आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Friday, October 28, 2011

तेहतीस कोटी देवांचे कोडे

मित्रहो,
मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट "उगीचच" या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे की आपले ज्ञान कमी पडतेय.
आता नमनालाच घडाभर तेल न ओतता मूळ विषयाला हात घालतो.

तेहतीस कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे हे मी एक संस्कृतचा अभ्यासक म्हणून ठामपणे सांगतो. खर तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो Degree किंवा सोप्या भाषेत, "प्रकार". कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. शिवाय आपण गणितात "बैजिक पदांच्या कोटी" ही संज्ञा वापरतो तेथेही हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रश्न असा येईल की हे तेहतीस "कोटी", म्हणजे ३३ प्रकारचे देव नेमके कोण? तर त्यांची नावे देतो.

धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)

धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)

हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)


आणि याखेरीज २ अश्विनीकुमार!

असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात. आता तुम्ही कुणाही प्राश्निकास हे उत्तर देऊ शकता, मी व्यवस्थित संदर्भही दिले आहेत.



© विक्रम श्रीराम एडके (edkevikram@gmail.com)

2 comments:

  1. उत्तम लेख. धन्यवाद. अशा संकल्पनांचा उलगडा करून सांगण्याचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. या मागील विज्ञान देखील उलगडले गेले तर आणखी उत्तम. उदा. या तेहेतीस प्रकारांची जी नवे दिली त्यांचे अर्थ काय. तसेच हे देव गाईच्याच पोटात असतात असे का?

    ReplyDelete