास्त्रात सांगितलेले आहे. जेव्हा एखादा साधू वा संत संजीवन समाधी घेतो, तेव्हा तो पातंजलयोगशास्त्राप्रमाणे पंचमहाभूतात्मक होतो. आपले शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. जेव्हा तो साधू वा संत संजीवन समाधीत उतरतो, तेव्हा तो सजग असतो. आपल्या सगळ्यांना दिसणारी शरिराच्या अवयवांतील पंचतत्त्वे त्यास दिसत असतात. समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होते, निर्देही होते. याचा अर्थ त्याच्या शरिरातील पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश हे भाग बाहेरच्या ब्रह्मांडातील पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांत विरून जातात, एकरूप होऊन जातात. ज्यांचे जे घेऊन हे शरीर निर्माण झालेले असते, त्याचे त्याला परत देऊन साधू-संत निर्देही होतात. त्यामुळे समाधीच्या जागी काहीही शिल्लक रहात नाही. त्या ठिकाणी जर काही शिल्लक रहात असेल, तर ते चैतन्य, ऊर्जा, स्पंदने. याचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की, या साधूसंतांना पंचमहाभूतांतून हे सगळे पुन्हा गोळा करून आपले शरीर धारण करता येते. ज्या संतमहंतानी संजीवन समाधी घेतलेली आहे, त्या सगळ्यांना हे सर्व शक्य असते.
समाधीचे खोदकाम करून ‘आत काय आहे’, हे पहाण्यास येणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना वैज्ञानिक दृष्टीने समाधीचे महत्त्व समजावून देऊन त्यांना समाधीची मोडतोड करण्यापासून परावृत्त करण्यास वैज्ञानिक असलेल्या डॉ. शुक्ल यांना वारकर्‍यांच्या प्रमुखांनी सांगणे
‘संजीवन समाधी’ या विषयाचा सखोल अभ्यास, सखोल ज्ञान या कार्यकर्त्यांना असते, तर संजीवन समाधी घेतलेल्या ज्ञानेश्वर महाराजांची समाधी खोदून ‘त्यातून हाडे मिळतात कि ज्ञानेश्वर महाराज जिवंत सापडतात’, हे पहाण्याचा उद्योग त्यांनी केला नसता. त्यांनी कुणा जाणकाराजवळ चौकशी करून माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला नाही वा पातंजलयोगात काय आहे, हेदेखील पडताळून पहाण्याचे त्यांनी कष्ट घेतले नाहीत. (समजल्यावरसुद्धा घेतले असतील, याची खात्री देता येत नाही.) रात्री ११.३० वाजता अचानक हरिभक्तपरायण व वारकर्‍यांचे अध्वर्यू असलेल्या मामा दांडेकरांचा मला फोन आला. पुण्याहून डॉ. फाटकांचाही फोन आला, ‘‘तू वैज्ञानिक आहेस, तेव्हा तुझी मदत आम्हाला हवी आहे.’’ प्रकार असा होता की, ट्रकमधून दोनअडीचशे माणसे पुण्याहून आळंदीला जाणार असून ती ज्ञानेश्वरांची समाधी फोडून पहाणार होती. त्यांना मी वैज्ञानिक दृष्टीकोनातून पटवून द्यावयाचे होते की, संजीवन समाधी म्हणजे नेमके काय घडते आणि काय उरते. मी त्या दोघांना आश्वासन दिले, ‘‘मी माझ्या पद्धतीने त्यांना पटवून देण्याचा अवश्य प्रयत्न करीन.’’ मला खात्री होती की, मी त्यांना पटवून देऊन फोडतोड करण्यापासून परावृत्त करू शकेन; तेदेखील योग्य व चांगल्या प्रकारे.
समाधीचे खोदकाम करण्यासाठी येतांना कार्यकर्त्यांनी ते फार आधुनिक असल्याचे दाखवून देण्यासाठी सोबत काही डॉक्टर्स व परदेशातील तीन व्यक्तींना बरोबर आणणे
सकाळी लवकर ठराविक माणसे बरोबर घेऊन आम्ही आळंदीला पोहोचलो. इतरांना कुणाला याची काहीच कल्पना येऊ दिली नव्हती. मी सोबत तीन मीटर्स घेतले होते. त्यातला एक होता ‘गायगर-म्यूलर स्किंटीलेशन काऊंटर’. एक्सरे, अल्फा, गॅमा, बिटा इत्यादी नावांचे जे किरण किंवा ऊर्जा असतात, ते एखाद्या ठिकाणी आहेत कि नाहीत, ते त्या मीटरवर दाखवले जाते. तो ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवला. दुसर्‍या मीटरला ‘थर्मिस्टर बोलोमीटर’ म्हणतात. त्याने अल्ट्राव्हायोलेट इन्फ्रारेड आहेत कि नाही, हे पहाता येते. तोही मीटर समाधीजवळ ठेवला. तिसरा होता ‘प्रिâक्वेन्सी मीटर रडार’. (रेडिओ, दूरदर्शन यांच्याकरिता रडार प्रिâक्वेन्सी वापरली जाते.) हा मीटरही त्याठिकाणी ठेवला. ठरल्याप्रमाणे ट्रक भरून दोन-अडीचशे माणसे आळंदी देवस्थानाजवळ घोषणा करीत आली. सगळी आळंदी ‘हा काय प्रकार आहे’, हे पहाण्यासाठी जमा झाली. अंधश्रद्धा-निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांबरोबर काही डॉक्टर्स व बाहेरच्या देशातील तीन इंग्लिश माणसे आली होती. त्यामागचे कारण आम्हाला नंतर कळले. ते असे, ‘आम्ही फार आधुनिक आहोत. आम्ही काय करतो, हे प्रत्यक्षच पहा’, हे त्यांना दाखवून द्यायचे होते.
समाधीच्या ठिकाणी तीन वेगवेगळी मीटर्स (गायगर-म्यूलर स्किंटीलेशन काऊंटर’, थर्मिस्टर बोलोमीटर व फ्रिक्वेन्सी मीटर रडार) लावून नंतर समाधीवर तीन वेगवेगळ्या धातूंची आवरणे घालून पाहिल्यावर प्रत्येक आवरणाच्या वेळी मीटरच्या रीडिंगमध्ये फरक आढळणे व आवरण काढल्यावर ठराविकच (समाधीच्या आतील स्पंदनांचे) रीडिंग दाखवणे
आम्ही अंधश्रद्धा-निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या जमावाला दाराजवळ थोपवले आणि शांतपणे त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला जे करावयाचे आहे, ते अवश्य करा. आम्ही तुम्हाला अडवणार तर नाहीच, उलट कुदळ फावडे घेऊन तुम्हाला तुमच्या कामात मदत करणार आहोत.’’ त्यांच्यातील डॉक्टरांकडे मी, मामा दांडेकर व डॉ. फाटक गेलो आणि त्यांना विनंती करून सांगितले, ‘‘या समाधीबद्दल आम्ही सांगतो त्या पद्धतीने अगोदर प्रयोग करून पहा. समाधीवर झाकण्यासाठी मी जस्ताचे, पितळेचे व लोखंडाचे अशी तीन प्रकारची वेष्टणे आणली आहेत. आम्ही या ठिकाणी तीन मीटर्स ठेवलेले आहेत. लोखंड, पितळ आणि जस्त यांचे वेष्टण एकेक करून समाधीवर ठेवून प्रत्येक मीटरवर काय दिसते, ते पहावयाचे आहे. तुम्ही पहाल, त्या वेळी आम्ही येथे थांबणार नाही. बाहेर थांबू.
त्यांच्यातील दहाबारा प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांना आम्ही गाभार्‍यात नेले आणि त्यांना माहिती देऊन आम्ही गाभार्‍याबाहेर निघून गेलो. आमच्यापैकी कोणीही तेथे थांबले नाही. त्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रयोग करून पाहिला. लोखंड, पितळ आणि जस्त यांचे वेष्टण एकेक करून समाधीवर टाकले की, जो काटा काही प्रमाणात वर यायचा, तोच वेष्टण काढल्यावर एकच ठराविक रीडींग दाखवायचा. आम्ही तर आत नव्हतो. आम्ही काटा हलवण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यांच्यापैकी कुणी मीटरला हातदेखील लावत नव्हते. मग काटा रीडींग का दाखवत होता ? आतील रीडिंग दाखविणारे चैतन्य, स्फुरण, स्पंदने कोठून आली ? आवरण घातल्यावर रीडिंग बंद का होते ? वेष्टण काढल्यावर रीडिंग का दाखवले ? त्यांना तीनही प्रकारची वेष्टणे घालून पहावयाला सांगितले होते. त्या प्रत्येक वेष्टणाच्या वेळी रीडिंगमध्ये वेगवेगळा फरक का येत होता ? यात कसलीही हातचलाखी नव्हती अथवा जादूटोणा नव्हता, हे त्यांच्या लक्षात आले.
ज्याप्रमाणे ‘क्ष’किरण दिसत नसले, तरी त्यांच्यामुळे शरिराच्या आतील भागातील छायाचित्र (फोटो) काढता येत असल्याने त्यांचे अस्तित्व कळते, तसे संजीवन समाधीतील चैतन्य, ऊर्जा व स्पंदने दिसत नसली, तरी त्यांचे अस्तित्व वैज्ञानिक प्रयोगाद्वारे सिद्ध होणे
शास्त्रज्ञांच्या शास्त्रीय परिभाषेतील हे प्रयोग त्यांना करून दाखवल्यावर आणि ‘संजीवन समाधी म्हणजे काय’, हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या ठिकाणी निश्चितपणे चैतन्य आहे, ऊर्जा आहे, स्पंदने आहेत. म्हणूनच त्यांचा आलेख मीटर्सवर जाणवतो. वेगवेगळ्या धातूंची वेष्टणे घातल्यावर त्या चैैतन्यलहरींना जो अडथळा निर्माण होतो, त्यामुळे प्रत्येक आवरणाच्या गुणधर्मानुसार निरनिराळ्या प्रकारची रीडींग्ज मीटरवर दिसतात. शास्त्रीय उपकरणांच्या साहाय्याने त्यांच्या लक्षात आले की, चैतन्य दिसत नसले, तरी त्याचे अस्तित्व असते. अल्फा, गामा, बीटा, रडार, क्ष किरण इत्यादी दिसत नसले, तरी त्यांंचे अस्तित्व आपण नाकारत नाही. त्यांच्यामुळे होणारे परिणाम आपण दृश्य स्वरूपात पहातो. क्ष किरणांमुळे शरिराच्या आतील फोटो काढला जातो, हे दृश्य झाले. पण मग क्ष किरण दिसले नाही; म्हणून त्यास नाकारावे, याला अर्थच नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाने सर्व संभ्रम दूर झाल्यानंतर ही सगळी मंडळी दर सहा महिन्यांनी न चुकता समाधीच्या दर्शनासाठी आळंदीस येऊ लागली. तीन परदेशी माणसांपैकी एकाने तर स्वतःला आळंदीला वाहून घेतले आहे. ही खिस्ताब्द १९७२ सालातील घटना आहे.
‘जेव्हा विज्ञानाचा उपयोग काय’, असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा ‘विज्ञानाचा सदुपयोग असाही होऊ शकतो’, हे छातीठोकपणे सांगता येते. सर्वसामान्य माणसाला सहजपणे आणि सुलभपणे पटवून देण्यासाठी हा एक सोपा आणि सरळ मार्ग आहे.
आळंदीप्रमाणे पंढरपूर, गाणगापूर आणि देहू ही चैतन्यमय अन् जागृत ठिकाणे आहेत.’
- डॉ. रघुनाथ नारायण शुक्ल (‘अलख निरंजन’ दीपावली विशेषांक, २००७)
अग्निहोत्र संस्कारास मान्यता देऊन पेरु देशाची अंनिसला चपराक !
‘पेरु देशात अग्निहोत्रावर शेती करण्यात येते. या प्रयोगाचे सूत्रधार पू. परांजपे महाराज यांचे वास्तव्य जास्त करून पेरु देशातच असते. वर्षा-दोन वर्षांतून काही दिवस ते भारतात येतात. अनगोळचे
श्री. संभाजी हे त्यांचे शिष्य आहेत. त्यांच्याकडे पू. महाराज आले होते. त्या वेळी श्रीकाका आपल्या सहकार्‍यांच्या समवेत पूर्वसूचना देऊन दर्शनास गेले असता पू. परांजपे महाराज बंगल्याच्या दरवाजातच त्यांची वाट बघत बसले होते. श्रीकाका गेल्यावर दरवाजातच त्यांना थांबवून पायावर दूध, पाणी घालून परदेशी शिष्यांकडून केलेल्या वेदपठणाने त्यांचे स्वागत केले. श्रीकाकांना आसनस्थ करून शिष्यांकडून त्यांची पाद्यपूजा केली. त्यानंतर आपण करीत असलेल्या अग्निहोत्राच्या प्रचाराची सर्व सविस्तर माहिती श्रीकाकांना त्यांनी दिली. पेरु देशात या संस्कारास सरकारी मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले.’ (वसुमामा ते श्रीकाका, पृ. २१७. लेखक : अभयानंद. प्रकाशक : परमचैतन्य श्री काणे महाराज भक्त परिवार, बेळगाव.)

Thursday, December 1, 2011

छत्रपतींचे दुर्गविज्ञान

महाराष्ट्र हा दुर्गाचा प्रांत!सह्यपठारावर आपण जर नजर फिरवली तर, चार-दोन शिखरांआड एखादा किल्ला तट बुरुजांचा शेला पागोटा मिरवत दिमाखाने उभा असतो. यातील बहुतेक दुर्ग श्रीशिवछत्रपतींची पायधूळ आपल्या मस्तकी मळवट भरल्याप्रमाणे धारण करून अभिमानाने मिरवत उभे आहेत. या शिवस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची तीर्थक्षेत्रे आज मात्र उपेक्षेच्या गर्तेत गेलेली आहेत. अनेक पिढय़ांनी अभिमानाने सांगावा, असा इतिहास ज्या ठिकाणी घडला त्यांचे साक्षीदार असणाऱ्या या पाऊलखुणा आज संवर्धनाच्या उपेक्षेत आहेत.. आजही साडेतीनशे वर्षांनंतर शिवरायांच्या स्थापत्यशास्त्राचे दर्शन गड बारकाईने पाहिला तर घडू शकतं! वयाच्या १५-१६ व्या वर्षी बांधून घेतलेल्या तोरणगडापासून ते पन्नाशीत उभारलेल्या कुलाबा किल्ल्यापर्यंतचा आपण बारकाईने, अभ्यासू वृत्तीने विचार केला तर शिवरायांच्या दुर्गविज्ञानाची दृष्टी सतराव्या शतकातही काळाच्या किती पुढे होती हे दिसून येते.
 प्रतापगड आपण अगदी पायथ्यापासून पाहिला तर गडाच्या गोमुखी रचनेपासून ते गडाच्या मुख्य दरवाजापर्यंतच दुर्गविज्ञानाची प्रचीती येते! मुख्य दरवाजापर्यंत जाण्यासाठी असणाऱ्या ७५ पायऱ्या या एक समान नसून उंच सखल आहेत. कारण साधारण दोन किलो वजनाची तलवार व तेवढय़ाच वजनाची ढाल पेलत या असमान पायऱ्या चढताना शत्रूंची चांगलीच दमछाक व्हावी, हा मुख्य हेतू! अत्यंत चिंचोळा मार्ग, जेणे करून हत्ती मुख्य दरवाजापर्यंत न यावा आणि गोमुखी रचनेमुळे मुख्यद्वार शोधण्यास अडचण यावी. शत्रू एक-दोन वेळा उलटसुलट फिरून भांबावून जावा हा त्यामागचा उद्देश. इतकेच नव्हे तर मुख्य दरवाजासमोरच्या तटबंदीत जंग्या (त्रिकोणी किंवा चौकोनी झरोके) मधून आणीबाणीच्या वेळी शत्रूस टिपण्यासाठी झरोके ठेवलेले दिसतात! किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येणारी वाट नियोजनपूर्वक आखली तर शत्रूंच्या अडचणीत भर पडून त्यास भांबावून सोडणे हा मुख्य उद्देश! दोन बुरुजांच्या कवेत निर्माण केलेल्या चिंचोळ्या वाटेत गडाच्या तटावरून तेल, दगड, गरम पाणी फेकून बलाढय़ शत्रूला नामोहरम करण्याची ही नामी योजना या किल्ल्यांवर पाहावयास मिळते. ‘हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा’ या शिवप्रभूंच्या उक्तीस सार्थ करण्यासाठी त्यांच्या पाठीशी सह्याद्री उभा राहिला! या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचे गड-किल्ले हीच मोठी विलक्षण गोष्ट आहे. आधीच सह्याद्री अभेद्य! काळ्याकभिन्न कडय़ांनी वेढलेली गिरिशिखरे, घनदाट जंगलात उतरणाऱ्या खोल दऱ्या, उंचच उंच कडे, घातकी वळणे, अडचणींच्या खिंडी, फसव्या वाटा हे सह्याद्रीचे रूप पाहत गनीम कितीही मोठा असला तरी या प्रदेशात लढाईसाठी विचार करूनच पाऊल उचलत असे!

राजगडाची संजीवनी माची हा तर दुर्गरचनेचा अनोखा आविष्कारच म्हणायला हवा! संजीवनी माचीच्या तीन टप्प्यांत उतरलेल्या डोंगरी सोंडेलगत बुरुजाचे केलेले पहिले बांधकाम, त्यालगत साधारण दोन मीटर अंतर सोडून बाहेरच्या बाजूस पुन्हा मजबूत तटबंदी असे चिलखती बांधकाम! या बांधकामाचं वैशिष्टय़ हे, की बाह्य चिलखती बांधकामाची उंची आतल्या बांधकामापेक्षा जास्त! आधीच दुर्गम भाग त्यामुळे शत्रू सैन्य आले किंवा तोफेच्या माऱ्यात हा बुरुज ढासळला तरी आतला चिलखती बुरुज शाबूत राहीलच; पण बाह्य बांधकाम पडल्यावर शत्रू आत आलाच तर दोन बुरुजादरम्यानच्या अरुंद दोन मीटर जागेत अडून हालचालींवर मर्यादा येऊन गडाच्या सैनिकांच्या हातात अलगद लागून त्यांना ठार मारणे सुलभ जाईल, ही रचना आजही थक्क करते!

आपण आठ शतकांचा साक्षीदार असलेला विजयदुर्ग पाहिला तर आपली मती गुंग होते. १६५३-५४ मध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकला आणि मूळचे काही बांधकाम पाडून नवीन तटबंदीयुक्त बांधकाम करून बेलाग किल्ला उभारला. शिवछत्रपतींच्या आरमाराचे मुख्यालय असलेला हा किल्ला, मराठय़ांच्या देदीप्यमान आरमारी पराक्रमाचा साक्षीदार आणि जलदुर्ग वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेला विजयदुर्ग! किल्ल्याच्या जवळ बोटी येण्याआधीच फुटत. याचे कारण कोणालाच उमजत नव्हते. कदाचित किल्ल्याजवळ समुद्रकिनारी जे उथळ खडक पाण्यात आहेत, त्याचा हा परिणाम असावा. असाच तत्कालीन समज पसरून राहिला होता. मात्र १९ व्या शतकात पोर्तुगालमधील लिस्बन येथे भारतीय नौदलाचे कमांडर गुपचूप यांना तेथील पुराभिलेखागारात एक कागद सापडला आणि याचे रहस्य उमजले ते एकमेवाद्वितीयच होते. किल्ला अभेद्य राहावा म्हणून किल्ल्यापासून सुमारे १५० ते २०० मीटर अंतरावर इंग्रजी ‘एल’ आकारात पाण्याखाली थेट समुद्रात साडेचार किलोमीटर लांबीची भिंत बांधून किल्ल्याचे अनोखे संरक्षण करण्यात आले होते! कारण शिवरायांनी परकीय आरमाराचा, त्यांच्या जहाज बांधणीचा अभ्यास केला तेव्हा त्यांना जाणवले, की आपल्या आरमारी बोटीचे तळ हे उथळ असतात; परंतु पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांचे जहाजबांधणीचे ज्ञान जास्त प्रगत होते. ते आपल्या बोटी वेगवान हालचाली करण्यासाठी आपला तळ इंग्रजी ‘व्ही’ आकाराच्या तळाकडे निमुळता होत जाणारा असा बांधत असत. त्यामुळे त्यांच्या बोटी खोल समुद्रातून वेगात जात असत. त्यामुळे अशा प्रकारची भिंत बांधली, की त्यावर या बोटी आपटून-आदळून त्यांना जलसमाधी मिळेल! त्याकाळी सागरी विज्ञान विकसित झालेले नसतानादेखील समुद्राखाली भिंत बांधून किल्ल्याला दिलेले अनोखे संरक्षण हे अनोख्या दुर्गविज्ञानाचे प्रतीकच नाही काय?

विजयदुर्गाप्रमाणे सिंधुदुर्ग बांधतानासुद्धा त्यांनी दुर्गविज्ञान वापरले. कुरटे बेटावर १६६४ ते ६७ मध्ये त्यांनी बेलाग अशी शिवलंकाच उभारली! यामध्ये किल्ल्याच्या उभारणीसाठी त्यांनी पाया बांधताना शिसे व चुना यांचा वापर करून समुद्राच्या लाटांच्या माऱ्याचा परिणाम होणार नाही हे पाहिले! शिशाचा रस ओतून चिरे बसवण्याची कल्पना प्रत्यक्ष अंमलात आणून ‘चौऱ्याऐशी बंदरी ऐसी जागा दुसरी नाही. इथे नूतन जंजिरा बसवावा’ हे सार्थ करून उत्कृष्ट जलदुर्ग साकारला! किल्ल्यापर्यंत जाणारा मार्ग हा नैसर्गिकरीत्या सर्पाकृती आहे, कारण मधले समुद्रातील खडक हे तसेच ठेवले. परक्यांची जहाजे, तरांडी अंदाज न आल्यामुळे फुटतील, अशी योजना त्यांनी केली. त्याचप्रमाणे पद्दुर्ग ऊर्फ कांसा किल्ल्याच्या बांधकामाबाबतीत दगडी चिरे झिजलेत; पण चुन्याचा दर्जा मात्र जसाच्या तसा आहे! उत्कृष्ट चुनानिर्मितीचे तंत्र शिवराय आणि त्यांच्या स्थपतीजवळ होते, त्याला शास्त्राची जोड होती हेच सिद्ध होत! खांदेरी किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवरायांनी वेगळेच तंत्र वापरले. त्यांनी किल्ल्याच्या बेटाभोवती न घडवलेले ओबड-धोबड दगड, चिरे असे बेमालूम पेरले, की भरतीच्या वेळीही दगड दिसावेत. समुद्राच्या पाण्यामुळे या दगडांवर धारदार शंख-शिंपल्यांची वाढ होऊन त्याच्या धारदार कडांमुळे खडकावर वावरणे अशक्य होऊन बसले. कारण त्याकाळी पादत्राणे ही कच्च्या चामडय़ाची असत. समुद्राचे खारे पाणी अशी पादत्राणे खराब करून टाकीत. त्यामुळे चपला घालता येत नाही आणि चालताही येत नाही, अशा परिस्थितीमुळे लढणे जिकिरीचे होई. शिवाय लाटांचे भरतीच्या वेळी येणारे पाणी दगडावर आपटून मुख्य तटबंदीपर्यंत पाणी न पोहोचू देण्याची पद्धत शिवरायांच्या स्थपतींनी यशस्वीरीत्या वापरली!


कुलाबा किल्ल्याच्या बांधणीत तर भले मोठे चिरे नुसते एकमेकांवर ठेवले आहेत. लाटांचा जोर हा जास्त असल्याने या भिंतीवर लाटा आपटल्या, की पाणी दोन दगडांच्या फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर उणावतो. ही पद्धत कुलाबा किल्ल्याच्या बांधकामात वापरली गेली, अन् आज साडेतीनशे वर्षांनंतरही या किल्ल्यांच्या बांधकामातील एक चिराही सरकलेला नाही! दुर्गनिर्मितीमधला हा एक साधा पण वैज्ञानिक तत्त्वावर आधारलेला प्रयोग यशस्वी ठरला. रायगडावरील महादरवाजाजवळ काही फुटके हौद दिसतात, जे आपणास केवळ फुटके हौद म्हणून दाखविले जातात; परंतु हा प्रकार म्हणजे गडाच्या संरक्षणासाठी केलेली योजना आहे. हे न पटणारे आहे. रायगडाच्या महादरवाजापर्यंतची अवघड चढण चढून शत्रू सैन्याने किल्ल्यात प्रवेश केला तर दरवाजाजवळ असणारे हे हौद सुरुंगाने उडवून देऊन पाण्याचा लोंढा उतारावर असलेल्या महादरवाजाजवळ वेगाने वाहील व अकस्मात झालेल्या या जलहल्ल्याने, चिखलराडय़ाने शत्रू सैन्याचा धीर खचून त्याची मानसिकता व अवसान गळून पडेल हा त्या मागचा उद्देश! साठवलेल्या पाण्यातून दुर्ग संरक्षण करण्याचा कल्पक हेतू मनी बाळगणारे शिवाजी महाराज हे जगातील पहिले आणि शेवटचे राजे होत!

तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी जे किल्ले, दुर्ग बांधले तेथे शौचकुपाची व्यवस्था होती. रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आदी किल्ल्यांवर आजही अगदी सुस्थितीत असलेले शौचकूप पाहणे रोमांचकारी आहे. त्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान आवर्जून पाहण्यासारखे आहे. ज्या काळात अभियांत्रिकी किंवा स्थापत्यशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या शिक्षणसम्राटांच्या संस्था नव्हत्या. दुर्गबांधणीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याएवढे राजकीय स्थैर्य नव्हते, राज्यात कधीही परकीय दमनचक्र येणाऱ्या काळात, स्वकीय, तसेच परकीयांशी झुंजण्यात कालापव्यय होत असताना शिवाजी महाराजांचे असे एकमेवाद्वितीय, शास्त्रीय आधारांवर दुर्गबांधणीचे प्रयोग त्यांची दुर्गबांधणीतील वैज्ञानिक बैठक ही आश्चर्यकारकच आहे.

महाराष्ट्रात दुर्गकारण यशस्वी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर याच किल्ल्यांच्या साक्षीने मराठी आणि मावळी मन लढले! आज किल्ल्यांची दुरवस्था झाली असली तरी निखळलेला प्रत्येक चिरा स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या पराक्रमी पूर्वजांची कहाणी सांगतो आहे