आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Friday, October 28, 2011

छत्रपती संभाजी महाराज-एक उपेक्षित लढवैय्ये

इतिहासाचे अभ्यासक मिलिंद कारेकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर लिहलेला हा लेख.

त्या दिवशी असाच बोलता बोलता शिवाजी महाराजांचा विषय निघाला आणि कुणीतरी म्हणाले कि , ' शिवाजीने जितके केले , तेसगळे संभाजीने फुकट घालवले. ' आज हि भरपूर जणांना इतकीच माहिती आहे की , संभाजी महाराज म्हणजे विलासी आणिगाण्या बजावण्यात मश्गुल राहणारे होते. आणि त्यांना जेव्हा औरंगजेबाने पकडले तेव्हा त्यांचा अमानुष छळ केला.

पण कुणी हा विचार करतो का की , ज्या शिवाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यावर फक्त कैद करून ठेवले , तिकडे संभाजीमहाराजांचे इतके हाल करायचे कारण काय ? असे काय घडले होते , की औरंगजेब इतका दुखावला होता ? महाराजांनी औरंगजेबाची सुरत दोन वेळा लुटली , ( ह्या गोष्टीमुळे औरंगजेबाने केला नसेल इतका राग आजही काही गुजराती माणसेमहाराजांचा करतात. त्याच्या मामाची म्हणजे शाहिस्तेखानाची बोटे कापली. पण त्याचा बदला म्हणून देखील औरंगजेबमहाराजांचे बोट वाकडे करू शकला नाही , मग नेमके संभाजी महाराजांनी असे काय केले होते की , त्यांच्याबद्दल औरंगजेबाच्यामनात इतका राग होता ?

काही गोष्टी आपण विसरतो त्या म्हणजे महाराजांचे बालपण हे जिजाऊंच्या देखरेखी खाली गेले तर संभाजी महाराजांची आई ,सईबाई ह्या संभाजीच्या लहानपणीच वारल्या होत्या. जिजाऊ होत्या तो काळ संभाजी महाराजांच्या आयुष्यातला चांगला कालावधी आहे. पण तरी शिवाजी महाराजांना जेव्हढा जिजाऊंचा सहवास लाभला तेव्हढा संभाजीमहाराजांना लाभला नाही.शिवाय वेळ प्रसंगी आई जेवढी कठोर होवू शकते तेवढी आजी होत नाही , हे उदाहरण आपण आपल्या घरात देखील बघू शकतो.

शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते तर संभाजी महाराज हे युवराज होते , त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायलाते राजबिंडे होते. उंची ६ फुट ३ इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेचत्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजीमहाराजांनी मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला तेव्हा , तहाची पूर्तता होत नाही तोवर मिर्झाराज्यांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले तेव्हा दिलेलखानाने त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिलाआणि विचारले कि , ' इतका मोठा हत्ती तुम्ही दक्खनला कसा काय घेवून जाणार ?' तेव्हा शंभूराजे म्हणाले की , ' हत्ती तर आम्हीकसा ही घेऊन जाऊ , पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता येतील ह्याचा आम्ही विचार करतोआहोत .' दिलेलखान तर सोडा पण हे असले फटके संभाजी महाराजांनी वेळोवेळी औरंजेबाला सुद्धा लगावलेले आहेत.

औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता.आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते , जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागलेआणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते , ' तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तानसोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्या बद्दल सांगितलं . तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं . त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवलानव्हता . तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देवून ठेवला आहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहानाहीत . हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे . त्या साऱ्यांचेच हजरत बादशहा आहेत . जी गोष्ट मनात ठेवून ते यादक्खनच्या पठारावर आले ती आता साध्य झाली आहे . त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्तानांत परत कूच करावं .एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत . पण बादशहा अशीच आपली जिद्दचालवणार असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्तानात जाणार नाहीत . त्यांची तशीच इच्छा असेल तरत्यांनी आपल्या कबरीसाठी या दक्खनमध्ये लवकरच जागा शोधलेली बरी .’ [संदर्भ:शहेनशहा , ना.स.इनामदार]

युवराज असून देखील दुर्दैवाने त्यांना योग्य तो मानमरातब मिळाला नाही. घरातील बेबनावांमुळे शिवाजी महाराजांनी त्यांना स्वतःसोबत कर्नाटकच्या मोहिमेवर न घेता , श्रीरंगपुरला सुभेदार म्हणून धाडले. श्रीरंगपुर संभाजी महाराजांची सासुरवाडी होती.कर्नाटकच्या मोहिमेवरून परतत असताना महाराजांच्या स्वागतासाठी संभाजी महाराज श्रीरंगपुरच्या वेशीवर उभे होते पण शिवाजी महाराज पन्हाळा , सातारा , महाबळेश्वर मार्गे रायगडावर परतले. सगळ्या प्रजे समोर संभाजी महाराजांचा केव्हढा मोठाअपमान झाला असेल ? मानसिंगाच्या पाठीमागे उभं केल्यावर ज्या राजाला अपमानित वाटलं आणि भर दरबारात महाराजांचा आवाज चढला. बापाचा स्वाभिमान जवळून पाहिलेल्या त्यांच्या मुलाने असा अपमान झाल्यावर बंड केले नसते तरच नवल.



मराठेशाहीचे दुर्दैव हे कि संभाजी महाराज वयाच्या ३२व्या वर्षी औरंगजेबा समोर गुडघे न टेकता मातृभूमीसाठी मरणाला बहाद्दुरीने मिठी मारणार्‍या राजा बद्दल जेव्हा सकाळच्या ८:२०ची लोकल पकडण्याची काळजी करणारा आम आदमी , ''शिवाजीने जितके केले , ते सगळे...... '' बोलून अक्कल पाजळतो तेव्हा चीड येते

2 comments:

  1. धर्मवीर शंभूराजांना त्रिवार मुजरा

    ReplyDelete
  2. Khup sundar lekh !!

    ReplyDelete