आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Sunday, December 11, 2011

ज्ञानेश्वर माऊलीं- संजीवन समाधी

स्वतःला विज्ञानवादी समाजणारी अंनिस कृती करतांना मात्र तिच्या हिंदुद्वेषामुळे कशी अवैज्ञानिक वागते याचेच उदाहरण म्हणजे अंनिसने ज्ञानेश्वर माऊलींची समाधी फोडण्याचा केलेला प्रयत्न होय. तिच्या या प्रयत्नांना एका सश्रध्द विज्ञानवादी संधोधकाने कसे हाणून पाडले, तेच आज आपण या लेखात पहाणार आहोत.


समाधी घेतलेल्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज शरीररूपाने समाधीत असायला हवेत, असा अभ्यासहीन तर्क करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ते पहाण्यासाठी समाधीचे खोदकाम करण्याचे ठरवणे
‘खिस्ताब्द १९७२ साली अंधश्रद्धा-निर्मूलनाचे कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीबाबत वाटले, ‘जर ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली असेल, तर आज ते शरीररूपाने खाली असतील का ? जिवंत असतील का ? नसल्यास त्यांची हाडे, हाडांचा सांगाडा तरी त्या ठिकाणी नक्कीच असला पाहिजे. त्या ठिकाणी आपण खोदकाम करून पहायला हवे.’ जिवंत समाधीबद्दल म्हणजे संजीवन समाधीबद्दल सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करणार्‍या कार्यकर्त्यांनी जर अगोदर ‘संजीवन समाधी म्हणजे काय’ हे जाणून घेतले असते, तर त्यांना समाधी उकरून काढण्याची आवश्यकता भासली नसती. वैज्ञानिक शास्त्र इतके प्रगत झालेले आहे की, वेगवेगळ्या मापकांच्या साहाय्याने ‘आत काय आहे, आहे कि नाही, नसल्यास का नाही आणि ‘आहे’ म्हणतात, तर ते नेमके काय आहे’, हे कळते. वाचकांना ते कळावे, म्हणून या ठिकाणी त्या वेळी घडलेल्या घटनांचा सविस्तर ऊहापोह करीत आहे.
संजीवन समाधी घेतल्यावर शरिरातील पंचमहाभूते ब्रह्मांडातील पंचतत्त्वांशी एकरूप होऊन विरून जात असल्याने त्या ठिकाणी फक्त चैतन्य, ऊर्जा किंवा स्पंदने शिल्लक रहात असणे, तसेच अशी समाधी घेणार्‍यांना पंचमहाभूतांतून हे सगळे पुन्हा गोळा करून शरीर धारण करणे शक्य असणे
‘संजीवन समाधी म्हणजे काय’, हे पातंजलयोगशास्त्रात सांगितलेले आहे. जेव्हा एखादा साधू वा संत संजीवन समाधी घेतो, तेव्हा तो पातंजलयोगशास्त्राप्रमाणे पंचमहाभूतात्मक होतो. आपले शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. जेव्हा तो साधू वा संत संजीवन समाधीत उतरतो, तेव्हा तो सजग असतो. आपल्या सगळ्यांना दिसणारी शरिराच्या अवयवांतील पंचतत्त्वे त्यास दिसत असतात. समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होते, निर्देही होते. याचा अर्थ त्याच्या शरिरातील पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश हे भाग बाहेरच्या ब्रह्मांडातील पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांत विरून जातात, एकरूप होऊन जातात. ज्यांचे जे घेऊन हे शरीर निर्माण झालेले असते, त्याचे त्याला परत देऊन साधू-संत निर्देही होतात. त्यामुळे समाधीच्या जागी काहीही शिल्लक रहात नाही. त्या ठिकाणी जर काही शिल्लक रहात असेल, तर ते चैतन्य, ऊर्जा, स्पंदने. याचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की, या साधूसंतांना पंचमहाभूतांतून हे सगळे पुन्हा गोळा करून आपले शरीर धारण करता येते. ज्या संतमहंतानी संजीवन समाधी घेतलेली आहे, त्या सगळ्यांना हे सर्व शक्य असते.
समाधीचे खोदकाम करून ‘आत काय आहे’, हे पहाण्यास येणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना वैज्ञानिक दृष्टीने समाधीचे महत्त्व समजावून देऊन त्यांना समाधीची मोडतोड करण्यापासून परावृत्त करण्यास वैज्ञानिक असलेल्या डॉ. शुक्ल यांना वारकर्‍यांच्या प्रमुखांनी सांगणे
‘संजीवन समाधी’ या विषयाचा सखोल अभ्यास, सखोल ज्ञान या कार्यकर्त्यांना असते, तर संजीवन समाधी घेतलेल्या ज्ञानेश्वर महाराजांची समाधी खोदून ‘त्यातून हाडे मिळतात कि ज्ञानेश्वर महाराज जिवंत सापडतात’, हे पहाण्याचा उद्योग त्यांनी केला नसता. त्यांनी कुणा जाणकाराजवळ चौकशी करून माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला नाही वा पातंजलयोगात काय आहे, हेदेखील पडताळून पहाण्याचे त्यांनी कष्ट घेतले नाहीत. (समजल्यावरसुद्धा घेतले असतील, याची खात्री देता येत नाही.) रात्री ११.३० वाजता अचानक हरिभक्तपरायण व वारकर्‍यांचे अध्वर्यू असलेल्या मामा दांडेकरांचा मला फोन आला. पुण्याहून डॉ. फाटकांचाही फोन आला, ‘‘तू वैज्ञानिक आहेस, तेव्हा तुझी मदत आम्हाला हवी आहे.’’ प्रकार असा होता की, ट्रकमधून दोनअडीचशे माणसे पुण्याहून आळंदीला जाणार असून ती ज्ञानेश्वरांची समाधी फोडून पहाणार होती. त्यांना मी वैज्ञानिक दृष्टीकोनातून पटवून द्यावयाचे होते की, संजीवन समाधी म्हणजे नेमके काय घडते आणि काय उरते. मी त्या दोघांना आश्वासन दिले, ‘‘मी माझ्या पद्धतीने त्यांना पटवून देण्याचा अवश्य प्रयत्न करीन.’’ मला खात्री होती की, मी त्यांना पटवून देऊन फोडतोड करण्यापासून परावृत्त करू शकेन; तेदेखील योग्य व चांगल्या प्रकारे.
समाधीचे खोदकाम करण्यासाठी येतांना कार्यकर्त्यांनी ते फार आधुनिक असल्याचे दाखवून देण्यासाठी सोबत काही डॉक्टर्स व परदेशातील तीन व्यक्तींना बरोबर आणणे
सकाळी लवकर ठराविक माणसे बरोबर घेऊन आम्ही आळंदीला पोहोचलो. इतरांना कुणाला याची काहीच कल्पना येऊ दिली नव्हती. मी सोबत तीन मीटर्स घेतले होते. त्यातला एक होता ‘गायगर-म्यूलर स्किंटीलेशन काऊंटर’. एक्सरे, अल्फा, गॅमा, बिटा इत्यादी नावांचे जे किरण किंवा ऊर्जा असतात, ते एखाद्या ठिकाणी आहेत कि नाहीत, ते त्या मीटरवर दाखवले जाते. तो ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवला. दुसर्‍या मीटरला ‘थर्मिस्टर बोलोमीटर’ म्हणतात. त्याने अल्ट्राव्हायोलेट इन्फ्रारेड आहेत कि नाही, हे पहाता येते. तोही मीटर समाधीजवळ ठेवला. तिसरा होता ‘प्रिâक्वेन्सी मीटर रडार’. (रेडिओ, दूरदर्शन यांच्याकरिता रडार प्रिâक्वेन्सी वापरली जाते.) हा मीटरही त्याठिकाणी ठेवला. ठरल्याप्रमाणे ट्रक भरून दोन-अडीचशे माणसे आळंदी देवस्थानाजवळ घोषणा करीत आली. सगळी आळंदी ‘हा काय प्रकार आहे’, हे पहाण्यासाठी जमा झाली. अंधश्रद्धा-निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांबरोबर काही डॉक्टर्स व बाहेरच्या देशातील तीन इंग्लिश माणसे आली होती. त्यामागचे कारण आम्हाला नंतर कळले. ते असे, ‘आम्ही फार आधुनिक आहोत. आम्ही काय करतो, हे प्रत्यक्षच पहा’, हे त्यांना दाखवून द्यायचे होते.
समाधीच्या ठिकाणी तीन वेगवेगळी मीटर्स (गायगर-म्यूलर स्किंटीलेशन काऊंटर’, थर्मिस्टर बोलोमीटर व फ्रिक्वेन्सी मीटर रडार) लावून नंतर समाधीवर तीन वेगवेगळ्या धातूंची आवरणे घालून पाहिल्यावर प्रत्येक आवरणाच्या वेळी मीटरच्या रीडिंगमध्ये फरक आढळणे व आवरण काढल्यावर ठराविकच (समाधीच्या आतील स्पंदनांचे) रीडिंग दाखवणे
आम्ही अंधश्रद्धा-निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या जमावाला दाराजवळ थोपवले आणि शांतपणे त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला जे करावयाचे आहे, ते अवश्य करा. आम्ही तुम्हाला अडवणार तर नाहीच, उलट कुदळ फावडे घेऊन तुम्हाला तुमच्या कामात मदत करणार आहोत.’’ त्यांच्यातील डॉक्टरांकडे मी, मामा दांडेकर व डॉ. फाटक गेलो आणि त्यांना विनंती करून सांगितले, ‘‘या समाधीबद्दल आम्ही सांगतो त्या पद्धतीने अगोदर प्रयोग करून पहा. समाधीवर झाकण्यासाठी मी जस्ताचे, पितळेचे व लोखंडाचे अशी तीन प्रकारची वेष्टणे आणली आहेत. आम्ही या ठिकाणी तीन मीटर्स ठेवलेले आहेत. लोखंड, पितळ आणि जस्त यांचे वेष्टण एकेक करून समाधीवर ठेवून प्रत्येक मीटरवर काय दिसते, ते पहावयाचे आहे. तुम्ही पहाल, त्या वेळी आम्ही येथे थांबणार नाही. बाहेर थांबू.
त्यांच्यातील दहाबारा प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांना आम्ही गाभार्‍यात नेले आणि त्यांना माहिती देऊन आम्ही गाभार्‍याबाहेर निघून गेलो. आमच्यापैकी कोणीही तेथे थांबले नाही. त्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रयोग करून पाहिला. लोखंड, पितळ आणि जस्त यांचे वेष्टण एकेक करून समाधीवर टाकले की, जो काटा काही प्रमाणात वर यायचा, तोच वेष्टण काढल्यावर एकच ठराविक रीडींग दाखवायचा. आम्ही तर आत नव्हतो. आम्ही काटा हलवण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यांच्यापैकी कुणी मीटरला हातदेखील लावत नव्हते. मग काटा रीडींग का दाखवत होता ? आतील रीडिंग दाखविणारे चैतन्य, स्फुरण, स्पंदने कोठून आली ? आवरण घातल्यावर रीडिंग बंद का होते ? वेष्टण काढल्यावर रीडिंग का दाखवले ? त्यांना तीनही प्रकारची वेष्टणे घालून पहावयाला सांगितले होते. त्या प्रत्येक वेष्टणाच्या वेळी रीडिंगमध्ये वेगवेगळा फरक का येत होता ? यात कसलीही हातचलाखी नव्हती अथवा जादूटोणा नव्हता, हे त्यांच्या लक्षात आले.
ज्याप्रमाणे ‘क्ष’किरण दिसत नसले, तरी त्यांच्यामुळे शरिराच्या आतील भागातील छायाचित्र (फोटो) काढता येत असल्याने त्यांचे अस्तित्व कळते, तसे संजीवन समाधीतील चैतन्य, ऊर्जा व स्पंदने दिसत नसली, तरी त्यांचे अस्तित्व वैज्ञानिक प्रयोगाद्वारे सिद्ध होणे
शास्त्रज्ञांच्या शास्त्रीय परिभाषेतील हे प्रयोग त्यांना करून दाखवल्यावर आणि ‘संजीवन समाधी म्हणजे काय’, हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या ठिकाणी निश्चितपणे चैतन्य आहे, ऊर्जा आहे, स्पंदने आहेत. म्हणूनच त्यांचा आलेख मीटर्सवर जाणवतो. वेगवेगळ्या धातूंची वेष्टणे घातल्यावर त्या चैैतन्यलहरींना जो अडथळा निर्माण होतो, त्यामुळे प्रत्येक आवरणाच्या गुणधर्मानुसार निरनिराळ्या प्रकारची रीडींग्ज मीटरवर दिसतात. शास्त्रीय उपकरणांच्या साहाय्याने त्यांच्या लक्षात आले की, चैतन्य दिसत नसले, तरी त्याचे अस्तित्व असते. अल्फा, गामा, बीटा, रडार, क्ष किरण इत्यादी दिसत नसले, तरी त्यांंचे अस्तित्व आपण नाकारत नाही. त्यांच्यामुळे होणारे परिणाम आपण दृश्य स्वरूपात पहातो. क्ष किरणांमुळे शरिराच्या आतील फोटो काढला जातो, हे दृश्य झाले. पण मग क्ष किरण दिसले नाही; म्हणून त्यास नाकारावे, याला अर्थच नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाने सर्व संभ्रम दूर झाल्यानंतर ही सगळी मंडळी दर सहा महिन्यांनी न चुकता समाधीच्या दर्शनासाठी आळंदीस येऊ लागली. तीन परदेशी माणसांपैकी एकाने तर स्वतःला आळंदीला वाहून घेतले आहे. ही खिस्ताब्द १९७२ सालातील घटना आहे.
‘जेव्हा विज्ञानाचा उपयोग काय’, असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा ‘विज्ञानाचा सदुपयोग असाही होऊ शकतो’, हे छातीठोकपणे सांगता येते. सर्वसामान्य माणसाला सहजपणे आणि सुलभपणे पटवून देण्यासाठी हा एक सोपा आणि सरळ मार्ग आहे.
आळंदीप्रमाणे पंढरपूर, गाणगापूर आणि देहू ही चैतन्यमय अन् जागृत ठिकाणे आहेत.’
- डॉ. रघुनाथ नारायण शुक्ल (‘अलख निरंजन’ दीपावली विशेषांक, २००७)
अग्निहोत्र संस्कारास मान्यता देऊन पेरु देशाची अंनिसला चपराक !
‘पेरु देशात अग्निहोत्रावर शेती करण्यात येते. या प्रयोगाचे सूत्रधार पू. परांजपे महाराज यांचे वास्तव्य जास्त करून पेरु देशातच असते. वर्षा-दोन वर्षांतून काही दिवस ते भारतात येतात. अनगोळचे
श्री. संभाजी हे त्यांचे शिष्य आहेत. त्यांच्याकडे पू. महाराज आले होते. त्या वेळी श्रीकाका आपल्या सहकार्‍यांच्या समवेत पूर्वसूचना देऊन दर्शनास गेले असता पू. परांजपे महाराज बंगल्याच्या दरवाजातच त्यांची वाट बघत बसले होते. श्रीकाका गेल्यावर दरवाजातच त्यांना थांबवून पायावर दूध, पाणी घालून परदेशी शिष्यांकडून केलेल्या वेदपठणाने त्यांचे स्वागत केले. श्रीकाकांना आसनस्थ करून शिष्यांकडून त्यांची पाद्यपूजा केली. त्यानंतर आपण करीत असलेल्या अग्निहोत्राच्या प्रचाराची सर्व सविस्तर माहिती श्रीकाकांना त्यांनी दिली. पेरु देशात या संस्कारास सरकारी मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले.’ (वसुमामा ते श्रीकाका, पृ. २१७. लेखक : अभयानंद. प्रकाशक : परमचैतन्य श्री काणे महाराज भक्त परिवार, बेळगाव.)

4 comments:

  1. It is a great scientific effort. Where do you get these meters?

    ReplyDelete
  2. सध्या *'काय आहे माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य'* या शीर्षकाचा एक लेख सोशल मीडियामधून पसरतोय. त्यामध्ये म्हटलेय की 1972 साली अंधश्रद्धा निर्मूलन वाले लोक आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उखडायला निघाले होते. आणि तिथे माऊलींनी त्यांना आपल्या चमत्कारी अस्तित्वाची प्रचिती दिली.
    सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की हा लेख पूर्णपणे खोटा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करण्याच्या हेतूने कुणीतरी काल्पनिक कथा रचून ती सोशल मीडियावर टाकली आहे. जिज्ञासूंच्या माहितीसाठी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो.
    1) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८२ साली झाली. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८९ साली झाली. या दोन्हीही संघटना १९७२ साली अस्तित्वात नव्हत्या. अंधश्रद्धा निर्मूलनाची दुसरी कोणतीही चळवळ त्या काळात महाराष्ट्रात सुरु नव्हती. परंतु त्या लेखात मध्ये म्हटले आहे की त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा सुकाळ होता. यावरूनच या लेखातील माहितीचा खोटेपणा उघड होतो.
    2) १९७२ साली संपूर्ण महाराष्ट्रात वैयक्तिक पातळीवर कुणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असेलही कदाचित. पण अशा लोकांची संख्या निश्चितच शंभरच्या आतच असेल. पण लेख लिहिणारे लेखक म्हणतायत की एकट्या पुण्यातून दोन-अडीचशे माणसांचा ट्रक पुण्याहून आळंदीला समाधी उखडण्यासाठी चालला होता. जिथे ५० माणसे मिळणे अवघड होते तिथून अडीचशे माणसे कुठून मिळाली? याचा अर्थ ही कथाच बनावट आहे.
    3) साहजिकच त्या लेखात सांगितलेल्या इतर गोष्टीही (अल्फा, बीटा, गॅमा किरण मीटरच्या साहाय्याने मोजणे वगैरे) खोट्या आहेत. त्या गोष्टी घडल्याच नाहीत.
    4) सदर लेखामध्ये सांगितलेली घटना खरी असती तर लेखामध्ये समाधी उखडण्यासाठी आलेल्या लोकांची नावे दिली असती. परंतु लेखामध्ये त्यांपैकी एकाही व्यक्तीचे नाव दिलेले नाही.
    5) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विधायक धर्मचिकित्सेला महत्व देते...की जी धर्मचिकित्सेची परंपरा संतानी आपल्या परखड आणि वास्तववादी शैलीतून अभंगातून केली. वरील बुद्दिभेदी खोटी घटना पूर्णपणे द्वेषातून आकसापोटी लिहली आहे...
    6)सर्वात महत्वाचे म्हणजे या घटनेला लेखकांना एकही पुरावा जोडता आला नाही..त्यांनी बातमीच्या सत्यतेसाठी एखाद्या वृत्तपत्राची बातमी तरी पुराव्यासाठी उपलब्ध करुण द्यायला हवी होती.खरं तर अशा बुद्दिभेदी कथा रचुन बदनामी करने हेच या लेखाचे उद्दिष्ट दिसत आहे..

    *सरतेशेवती माहितीसाठी...*

    📌महाराष्ट्र अंनिसची चतुःसूत्री..
    1)शोषण,फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धाना विरोध करणे...
    2)वैज्ञानिक दृष्टिकोणाचा प्रचार,प्रसार आणि अंगीकार करणे...
    3)धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करणे...
    4)समविचारी संघटनाना जोडून घेणे...

    📌संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम ,गाडगेबाबा,तुकडोजी महाराज या आणि अशा सर्व संतांनीच अभंगातून आणि प्रत्यक्ष कृतीतून अंधश्रद्धा निर्मूलनाचा पाया घातला आहे...मअंनिस याच संत-समाजसुधारकांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम करते...
    📌 तोडफोड करणे, विध्वंस करणे अशी अंनिसची कार्यपद्धती कधीच नव्हती आणि नाही.
    📌तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात की,
    *सत्य सत्यें देतें फळ|*
    *नाहीं लागतची बळ||*
    याचपद्धतीने आपणासमोर सत्य मांडले आहे...वैचारिक विरोधकांनी मुद्दाम पसरवलेल्या बुद्दिभेदी प्रचाराला बळी पडण्याआधी...
    _मित्रहो...एकदा विचार तर कराल...?_

    *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विवेकी मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद करू इच्छिते...*

    ReplyDelete
  3. संजीवन समधी बद्दल छान माहिती मिळाली.

    ReplyDelete