आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Friday, October 28, 2011

जयंतू हिंदू..जयंतू हिंदुराष्ट्रम....

आज खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला एकसंध होण्याची गरज आहे, जो तो आजकाल हिंदू धर्म कसा नष्ट होईल याचा प्रयत्न करताना दिसतोय, आणि आपण अखिल हिंदू मात्र एकसंध होण्याऐवजी वैयक्तिक जात हि कशी श्रेष्ठ आहे आणि इतर जाती कशा हीन आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न करताना दिसतोय, कधी इतिहासात एखाद्या जातीकडून झालेली चूक आपण घेतो, तर कधी एखाद्या विचारवंताने कशी चूक केली आणि तो आपल्या जातीसाठी कसा विरोधी होता, एवढेच नाही तर आजकाल तर महाराष्ट्राचे कुलदैवत शिवप्रभूबद्दल कि खरे गुरु कोण यावरही हिंदू मंडळी आपापसात भांडते आहे..
आपण सर्व का विसरत आहोत कि शिवप्रभूंनी रायरेश्वरासमोर "हिंदवी" स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती.. न कि कुण्या एका विशिष्ट जातीसाठी..
स्वजातीचा अभिमान हा हवाच परंतु त्यागोदर अभिमान असावा "हिंदू" असल्याचा..
इतिहास असतो त्यातून शिकण्यासारखे घ्यायला आणि ज्या चुका झाल्या त्या आपण कशा भविष्यात दुरुस्त करूत हे पाहण्यासाठी, परंतु दुर्दैव आजकाल या इतिहासामधील झालेल्या चुकांचा गैरफायदा घ्यायलाच आजकाल बहुतेक मंडळींना धन्यता वाटते..
चला आपण आजपासून नव्हे तर याघडीपासूनच जातीभेद विसरून एकसंध हिंदुराष्ट्र निर्मितीसाठी कटिबद्ध होण्याची शपथ घेउत..
जेव्हा हिंदुस्थानातील अखिल हिंदू एकसंध होईल तेव्हा काय कुणाची टाप असेल आपणास कमी लेखायची ते पाहूनच घेउत......

जयंतू हिंदू..
जयंतू हिंदुराष्ट्रम.... 

No comments:

Post a Comment