आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Sunday, December 18, 2011

शिवरायांचे मंदिर ??


नमस्कार मित्रहो,

गेल्या काही दिवसांपासून मनाला एक गोष्ट खूपच खटकत आहे, पण मनात ठेवल्याने बैचैन देखील होणारच म्हणून तुम्हा सर्वांसमोर मांडण्याचा अट्टाहास..

लोहगाव पुणे येथे ५ एकराच्या परिसरात फ्रेंच मधील एक गृहस्थ शिवरायांचे मंदिर उभारणीचे काम करत आहेत हि गोष्ट तुम्हाला माहितीच असेल..
...
मानवी कर्तुत्व आणि त्यांच्या स्थितीसापेक्ष परिसीमांना दैवी आधार देणे हे माझ्या मते खूप चुकीचे आहे,
छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य स्वतःच्या मनगटावर उभे केले आहे ना कि त्यांच्या मध्ये दैवी शक्ती होती ना कि ते चमत्कार करत असत.... हो ना ?
छत्रपती शिवाजी महाराज हे सह्याद्रीचे शूरवीर, आई जिजाऊ आणि शहाजी राजांचे पुत्ररत्न, कुणाही मराठी माणसाचा गर्व, समस्त महाराष्ट्राचे जनक, आपणा सर्वांचे आदर्श आहेत.. हो ना ?

मग त्यांच्या या कर्तुत्वाला दैवी आधार किंवा दैवत्व देणे कितपत योग्य आहे ?

याउलट छत्रपती शिवरायांना राष्ट्रीय महापुरुष म्हणून घोषित केले गेले पाहिजे, गांधीऐवजी हिंदुस्थानाच्या चलनावर शिवरायांना दर्शविले पाहिजे, शिवाजी राजांचा फोटो प्रत्येक कार्यालयात मानाने लावला गेला पाहिजे..

स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकर्तुत्वाने, स्वताच्या हिमतीवर आणि सह्याद्री खोर्यातील काही मावळ्यासोबत केली आहे,

छत्रपती शिवाजी राजांना आई भवानी मातेने जी तलवार दिली त्याचा इतिहास म्हणजे शिवरायांना भवानी मातेने गडावर शिवरायांना स्वप्नात साक्षात्कार दिला आहे असा आहे..

माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आपले आदर्श आणि स्वराज्यासंस्थापक वीरपुरुष मानलेलेच योग्य ठरेल आणि आपला निश्चय असावा शिवरायांच्या स्वराज्याला बळकटी देण्याचा..शिवछत्रपतींच्या मार्गावर चालण्याचा......

आज पहिले मंदिर उभारले जात आहे, काही दिवसांनी ठिकठिकाणी शिवरायांचे मंदिर उभारले जाईल,

आपल्या पुढच्या पिढीला यातून चुकीचा संदेश जाण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही कि शिवाजी महाराज एक देवच होते आणि दैवी शक्तीच्या जोरावरच त्यांनी स्वराज्यनिर्मिती केली, माझ्या लहान बुद्धीप्रमाणे असे होणे चुकीचे आहे..

महाराजांचा पराक्रम, महाराजांचे शौर्य, महाराजांचे आयुष्य आज ४०० वर्ष होत आले तरी आपणा सर्वांना नेहमीच प्रेरणादायी ठरलेले आहे तसेच आजही जेव्हा जेव्हा आपण शिवचरित्र, बखरी वाचतो तेव्हा शिवरायांच्या पराक्रमाने अंगावर काटे उभा टाकतात, रक्त सळसळते .. नाही का ?

मग अशा शौर्याचे, अशा पराक्रमाचे, अशा आदर्शाचे, अशा थोर पुत्राचे, अशा माझ्या शिवरायांचे मंदिर बांधून त्यांना देव करणे कितपत योग्य आहे ?

महाराजांचा इतिहासच दाखवायचा आहे ना.... मग मंदिर कशाला तिथे तुम्ही संग्रहालय बांधत आहातच ना मग त्यालाच अतिभव्य का नाही करता येणार ?

मला कदापि नाही पटणार कि मी माझ्या शिवरायांना भेटण्यास मंदिराची घंटी वाजवून भेटावे..

शिवरायांना भेटावे तर त्यांच्या गडावर जावूनच, त्यांच्या पराक्रमातील त्यांच्या शौर्यातील घटनातूनच....नाही का ?

शिवरायांचा धगधगता इतिहास प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात कायम सळसळत राहिला पाहिजे......

या जगाला कायम स्मृतीत राहिले पाहिजे कि शिवाजी महाराजांसारखे ना कोणी झाले ना कोणी होणार..

माझे ज्ञान काही मोठे नाही परंतु हि गोष्ट नेहमी मनाला बोचत होती आणि राहवले नाही म्हणून तुम्हा सर्व मित्रपरिवारासमोर मांडत आहे, चुकले असेल तर सांगावे..

जय भवानी.... जय शिवराय .......

दिनेश सूर्यवंशी, तुळजापूर

3 comments:

  1. मूर्तीमध्ये स्थान असण्यापेक्षा मनात स्थान असणे महत्वाचे, अतिउत्तम

    ReplyDelete
  2. @महेंद्र रमेश राजेशिर्के:

    महेंद्रजी प्रथमतः ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, तसेच तुमच्या प्रतिक्रियेबद्दलहि धन्यवाद..
    ब्लॉगमध्ये काही सुधारणा हव्या असल्यास जरूर कळवावे..
    आभारी आहे..

    ReplyDelete
  3. @दिनेश सूर्यवंशीजी...

    मला शिवराय, त्यांचे किल्ले विचार यांबद्दल खूप अभ्यास करायचा आहे, कृपया मला आपला फोन न. पाठवा या ई मेल (rajemax21@gmail.com) वर , तसेच आपली भेट होईल भविष्यात अशी आशा करतो. कारण माघ एकादशी ला पंढरपूरला येणे होते दरवर्षी

    ReplyDelete