आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Friday, October 28, 2011

कसाबचे करिअर..

दहशतवाद ही भारताला भेडसावणारी एक गंभीर समस्या आहे. आपण 'पाक पुरस्कृत दहशदवाद' हा शब्द नेहमी वाचतो.
खरं म्हणजे प्रत्येक दहशतवादी हा पाक पुरस्कृतच असतो त्यामूळे तसे वेगळे सांगण्याची गरजच नाही. अशा दहशतवाद्यांना ईकडे भारतात येणे फारच सोपे आहे. त्यासाठी बाँग्लादेशातून येणे हा तर राजमार्गच म्हणायला हवा.
बाँग्लादेशी घुसखोरांसाठी आपला देश म्हणजे जणू हक्काची वसाहतच झालेला आहे. त्यांना कोणी चुकूनही हटकत नाही. उलट रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र वगैरे त्यांना लगेच कशी मिळतील ह्यांची खबरदारी घेणारे जागरूक आहेत.
एकगठ्ठा मतदान ज्यांना होते तेच ह्याचे सुत्रधार आहेत. दहशतवादी एकदा भारतात आले की त्यांना पोसणारे ,आश्रय देणारे इथे भरपूर आहेत.
 दहशतवाद्यांनी कुठेपण आपल्या मर्जीने बाँम्ब पेरावेत आणि आरामात निघून जावे कोणी विचारत नाही. बाँम्बस्फोट झाल्यानंतर संशयीतांचे रेखाचित्र प्रसिद्ध होते, ते तर स्वतः दहशतवाद्याला ओळखता येणार नाही.
चुकून समजा कोणी पकडला गेलाच तर तुरुंगात त्याच्यासाठी बिर्याणीची सोय असते.
त्यांना तर प्रसारमाध्यमे ईतकी प्रसिद्धी देतात जितकी ते पंतप्रधानाला पण देत नाहीत. डॉगी सिँग तर त्यांचा उल्लेख नावापूढे 'जी' लावून करतो. ह्या दहशतवाद्यांवर सुरक्षेच्या नावाखाली सरकार ईतका खर्च करते की त्याच्या ७पिढ्यांच्या पण स्वप्नात येणार नाही. कसाबची अम्मी त्याच्या धाकट्या भावाला म्हणत असेल की:-
''बघ, थोरल्याने नशीब काढले. कसा आरामात बिर्याणी खात जगतोय. तू पण जरा गांभीर्याने घे. आपल्या करीअरचा विचार कर''.


वरील लेख हा प्रिया पवार लिखित आहे.. ( प्रियाजी धन्यवाद परवानगी दिल्याबद्दल..)

1 comment: