"महाराष्ट्र" हे नाव प्रथम सातव्या शतकातील एका शिलालेखात आढळलं, तसंच ते एका चिनी पर्यटकाच्या प्रवास वर्णनात आढळलं.
रथी म्हणजे रथचालकावरुनही ते पडलं असावं. प्राचीन काळी रथ तयार करणे व चालविणाज्यांची एक भक्कम लढवौय्यी फौज होती -- त्यांना महारथी म्हणत असत.
इ.सं. ९० मध्ये वेदश्री नावाच्या राजानं पुण्याच्या उत्तरेकडे साधारणत: ३० मौलांवर जुन्नर हे त्याच्या राजधानीचं शहर वसविलं. १४ व्या शतकाच्या प्रारंभी उत्तरेच्या इस्लामी राज्यकत्र्यांनी देवगिरीच्या यादवांची सत्ता उलथविली. त्यानंतर पुढे तब्बल ९०० वर्षांच्या प्रदीर्घ काळाची महाराष्ट्राबाबत अथवा इथल्या प्रदेशाची काहीही ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही.
१५२६ मध्ये बाबर या मोगल राजाने दिल्लीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि त्यानंतर मोगल राजवटीनं लवकरच दक्षिण भारतात आपली सत्ता प्रस्थापित केली आणि त्यानंतर मात्र, अगदी १८ व्या शतकापर्यंत मोगल राजवट भारतावर राज्य करु शकली.
मराठयांच्या सत्तेचे म्हणजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर १६२७ साली झाला. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी रायरेश्वराजवळ स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली व त्याची सुरुवात वयाच्या १६ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून केली.
स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी आयुष्यभर घेतलेला ध्यास आणि त्यासाठी मोगल आणि इतर सुलतानी राजवटीं विरुध्द त्यांनी दिलेल्या अविश्रांत लढयाला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसान १६८० मध्ये झाले, पण तोपर्यंत अवघं दख्खन त्यांच्या छत्राखाली आलं होतं.
त्यांनी एक भक्कम प्रशासन यंत्रणा व सौन्याची उभारणी केली होती. त्यांनी मराठयांना दिलेल्या स्वराज्याच्या महामंत्रामुळे पुढे तब्बल १५० वर्षे, त्यांच्यावर अंमल गाजविणाज्या परकीय जुलमी सत्तेविरुध्द ते ताठ मानेनं लढू शकले. अक्षरश: पराकोटीच्या प्रतिकुल राजकीय परिस्थितीविरुध्द लढून शून्यातून स्वराज्य निर्माण करणाज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम इतिहासात अजोड आहे. त्यांचं मराठयांच्या इतिहासातील स्थान म्हणूनच सर्वोच्च आहे.
( गडवाट )

No comments:
Post a Comment