आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Monday, November 28, 2011

श्री सद्गुरू महिमा

साधारणत: खरे गुरु शिष्याकडे काहीच मागत माहीत. गुरुच्या ज्ञानाबरोबरच त्याची त्याच्या शिष्याला ते देण्याची इच्छा जास्त महत्वाची आहे. शंकर महाराजांसारखे सिद्ध पुरुष सिगारेट ओढत, गजानन महाराज चिलीम ओढत.....मग ते वाईट होते का? नाही...आयुर्वेद आणि वेद असे सांगतात की दोष आहे म्हणून जन्म आहे. आपण सगळे हो सगळे अगदी माझ्यासहित दोषयुक्त आहोत म्ह...णूनच आपल्याला जन्म. चांगल्या वाईट गोष्टी प्रत्येकात असतात. चांगल्या गोष्टींचा जास्त आविष्कार जो करतो तो चांगला माणूस आणि वाईट गोष्टींचा जास्त आविष्कार करतो तो वाईट माणूस.

एखाद्या व्यक्तीचे तन आणि मन अतिशुद्ध झाले की तो देहात रहात नाही. त्यांचा देह आपोआप सुटतो. म्हणून मग कार्य करता यावे म्हणून शंकर महाराज, गजानन महाराज हे वरील गोष्टी करत होते. त्या गोष्टींचा दुसरा फायदा हा की यामुळे जी निंदा होते त्यामुळे कर्म करताना होणारे, किंवा भक्तांचे ओढवून घेतलेले दु:ख या निन्देने नष्ट होण्यास मदत होते. आपली भक्ती खरी असेल तर सद्गुरू स्वत: भक्ताकडे येतात हे अगदी खरे आहे. ज्याला पोहता येत नाही त्याला गुरु करावाच लागतो. त्यामुळे "भक्तीमार्गात" तर गुरूची किंवा सद्गुरूंची सर्वात जास्त आवश्यकता. कारण भक्तीमार्गात साधारणत: सामान्य माणूसच असतो. राजयोग, ज्ञानयोग या मोठ्या लोकांच्या गोष्टी. तसेच खरे तर गुरु हा प्रत्येकाच्या पात्रते प्रमाणे आणि त्याच्या Wavelength शी जुळणार्या Wavelength चा मंत्रच किंवा उपासनाच त्या त्या भक्ताला किंवा शिष्याला देत असतात. पारनेरकर महाराजांचे उदाहरण याबाबतीत देता येईल. हे झाले देवच हवा असलेल्या भक्तांबाबत. पण सद्गुरुंकडे जाणारे बहुतेक भक्त हे "गौणी" भक्ती असलेले असतात. म्हणजेच त्यांना भक्तीच्या बदल्यात काहीतरी हवे असते. त्यामुळे मग गुरु त्या सगळ्यांना वेगवेगळे मंत्र न देता एकाच मंत्र देतात. की जो त्यांनी स्वत: सिद्ध केलेला आहे. आणि गुरुमुखातून आलेल्या त्या मंत्राचे सामर्थ्य काय वर्णावे? गुरुचरित्र सांगते ब्रह्मा म्हणतो की "गुरु" या शब्दातील "गु" कार म्हणजे सिद्धगण महिधामा! "र" फार भस्मरक्षा पापांची...! "उ"कार तो उत्तम पुरुष विष्णू जाण ! तिघांमेळी सत्यगुरुचे अधिष्ठान ! .....आणि पुढे म्हणतात रक्षी न कोणी गुरु कोपता... असो......माझ्या गुरुदेवता कलावती आई म्हणायच्या की Laundry मध्ये धुवायला मळलेले कपडेच जातात. तसे आपण सारे जण मनाने अतोनात मळलेले असल्याने सद्गुरुंकडे आपल्याला जायलाच हवे. त्या शिवाय योग्य मार्ग आपल्याला मिळणार तर नाहीच आणि आपला मी कोणीतरी विशेष आहे, किंवा "मी आहे" हा अहंकार नष्ट होणार नाही. मग साक्षीभावही येणार नाही. आणि साक्षी भाव येत नाही तो पर्यंत आपण या भयंकर मायेच्या कचाट्यातून सुटणार नाही. त्यामुळे सद्गुरू देवोभव ...आपल्याला लहानपणी चालायला शिकवणारी, बोट धरून लिहायला वाचायला शिकवणारी आई आपली पहिली गुरु. जगात वागायला शिकवणारे वडील आपले दुसरे गुरु. शाळेतील शिक्षक तिसरे गुरु...गुरूंची ही लिस्ट संपत नाही जन्मभर....हो...अगदी सिगारेट ओढायला, दारू प्यायला आणि गुटखा खायला शिकवणारे गुरूच....रस्त्यावर दुसर्या गाडीला धडकल्यावर "काय राव नीट चालवा ना गाडी" म्हणणारे गुरूच.....मग हे गुरु असल्यावर आपल्याला त्याचे महत्वही कळत नाही आणि वाईट गोष्टी शिकवणार्या गुरुंबद्दल रागही येत नाही. मग सद्गुरू तेव्हढेच का नकोत बरे? आई आपल्या बाळाला जन्म देण्यापूर्वी ९ महिने कधी होताहेत याची वाट बघते... पण सद्गुरूंनी एकदा तुमचे बोट धरले की मग ते तुमचे बोट जन्मोजन्मी सोडत नाहीत. बघा तर अनुभव घेऊन.....गुरूबिन कौन बतावे बाट? बडा बिकट यमघाट गुरूबिन......आज एव्हढेच मित्रांनो....

अमावास्या आणि पौर्णिमा

सूर्याभोवती फिरणार्या बर्याच ग्रहांना उपग्रह आहेत. तसाच चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तो पृथ्वीच्या खूप जवळ असल्याने त्याचा त्याच्या वरच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीवरच्या पाण्यावर आणि पाण्यावरच काय भूमीवरही खूप परिणाम होतो. चांद्रमास गणनेप्रमाणे भारती ओहोटी यांची वेळ बदलते यावरून आपण हे नक्की म्हणू शकतो. चंद्राच्या पृथ्वी च्या भोवती होत असलेल्या परिभ्रमणामुळे चान्द्र्मासाच्या ४ थ्या, ५ व्या, ८ व्या, ११ व्या, १४ व्या, १५ व्या, १९ व्या, २३ व्या, २९ व्या आणि ३० व्या दिवशी पृथ्वी आणि आपले शरीर चंद्राच्या अगदी समोर येते. यावेळी समुद्राच्या आणि शरीरातील पाण्याच्या पातळीत वाढ होते. आणि सध्या चालू असलेल्या संशोधना वरून हे नक्की दिसून आले आहे की अमावास्या पौर्णिमेला वेड्यांच्या [लुनातिक- वेडे आणि लुनार- चंद्र] वेडात वाढ होते.

 एपिलेप्सीचे झटके जास्त येतात. शरीरातील नुसते पाण्यात बदल होत नाहीत तर त्यातील क्षार, हार्मोन्स आणि विद्युत प्रवाह यातही फार मोठे बदल याच वरील काळात होत असतात. पालेभाज्यान मधेही खूप मोठ्या प्रमाणात पाणी आणि क्षार असतात. अमावास्या आणि पौर्णिमेला शारीरातील पाण्याचे प्रमाण वाढून उष्णतेचे प्रमाण घटते आणि त्यामुळे शरीरात वायू वाढून तो वायू डोक्यात शिरतो, माणूस मन:स्वास्थ्य गमावतो, शारीरिक स्वास्थ्य गमावतो आणि वेडेच काय चांगला माणूसही मग वेड्यासारखा वागू शकतो. म्हणूनच या वरील सर्व दिवशी पाणी कमी प्यावे. शक्यतो उपवास करावा. खाल्ले नाही तर तहानही कमी लागते आणि शरीरातील पचन व्यवस्थेलाही आराम मिळतो. त्या दिवशी खजूर, राजगिरा, दुध असा कमी खाऊन जास्त शक्ती देणारा आहार घेताला जातो. पूर्वी अनशन/उपोषण -अजिबात न खाणे, चांद्रायण, कृचछ चांद्रायण असे वेगवेगळे उपवास असत. "उपवास" म्हणजे च्या जवळ राहणे. हा "च्या" म्हणजे देव. मनाने त्याच्या जवळ राहणे अभिप्रेत आहे. सध्या खाल्या जाणार्या साबुदाण्याच्या खिचडीतील एकही पदार्थ भारतीय नाही. तरी खिचडी उपवासाला खाल्ली जाते. खिचडी खाऊन देव प्रसन्न होत असेल तर रोज खा...तो येऊन मिठी मारेल. मुळात साबुदाणा "Tapioka " नावाच्या एका परदेशी झाडा पासून बनवला जातो. त्याचा गार काढून सडवायला पसरून ठेवला जातो. तो पुरेसा चिकट झाला [की त्यात किडे वळवळायला लागतात.] की मग तो मेष मधून गाळून त्याच्या बारीक गोळ्या करून वाळवल्या जातात. हाच तो आपला पवित्र साबुदाणा की ज्याने देव प्रसन्न होतो. असो. तर उपवासाच्या दिवशी "लंघन" हे खरे तर अपेक्षित आहे. त्याउलट आपण खात असतो...केळी, रताळ्याचे काप, [गणपतीसाठी मोदक-तळलेले ]शेंगदाण्याची आमटी, वर्याचे तांदूळ, बटाट्याचे पापड, बटाट्याची उपासाची भाजी, खजूर, राजगिरा लाडू, काकडीची कोशिंबीर....आणि....जाऊ दे.... सगळ्या धर्माचीच खिचडी झालेय...तर पृथ्वीच्या कक्षेत किंवा वेगवेगळ्या ग्रहांवर पाठवली जाणारी "याने" देखील "एकादशी" किंवा या वरील दिवशीच पाठवली जातात. एकादशी सांसारिक कामांसाठी उपयुक्त मुळीच नाहीये. व्यवहारात उलट अपयशच येईल त्या दिवशी हे वरील सर्व दिवस फक्त आणि फक्त "उपासनेलाच" अनुकूल आहेत. उपासाच्या दिवशी केला जाणारा "फराळ" हा "फल आहाराचा" अपभ्रंश आहे. आपण "फळ आहार" सोडून बाकी सारे काही खातो. अमावास्येला अंधार असल्याने म्हणजेच प्रकाशाचा अडसर नसल्याने "उपासने मध्ये" केल्या जाणार्या मंत्रांचा आपल्या आकाश गंगेच्या केंद्राकडे जाण्याचा वेग हा जास्त असतो. आपली आकाशगंगा ही दोन बशा एकावर एक एकमेकींकडे तोंड करून ठेवल्या तर जसा आकार होईल तशी आहे. आणि त्याच्या मध्यातील मूळ नक्षत्रा मध्ये या आकाश गंगेचे केंद्र आहे. उपासना ही तेथे जाणे आवश्यक आहे. "प्रकाश" म्हणजे "पोकळीला आवरीत करत किंवा आवरण घालीत जाणे". मग हे असे आवरण घातल्यावर अडथळा येणारच ना? अमावास्येला चुंबकीय लहरी आणि प्रकाश लहरींचा अजिबात अडथळा नसल्याने आपली उपासना लवकर फलद्रूप होऊ शकते. आणि त्या दिवशी लंघन केल्या मुळे ढेकरा येणे, वायूचा त्रास होणे, जड वाटणे, झापड येणे अशा गोष्टी न होता साधनेत लास्ज लागते. आणि म्हणूनच दिवाळीत लक्ष्मी पूजन अमावास्येलाच असते. हिंदू संस्कृती म्हणूनच म्हणते....असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृतोर्मा अमृतमगमय.....आपल्याला असत्या कडून सत्याकडे जायचे आहे, अंधाराकडून प्रकाशाकडे जायचे आहे आणि मृत्यूकडून अमृत तत्वाकडे जायचे आहे. असो. आज इथेच थांबतो. पुन्हा भेटू.

उपवास आणि फळे...

आपण या आधी उपवासाची माहीती घेतली आहे. आज आपण उपवासाला फळे का खाल्ली जातात ते पाहू या.

उपवासाला फळे यासाठी खाल्ली जातात की फलाहारात पाणी असले तरी ते संतुलित प्रमाणात असते. फळे खाल्याने जास्त तहान लागत नाही. पाणी सुद्धा शरीराला पचवावेच लागते. इथे हे नमूद करावेसे वाटते की "गार" पाण्यापेक्षा "गरम" पाणी पचतेही लवकर आणि पचनाला मदत सुद्धा क...रते. "गरम" पाण्याने वायू सरकतात. पोट साफ रहाण्यास मदत होते. फळातले पाणी शरीराला पचवण्याचा वेगळा ताण देत नाहीत. त्यातील "Enzymes " म्हणजेच "विकर" हे पचनाला अतिशय उपयुक्त असतात. म्हणून एरवीही उपास नसताना "फळे" ही जेवणानंतर नाही तर जेवणा आधी खावीत म्हणजे त्यातील या "Enzymes " मुळे शरीरात अन्न पचवण्यास पोषक असे वातावरण तयार होऊन अन्न नित पचते. त्यातील ग्लुकोज, फ्रुक्टोज वगैरे शर्करा म्हणजेच साखर ह्या पुर्वपाचीत असतात. म्हणजेच फळ खाल्ले की अतिशय कमी श्रमात ते शरीराला फायदा करून देते. त्यातील "Minerals " म्हणजेच विविध क्षार आणि जीवनसत्वे हे अतिशय योग्य प्रमाणात आणि शरीरातील आवश्यक घटकांची पूर्ती करणारे असतात.
तसेच "प्रत्येक" ऋतू मध्ये येणारी फळे ही त्या वातावरणाला साजेशी म्हणजेच त्या ऋतूतील त्या वातावरणात शरीराला आवश्यक अशीच असतात. उदा. उन्हाळ्यात येणारा आंबा आणि त्याचे रूप कैरी...ही आवश्यक आहे उन्हाळ्यात घामाने खूप जास्त क्षार शरीराबाहेर जाऊन येणार्या थकव्यावर...कैरीतील "आम" म्हणजेच "Acid " आणि भरपूर क्षार शरीराचा थकवा पटकन घालवतात. म्हणूनच भरपूर गूळ, मीठ, वेलदोडा[ पाचक] घातलेले पन्हे उन्हातून आल्यावर घेतले की कसे गारेगार आणि समाधानी वाटते. आम्बरसाने तरुणांना आवश्यक शक्ती पटकन मिळते. हिंदू धर्मात ठायी ठायी माणसाचे शरीर, समाज, निसर्ग, खगोल, भूगोल....आणि बरेच काही याचा सतत विचार केला आहे आणि ते धर्माच्या नुसत्या गोड नाही तर पाचक गोळीतून हिंदू धर्मियांना दिले आहे.
शिवाय निसर्गोपचार शास्त्रानुसार आंबट फळे की ज्यात "Acid " असते ती दुधाबरोबर खावीत...उदा. संत्री, मोसंबी, लिंबू वगैरे...की ज्यामुळे दुध पचते. हा पण दुधात घालून त्याचे "फ्रुट सलाड" करून नाही...तर दुध घेण्याआधी किंवा दुध घेतल्या नंतर. तसेच गोड फळे ही ताका बरोबर खावीत. उदा. चिकू, केळी वगैरे...इथे आंबा हा गोड असला तरी या नियमाला अपवाद आहे. तो मात्र दुधाबरोबर खायचा असतो. दुधाबरोबर आंबा खाल्याने तो उत्तम पचतो आणि उष्ण पडत नाही. शिवाय अनेक फळे ही त्या त्या परदेशातील विशिष्ट हवामानानुसार तेथे येत असतात. निसर्गाने ही माणसाची करून ठेवलेली उत्तम सोयच आहे. उदा. नारळ, तिळ आणि राई. ही अनेक गोष्टीत वापरली जाणारी पण "तेल" बनवण्यासाठी वापरली जाणारी फळे किंवा तेलबिया पाहिल्या तर "नारळ" हे थंड आणि त्याच्या पाण्यात सगळे क्षार, जीवनसत्वे [त्यात फक्त Acid नाही म्हणून नारळ पाण्यात लिंबू पिळून घेतल्यास त्याची परिणामकारकता वाढते. ] आणि गरात भरपूर पिष्टमय पदार्थ आणि प्रथिने असलेले असे हे अमुल्य फळ अत्यंत उष्ण आणि दमट हवामान असलेल्या कोंकण किनारपट्टी, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या पंच द्रविड प्रदेशात मोठ्या प्रमाणात उगवते. आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणात वापर येथे केला जातो उष्ण आणि दमट हवेने शरीर पिचते. खंगते. येथे नारळ अतिशय उपयुक्त आहे. मध्य, पूर्व आणि उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश, गुजराथ या भागात शेंगदाणा आणि तिळ ही तेलबियांची पिके होतात. यांची तेले येथल्या "समशीतोष्ण" हवेत पोषक आहेत. तर उत्तर मध्य प्रदेश पासून वरील जवळ जवळ सगळ्या थंड हवामानाच्या प्रदेशात "राई" सारखे उष्ण तेल वापरले जाते. आणि ते तेथे उत्तम उगवते देखील.
म्हणून उपवासाला ज्यांची पचनशक्ती चांगली आहे त्यांच्यासाठी केळी, चिकू, आंबा ही फळे उपयुक्त आहेत तर दुर्बल पचन असलेल्यांना संत्री, मोसंबी, सफरचंद, बोरे, पपई ही फळे अतिशय उपयुक्त आहेत. पपयीची फळे आणि "पाने" देखील "प्रोटीन" च्या पचनासाठी अतिशय उपयुक्त आहेत. "जांभळे" हल्ली इकडे तिकडे वाचून "मधुमेही" लोकांना उपयुक्त आहेत हे तर सगळ्यांना माहित झाले आहे. पण ती एकतर उपाशीपोटी खाऊ नये आणि जास्त प्रमाणात खाऊ नये नाहीतर ती "उपाया" पेक्षा "अपायच" जास्त करतात. असो या "फळ पुराणाचे " "फळ" सर्वाना मिळो ही प्रार्थना देवाकडे करून ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सु"फळ" संप्रूण[संपूर्ण].
!! इति लेखनसीमा !!
Dr हेमंत उर्फ कलादास.....

श्री शिवशंकर

बऱ्याच वेळेला श्री शिवशंकर हे संपूर्ण निळ्या रंगात दाखवले जातात. ते संपूर्ण निळे नसून आपण रामदास स्वामी लिखित लवथवती विक्राळा ही आरती नीट म्हंटली किंवा ऐकली तर आपल्या लक्षात येईल की ते "कर्पुरगौरा भोळा...." म्हणजे कापरासारखे पांढरे शुभ्र आहेत. त्यांचा फक्त कंठ निळा आहे. त्यांचा संपूर्ण परिवाराच "पांढरा शुभ्र" आहे. त्यांचा वास आहे तो हिमालय पांढरा शुभ्र, त्यांच्या जटेतील गंगा पांढरी शुभ्र, त्यांची पत्नी "गौरी" नावातच गोरेपणा आहे तीही गोरीच आहे नावाप्रमाणे, त्यांच्या समोरील नंदी [ या नंदीची आत्यंतिक अवस्था म्हणजे "आ"नंदी" किंवा "आनंद". ] हाही पांढरा शुभ्र.
एका शापामूळे शंकरांना पृथ्वीवर मूर्ती रुपात न पूजले जाता "पिंड" किंवा "लिंग" स्वरूपात राहावे लागते आहे. शिव हा शब्द " विश" [म्हणजे प्रवेश करणे- विसा हा इंग्रजी शब्दही या वरूनच आला आहे अगदी अर्थासहित... ] या शब्दावरून आला आहे, आणि तो अक्षरश: त्याच्या कामाच्या स्वरूपावरूनच घेतला गेला आहे. त्याचा संबंध मी इथे सरळ सरळ न देता आपण तो पुढील संपूर्ण वर्णन वाचून लावून घ्यावा अशी विनंती करतो......

"पिंड" या शब्द जे सूक्ष्मात आहे तेच स्थुलात आहे, जे पिंड म्हणजे एक "पेशीत" आहे तेच देहात आहे आणि अणुरेणूत आहे तेच ग्रहमाला, आकाशगंगानमधेही आहे हे दर्शवतो.
लिंग आणि अंग असे देहाचे दोन भाग असतात. अंग हे मुख्य असते. शिवलिंग हे वरील लिंग आणि ज्यावर ते लिंग आहे ती शाळुंका अशा दोन भागांनी बनलेले असते. हे स्त्री आणि पुरुषांच्या मिलनाचे प्रतिक आहे. त्यातून वाहणारे पाणी हे पवित्र नसून त्याज्य असते. ते पिवू किंवा अंगावर उडवून घेऊ नये. आणि म्हणूनच ते ओलांडायचे नसते. शंकरांच्या प्रदक्षिणेला "सोमसूत्री" प्रदक्षिणा असे म्हणतात. म्हणजे जिथे शाळुंका संपते तेथ पर्यंत जाऊन पुन्हा उलट फिरून उलट्या बाजूने शाळून्के पर्यंत जाऊन पुन्हा समोर येणे. इथे १ प्रदक्षिणा पूर्ण होते. प्रदक्षिणा म्हणजे- प्र- पुढे जाणे आणि दक्षिणा म्हणजे आपल्या उजव्या बाजूला....आपल्या उजव्या बाजूला म्हणजे सव्य गतीने अथवा Clock Wise Direction ने पुढे जाणे म्हणजे प्रदक्षिणा... पृथ्वी,चंद्र, ग्रह, तारे, अणु, रेणू हे सगळे गतिशील आहेत. आणि तेही फिरत आहेत मग आपणही जर योग्य पद्धतीने फिरलो तर एक विधायक, निर्मितीक्षम आणि जीवन बदलून टाकणारे कार्य करत असतो. म्हणून प्रदक्षिणा करायची.
शंकरांची पिंडी ही स्त्री पुरुष मिलनाची प्रतिक असल्याने आणि पूर्वीच्या ऋषीनच्या अभ्यासानुसार त्यातून होणारी आत्यंतिक उर्जा निर्मिती ही रजस्वला म्हणजे पाळी चालू असलेल्या स्त्रियांच्या दृष्टीने घातक असल्याने त्यांनी शिव मंदिरात जाऊ नये असा दंडक होता. त्यात स्त्रियांना कमी लेखण्याचा प्रश्नच नव्हता. आता सर्वांनाच जसे माहित आहे की पिरामिड च्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामूळे त्यातून अत्यंत अचंबित करणारी उर्जा निर्माण होते. त्यात भाजी, फळे, दुध कित्येक दिवस खराब न होता रहाते. ब्लेडला परत धार येते, आरोग्या साठी उपयोग होतो...वगैरे...त्या प्रमाणेच शिवपिंडीच्या वैशिष्ठ्यपूर्ण आकारा मूळेही प्रचंड उर्जा निर्मिती होते.
आपण जर नीट पाहिले तर सध्याच्या अणुभट्टीची रचना आणि कार्य हे देखील बरोबर शिवपिंडी प्रमाणेच चालते. त्यातही फिजन पद्धतीने अणु उर्जा निर्माण केली जाते आणि भोवती फिरवलेले पाणी गरम होते ते वापरून उर्जा निर्माण केली जाते, हेही पाणी त्याज्यच असते. अशीच उर्जा शिवपिंडीतही तयार होत असते.
सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखीप्रवण क्षेत्रात शंकरांची "बाराही ज्योतिर्लिंगे" आहेत. "ज्योती" या नावातच तेथील अग्नी दिसून येतो आहे. शिव पिंडीवरील भस्माच्या तीन पट्ट्यांमध्ये वेडेवाकडेपणा आला की पृथ्वीच्या पोटात काही हालचाल चालू आहे असे अनुमान लावीत असत. पूर्वी ऋषीनी असे अनेक वेगवेगळे प्रयोग केले होते.
पिंडी मधेही ५ तत्वाननुसार आकाशलिंग, वायूलिंग, अग्निलिंग, जललिंग आणि भूलिंग किंवा पृथ्वीलिंग असे ५ प्रकार आहेत. आपल्याला माहित असलेल्या रामायणातील गोष्टीप्रमाणे श्री शंकरांनी रावणाला दिलेले लिंग हे "भूलिंग" होते. त्यामुळे ते त्याने पृथ्वीवर ठेवल्यावर पृथ्वीरूप होऊन गेले अर्थात चिकटले.

आपले ऋषी मुनी हे फार मोठे संशोधक होते. फक्त त्यांची परिभाषा वेगळी होती, आपली आजची विज्ञानाची परिभाषा वेगळी म्हणजे मुख्यत:ग्रीक आहे. पण म्हणून ऋषी हे चुकीचेच होते असे अभ्यास न करता म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल. त्यांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथातील अर्थ नेहमीच्या आणि आजच्या काळाशी सुसंगत असा, शोधून काढणे हे आपले परमकर्तव्य आहे.
शिव शंकर हे तिन्ही काळ, त्रिलोक, जन्म, स्थिती आणि मृत्यू या तीनही अवस्थांना जिंकणारे आहेत म्हणून ते त्रिशूलधारी. अणु अवस्थेत ते "विरागी, संन्यासी म्हणजेच "Neutron" म्हणजे जे Neutral राहतात...[विष्णू हे प्रोटोन आणि ब्रह्मा हे इलेक्ट्रोन].त्यांचे "तांडव नृत्य" अणुगर्भात सततच चालू असते.
वरील वर्णनात काही चूक असल्यास जाणकारांनी जरूर दाखवावी.
माझ्या या ग्रुपवर मला संमिलीत करून घेतल्या मूळे मी लगेच हा लेख सुरवात म्हणून देत आहे. आपले प्रेम, स्नेह सतत माझ्या बरोबर राहू देत हीच प्रार्थना...

गणेश विज्ञान

मुळात गणपती हा प्रत्येक घरात, घरातील कर्त्या पुरुषाने स्वत: मातीने बनवून, त्याचे पूजन करावयाचे असते. या गणपतीला "पार्थिव" गणेश असे म्हंटले आहे. "पार्थिव" म्हणजे "पृथ्वी" तत्वापासून बनलेला, आणि त्यामुळे त्याचे "विसर्जन" [सर्जन किंवा सृजन म्हणजे नवनिर्मिती] आणि हे ओघाने आलेच. कारण या "पार्थिव" सृष्टीत चिरंतन असे काहीही नाही...हो अगदी देव सुद्धा...."देव" हे फक्त परमेश्वराच्या "व्यक्त" स्वरूपाचे एक प्रतिक आहे. तो व्यक्त झाला की सृष्टी आणि अव्यक्त अवस्थेत तो असतो, "ते ब्रह्म".....मग आपण हे लक्षात ठेवायचे की मलाही कधीतरी जायचेच आहे. मग मला काहीतरी चांगले कार्य करून जायलाच हवे. ही आठवण करून देण्यासाठीच हे सारे काही करायचे.... बरं मूलाधार चक्रातील गणेशाबद्दल बोलायचे तर "मुल आधार" म्हणजे हे चक्र आपल्या शरीराचा, जीवनाचा मुल आधार आहे. आणि "गणेश" किंवा "गण" "पती" हा शरीरातील सर्व कार्यकारी "गणांचा" पती आहे. आपले सारे संस्कार या मूलाधार चक्रात सुप्त अवस्थेत असतात. आणि येथील "गणपती" या जन्मातील आपण घेऊन आलेल्या प्रारब्धाप्रमाणे, तसेच आपण या जन्मात करीत असलेल्या बरया वाईट कर्मान प्रमाणे आपले बोलणे, वागणे, चालणे.....या जन्मातील आपल्या साऱ्या कृतींचे संचालन करत असतो.

आपण बोलत असलेले शब्दही येथेच सुप्त रुपात असतात. म्हणूनच श्री गणेशांची उपासना करताना मूलाधार चक्रावर लक्ष देऊन, पृथ्वी मुद्रा करून "गम" बीज असलेले, तसेच इतरही गणेश मंत्र, स्तोत्रे, श्लोक म्हणावयाचे असतात. त्यावेळेस समृद्धी मिळण्यासाठी "हिरव्या" रंगाच्या, पचन, आरोग्य, संपत्ती यासाठी "पिवळ्या" रंगाच्या, मनाला शक्ती मिळण्यासाठी "केशरी" रंगाच्या आणि मोक्ष प्राप्ती हेतू असेल तर "पांढऱ्या" गणेशाच्या पार्थिव, लाकडी अथवा धातूच्या मूर्तीचे पूजन करावे. हे गणपतीचे बाह्यरूप झाले. एकाग्रता साधणे हे खूप महत्वाचे आहे. असे म्हणतात की "भृशुंडी" ऋषीन्ना सतत गणपतीचे ध्यान करून नाकाजवळ किंवा भुवयांच्या मधून छोटी "सोंड" आली होती. म्हणूनच त्यांचे नाव "भृ" "शुंडी" असे पडले. उजव्या सोंडेचा गणपती हा "कडक", त्याचे फार सोवळ्यात करावे लागते असे नसून त्याचे कारण हे आहे की त्या उलट्या सोंडेकडे बघताना आपल्याला हे जाणवते की त्यापेक्षा आपल्याला डाव्या सोंडेच्या गणपतीकडे बघताना जास्त आनंद होतो. उल्हसित वाटते. तर त्याचे कारण मेंदू विज्ञानात आहे. आणि उजव्या सोंडेचा म्हणजेच अपसव्य दिशेने अथवा Anti -Clock Wise सोंड जाणारा असल्याने म्हणजेच जीवनाच्या उलट्या दिशेने जाणारा असल्याने फक्त "सन्याशांनी" म्हणजेच ज्यांनी जीवनाच्या उलट्या दिशेने प्रवास सुरु केला आहे त्यांनीच "उजव्या" सोंडेच्या गणेशाचे पूजन करावे असा संकेत किंवा दंडक आहे. सांसारिक माणसाने त्याचे पूजन केल्यास त्याचा संसार उध्वस्त होतो. सोवळे पाळले नाही म्हणून नाही. हे नीट समजून घेणे आवश्यक आहे. इथे हिटलरचे उदाहरण अनाठायी ठरणार नाही. त्याने "आर्य" संस्कृतीचे प्रतिक म्हणून "स्वस्तिक" वापरले, पण उलटे....आणि त्याचा परिणाम आपल्याला माहित आहे. स्वस्तिक हे असे शक्तिशाली प्रतिक आहे की त्यातून "१ लाख" बोवीस एव्हढी उर्जा प्रती सेकंद बाहेर पडत असते. बोवीस हे अश्या प्रकारच्या मंत्र आणि यंत्रांच्या उर्जा मापनासाठी वापरले जाणारे "एकक" अथवा "युनिट" आहे. चला तर मग आपण डोळसपणे गणेशपूजन करायला शिकू या. नाहीतर ते नुसते आरत्या ओवाळणे आणि झांजा बडवणे एव्हढ्या पुरतेच सीमित राहील आणि गणपती बाप्पा अर्थात तुमच्यातीलच शक्ती, भक्ती, युक्ती हे सारे या गोंधळापासून दूरच राहणे पसंत करतील.....

तुळस

म्हणजे हायड्रोजन. पाण्यातील एलेक्ट्रोंस आणि प्रोतोंस त्यांच्या भार स्वरूपात विहरू लागल्यावर त्यांना आयन असेच म्हंटले जाते.} कफ वाढत असल्याने तुळशीचे तीर्थ किंवा रस वापरणे उपयुक्त असल्याने वैदिक धर्मात धर्माच्या माध्यमातून या गोष्टी अगदी सामान्यातील सामान्य माणसापर्यंत पोहोचविल्या गेल्या, ज्या अगदी स्वस्त किंवा बिनपैशाच्या आहेत.
तुळस [ भाग२]
वेंकटेश्वरा विद्यापीठ आणि इतर काही संशोधकांच्या अभ्यासानुसार तुलस हीच एक वनस्पति अशी आहे की जी "ओझोन" [O३] बाहेर टाकते. सध्या म्हंटल्या जाणार्या ग्रीन हाउस इफेक्ट नुसार पृथ्वीवर आलेल्या सूर्य प्रकाशातील थर्मल इन्फ्रारेड किरण वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात येथील भयानक प्रदूषणामुळे धरून ठेवले गेल्याने पृथ्वीचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आणि त्यामुळे बर्फ़ाच्छादित पर्वतावरील बर्फ वितळून हे पाणी समुद्रात मिसळून समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आणि फ्रीज सारख्या उपकरणांमुळे अर्थात त्यात वापरल्या गेलेल्या CFC सारख्या रसायनांमुळे वातावरणाच्या वरील ओझोनचा थरही विरळ होत चालला आहे. आणि या निर्माण झालेल्या मोठ्या जागेतून सूर्य प्रकाश अजून तीव्रतेने पृथ्वीवर येतो आहे. आपण अंगावर जे Body स्प्रे मारतो त्यामुळे शरीराभोवतीचा ओझोन कमी होतो. या सर्वांवर बिन खर्चिक आणि सोपा उपाय म्हणजे तुळस लावणे होय.

तुळशीला सकाळी माय भगिनी पाण्याचे अर्घ्य देऊन नमस्कार करून प्रदक्षिणा करतात. त्यामुळे पाण्यातून परावर्तीत झालेल्या सूर्यप्रकाशातील ७ रंग त्या स्त्रीच्या शरीरावर पडून तिला त्याचा फायदा होतो. तसेच तुळशीच्या वासाने मन प्रफुल्लीत होते. हवा तुळशीने शुद्ध तर झालेलीच असते. त्याचाही लाभ होतो. प्र+ दक्षिणेचा सुद्धा लाभ होतो. प्र म्हणजे पुढे जाणे आणि दक्षिणा म्हणजे आपल्या उजव्या बाजूने. सारे सौर मंडळ, ग्रह, तारे, आकाशगंगा, अणु, रेणू सारे सारे फिरत आहेत. त्यामुळे जगाची निर्मिती, स्थिती आणि पोषण चालू आहे. तर मग आपणही जर आपल्याला पूज्य असलेल्या देव, गुरु किंवा वनस्पती आणि प्रतीकाभोवती जर फिरलो म्हणजेच प्रदक्षिणा केली तर आपलेही जीवन सुलभ, आनंदी आणि सुखमय होईल. ग्रहणकाळामध्ये अन्न आणि पाणी दुषित होऊ नये म्हणून त्यावर तुळशीची पाने ठेवतात. मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजल आणि तुळस घालतात.....दोन्हीही जंतुघ्न असल्याने... तुळशीतून उडणारे यलो ओईल हे हवा शुद्धही करते आणि डासांना पळवून सुद्धा लावते.
इथे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की खूप पूर्वी माझ्या एक गोष्ट वाचनात आली होती ती म्हणजे पुण्याजवळील NCL Laboratory ला तुळशीच्या पानात "सोन्याचा" अंश आढळून आला होता. कदाचित त्यामुळेच रुक्मिणीने श्रीकृष्णाची सुवर्णतुला करताना तुळशीचे एक पान सोन्याच्या पारड्यात टाकले असावे.
तुलस [भाग ३]
आता तुळशीचे काही व्यावहारिक उपयोग पाहू.
तुळस ही हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलायटीस, दमा अशा अनेक रोगांवर गुणकारी आहे. आयुर्वेदाप्रमाणे तुळस ही कफहर, थंडीतापात ज्वरहर, अरुची, जंत, विष, कुष्ठ, मळमळ यांचा नाश करणारी पण उष्ण आणि पित्तकारक आहे. तुळशीची पाने दातांखाली धरल्यास रक्त येणे थांबून हिरड्यांची सूज कमी होते. विड्याच्या म्हणजे नागवेलीच्या पानासारखे श्रीलंकेत तुळशीचे पान कात, सुपारी घालून खातात, त्याने तोंडाचे, घशाचे विकार होत नाहीत. मूत्ररोग, पुरुषांचे रोग, उष्णतेचे विकार यामध्ये तुळशीचे बी अत्यंत उपयोगी आहे. पुरुषाच्या काही विकारात तुळशीचे मूळ देखील अत्यंत उपयुक्त आहे. तुळशीचे बी वापरताना साधारणपणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून टाकून हे बुळबुळीत झालेले बी दुधात साखरे सहित मिसळून घेतल्याने उष्णतेचे विकार बरे होतात. स्त्रियांच्या विकाराताही तुळशीचे अनेक उपयोग आहेत. गरम पाण्यात लिंबाचा रस, अथवा आल्याचा रस, मुठभर तुळशीची पाने आणि मुठभर पुदिन्याची पाने या सर्वांची वाफ चेहरयावर घेतल्यास चेहऱ्यावरील वांग, काळे डाग वगैरे जाण्यास मदत होते. अगदी महत्वाचे म्हणजे तुळशीच्या मूळ आणि खोडाच्या उगाळून केलेल्या लेपाच्या गंधाने लेपण कपाळावर केल्यास जेनेटिक रोग [शरीरातील गुणसूत्रांमध्ये विचित्र बदल होऊन होणारे रोग], आनुवंशिक रोग बरे होऊ शकतात. योग्य वैद्य किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्यास खूप उपयोग होऊ शकतो. कोठेही विश्वास हा महत्वाचा आहे. तुळशीचे शेकडो उपयोग आहेत. ते या छोट्याश्या लेखात देणे शक्य नाही आणि तो लेखाचा हेतूही नाही. माझ्या प्रत्येक लेखात त्या त्या गोष्टीबद्दल प्रचलित नसलेली आणि विज्ञानाचा पाया असलेली माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.
अखेरीस एक सांगावेसे वाटते की तुळस ही फक्त एक वनस्पती नसून एक संस्कृती आहे. कधी तणावात असाल, कंटाळले असाल तर तुळशीचा वास घेऊन बघा ...कसे शांत, तणावरहित वाटते ते!!!! तुळशीच्या वासानेच एक प्रकारची पवित्र, मंगल अशी आध्यात्मिक अनुभूती येते. म्हणून मित्रांनो घराजवळ एक तरी तुळशीचे रोप लावाच आणि देशसेवा, समाजसेवा, विश्व्सेवा आणि निसर्गसेवा करा. छातीवर बिल्ला लावून आणि दारावर समाजसेवक अशी पाटी लावूनच फक्त समाजसेवा होत नसते. ती अशा छोट्या छोट्या गोष्टतूनही पुढे जाते.
आपण आपल्या धार्मिक परंपरा, चालीरीती, सण, उत्सव, कर्मकांड या सारयांकडे स्वच्छ, निर्मल आणि तरीही सजगतेने पहायला शिकू या. आणि या भारतमातेचा, वैदिक धर्माचा झेंडा सारया विश्वात मोठ्या विश्वासाने, डौलाने फड्कावूया.... चला मित्र, मैत्रिणींनो, बंधुंनो, भगिनींनो चला.....स्वत:च्या परंपरांकडे उपहासाने बघण्याचा दृष्टीकोन टाकून जग बदलूया........ मी केव्हाच त्या वाटेवर निघालोय....तुम्ही?
Dr हेमंत उर्फ कलादास.......

कडू साखर


मित्रांनो,
ऊस आणि ऊसापासून बनवली जाणारी साखर ही आपल्या जिभेवर गोड चवीची पेरणी करतात.
मात्र काही दिवसांपासून ह्या उस, हमीभाव साखरकारखाने आणि सरकारी धोरण ईत्यादी बातम्यांमूळे सर्वाँचेच तोँड कडू होऊ घातले आहे.
सोमवारपासून उसाला पहिला हप्ता 2350
रुपये मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनापुढे
न झुकण्याच्या राज्य
... सरकारच्या निर्णयानंतर
आता साखर
कारखानदारांनीही आक्रमक
भूमिका घेतली आहे.
जोवर आंदोलन
मिटत नाही तोवर कारखानेच सुरू न
करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यामुळे
राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात ऊस
शिल्लक राहण्याची भीती व्यक्त होत आहे. गळीत हंगाम सुरू होऊन महिना लोटल्यानंतरही 165 पैकी केवळ 32 कारखाने सुरू झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्माच ऊस गाळप झाला आहे. अशीच
परिस्थिती राहिली तर शेतातच ऊस पेटवून देण्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ येऊ
शकते.
उसाला पहिला हप्ता 2350 रुपये द्यावा नाहीतर ऊस उचलू देणार नाही,
अशी भूमिका घेत खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. त्यात
आता शिवसेना व अन्य
संघटनाही सहभागी झाल्या आहेत.कालच मनसेनेही जाहीर पाठिँबा दर्शवला आहे,
आज दरवाढीचा निर्णय न
झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे.
मात्र राज्य सरकार मं
केंद्राच्या‘एफआरपी’प्रमाणेच उसाला दर देण्याच्या आठमूठी निर्णयावर अडून बसलेले आहे
एफआरपी प्रमाणे 9 टक्के
उतारा असलेल्या उसाला प्रतिटन 1450
रुपये दर निश्चित
झाला असला तरी राज्यातील
उसाला सरासरी 12 ते 13 टक्के
उतारा आहे. त्यामुळे मिळणारा भाव
गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे.
ह्या 12टक्के उतार्याच्या ऊसाला 2000रू भाव देणे अगदी रास्त आहे.
उत्तर प्रदेशात मायावतीने उसाला 2500रू भाव जाहीर केला आहे.
शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्या लवादाने ऊस तोडणी कामगारांना वाढती महागाई लक्षात घेता 70टक्के भाववाढ मंजूर केली आहे.

गेल्या वर्षीपासून पेट्रोलची दरवाढ, वाढलेली महागाई, रासायनिक खतांच्या किँमतीत झालेली दुपटीने वाढ आणि उस तोडणी कामगारांच्या मजूरीत वर उल्लेखलेली वाढ लक्षात घेता 2350रु चा भाव ही शेतकऱ्‍यांची मागणी अगदी रास्तच म्हणायला हवी.
काल शेतकरी संघटना 2200रु प्रति टन ईतकी खाली येवूनसूद्धा तोडगा निघाला नाही हे शेतकऱ्‍यांचे दुर्दैवच म्हणायचे.

माहीती अधीकार

मित्रांनो,
माहीतीचा अधीकार आल्यापासून अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली आहेत.
काही मित्रांच्या आग्रहाखातर ह्या कायद्या विषयक त्रोटक माहीती देत आहे.
महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट २००३ मध्ये
माहितीचा अधिकाराचा स्वत:चा कायदा होता.
१२ ऑक्टोबर २००५ पासून
... माहितीचा अधिकार जम्मू आणि काश्मीर वगळता देशभरात लागू झाला.
माहितीचा अधिकार अधिनियम - २००५
च्या तरतुदींच्या अधीन राहून तुम्हांला माहिती मागण्याचा अधिकार
प्राप्त झालेला आहे.
माहिती अधिकाराच्या अंतर्गत राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांत
सहाय्यक माहिती अधिकारी,
माहिती अधिकारी, व अपील अधिकारी,
यांच्या नेमणुका करण्याचे आदेश देण्यात
आलेले आहेत.
माहितीचा ह्या संज्ञेचा इथे असा अर्थ घेण्यात येतो की ते कोणत्याही स्वरूपातील
कोणतेही साहित्य असा असून त्यामध्ये,
अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने, ई-मेल,
अभिप्राय, सूचना, प्रसिध्दीपत्रके,
परिपत्रके, आदेश, रोजवह्या(डायरी), संविधा,
अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने(मॉडेल), कोणत्याही इलेक्ट्रॉनिक
स्वरूपातील आधारसामग्री, फायलींवरचे
अधिकार्यांचे अथवा मंत्र्यांचे अभिप्राय यांचा समावेश होतो
ही माहीती अंमलात असलेल्या अन्य
कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक
प्राधिकरणाकडून मिळविता येईल.
केँद्र सरकारच्या अखत्यारीतील माहीती पोस्ट ऑफिसात तर राज्य सरकारच्या अखत्यारीतील माहीती संबंधीत विभागात नियूक्त केलेल्या सहायक माहीती अधीकार्याकडे अर्ज देऊन मागवता येते
ह्या सहायक अधीकार्याला पाच दिवसात हा अर्ज माहीती अधीकाऱ्‍याकडे पाठवणे बंधनकारक असते
माहीती अधीकारी आपल्याला
हवी असलेली माहीती संबंधीत खात्याकडून ३०दिवसांच्या आता देतो
जर प्रश्ना संबंधीत माहीती त्या संबंधीत अधीकारी द्यायला विलंब करीत असेल तर २५०रु प्रतिदिन असा दंड त्याला माहीती आयुक्त करु शकतो
जर त्या अधीकार्याने चुकीची माहीती दिली अथवा योग्य कारणा शिवाय माहीती द्यायला नकार दिला तर २५०००रु दंड त्याच्या पगारातून कापण्यात येईल
समाधानकारक माहीती न मिळाल्यास अथवा माहीती देण्यास नकार मिळाल्यास त्यावर अपील करता येते

माहीतीच्या अधीकाराखाली माहीती मिळवण्यासाठी अगदी साधा अर्ज करता येतो केँद्र सरकारकडून माहीती मिळवण्या करीता १०रू अशी नाममात्र फी द्यावी लागते
मित्रांनो अधीक माहीती करता कृपया ईथे क्लीक कराhttp://hi.m.wikipedia.org/wiki/सूचना_का_अधिकार_अधिनियम,_२००५
किँवा माहीती अधिकार असे लिहून गुगल आणि विकीपीडीयामधे सर्च करा
माहीतीचा अधिकाराविषयक अधीकृत सरकारी माहीती PDF स्वरूपात vichara.com इथून डाऊनलोड करता येईल.

Sunday, November 20, 2011

हिंदू धर्म

हिंदू धर्माचे मूळ नाव आहे "आर्य सनातन वैदिक संस्कृती"...

१] आर्य- अर म्हणजे चिरणे, फाडणे ...संकटांना अडचणींना चिरत पुढे जाणारे....प्रगती करणारे....फक्त गोरे दिसणारे, निळ्या घार्या डोळ्याचे लोक म्हणजे आर्य हा समज खोटा आहे. राम आणि कृष्ण हे काळे सावळे होते हे सर्वांनाच माहित आहे. आर्य असणे ही एक उच्च मानसिक, बौद्धिक, भावनिक, वैद्न्यानिक आणि अध्यात्मिक ...अवस्था आहे. कोणता वंश नव्हे...

२] सनातन- स: नूतन:....नित्य नूतन असणारा किंवा असणारे....हिंदू धर्म हा नित्य नवा आहे...खुळचट जुन्या समजुतींना कवटाळून बसणारा नव्हे...किंवा "सनातन" याचा अर्थ भस्माचे पट्टे ओढून जपाच्या माळा ओढत बसणे, लांब हो लांब हो ....शिवू नको असे म्हणणे मुळीच नव्हे हे पक्के लक्षात घेणे आवश्यक आहे. जसा कालचा सागर कालच्या प्रियकर प्रेयसीन्साठी आणि आजच्याही जोडप्यांसाठी "नवाच" असतो तसा काला प्रमाणे बदलणारा हिंदू धर्म हा "सनातन" म्हणजे सतत नवाच असतो....

३] वैदिक- "विद" या संस्कृत धातूचा अर्थ आहे " आतून, हृदयातून" जाणणे .....म्हणजे कसे? तर ...जर का मी तुम्हाला तासभर "आंबा" विषयावर व्याख्यान दिले तरी तुम्हाला आंबा पाहिला नसेल तर अंबा म्हणजे काय ते यथार्थपणे कळणार नाही. पण ज्या वेळेस तुम्ही आंबा कापून जिभेवर टाकणार त्यावेळेस तुम्हाला कळणार की आंबा काय चीज आहे ते....हे जे आतून कळणे आहे त्याला "विद" म्हंटले आहे. याच "विद" धातू पासून वेद हा शब्द बनला आहे. हेच वैदिक जे दक्षिणेत रहात होते त्यांनी स्वत:ला "द्रु विद" म्हणजे कोणतीही गोष्ट "द्रुत गतीने" "जाणणारे" ही पदवी लावून घेतली. याचाच अपभ्रंश होऊन "द्रविड" झाले. आजही जुन्या इंग्लिश डिक्शनरी मध्ये "Druid " हा शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे "जुने जाणते लोक"... द्रविड या शब्दाचे पुढील रूपांतरण आणि त्याचे संदर्भ हे वादाला तोंड फोडतील असे असतील असे मला वाटते आहे...त्यामुळे ज्यांना जिज्ञासा असेल त्यांना मी वैयक्तिक चर्चेत सांगू शकेन....

४] संस्कृती- प्रकृती ही मूळ आहे. प्रकृती म्हणजे जे जसे आहे तसे....कोणत्याही गोष्टीचे मूळ रूप, निसर्ग अथवा सृष्टी....त्यात बदल केला अथवा झाला की त्याला संस्कृती किंवा विकृती म्हंटले जाते. चांगला बदल- संस्कृती आणि वाईट बदल- विकृती. नुसते पाणी ही प्रकृती, गटार ही विकृती आणि तीर्थ ही संस्कृती...

तसेच माझ्याजवळ समजा २ पोळ्या आहेत आणि दुसऱ्याकडेही २ पोळ्या आहेत, तर प्रत्येकाने आपापल्या पोळ्या खाणे ही प्रकृती, दुसरयाच्या हिसकावून घेणे ही विकृती आणि आपल्याही पोळ्या त्याच्या गरजेनुसार दुसर्याला देणे ही संस्कृती....आणि नेमकी हीच संस्कृती दैत्य, दानव आणि असुरांकडे नव्हती....

वर म्हंटल्याप्रमाणे सप्तर्षीनची अधिक माहिती, मानवाचे पृथ्वीवर आगमन, दत्त गुरु म्हणजे कोण आणि कुठून आले याबद्दल जाणून घेऊ या ....सध्या ऋषी संस्कृतीला वंदन करून इथेच थांबतो....

!! इति लेखन सीमा !!

Dr हेमंत उर्फ कलादास......

‎'मेरी झांशी नही दुंगी'

‎'मेरी झांशी नही दुंगी', हे
ईतिहासप्रसीद्ध उद्गार प्रत्येक
भारतीयाच्या मनावर कोरले गेले आहेत.
हे अजरामर उद्गार
काढणारी रणरागिणी म्हणजे
राणी लक्ष्मीबाई.
वास्तवीक झांशी हे संस्थान तसे आकाराने
आणि सामर्थ्याने अगदी लहानच होते. पण
आपल्या असामान्य शौर्याने
ह्या झांशीच्या राज्याला हिँदुस्थानच्या ईतिहासात
अगदी मानाचे स्थान ह्या तितक्याच
अलौकीक राणीने मिळवून दिलेले आहे.
आधी पुत्रवियोग आणि त्यानंतर आलेले
वैधव्य ह्या प्रचंड आघातांतून
स्वतःला सावरून आपल्या राज्यातील
प्रजेवर पुत्रवत प्रेम
करणारी ही स्त्री म्हणजे अखिल
नारीजातीचे भुषणच आहे.
ईँग्रजांनी खालसा केलेले झांशीचे संस्थान
आपल्या पराक्रमाने पुन्हा जिँकून
राणी लक्ष्मीबाईने
आपल्या युद्धकौशल्याचा डंका हिँदूस्तानभर
मिरवलाच होता.
ईतर संस्थाने ईँग्रजांपूढे लिलया शरण जात
असताना कित्येक महीने
राणी लक्ष्मीबाईने
वेढा घालणाऱ्या प्रंचड
ईँग्रजी सैन्याला झुंजवत ठेवले होते.
केवळ विश्वासघात आणि फितूरी करूनच
ईँग्रजांना झांशीत शिरकाव करून
घेता आला.
युद्धाचे पारडे पुर्णपणे ईंग्रजांच्या बाजूने
झुकलेले असतानाही आपल्या 12
वर्षाँच्या दत्तक पुत्राला पाठीशी बांधून
ह्या रणचंडीकेने स्वतः युद्धसमरात
उडी घेतली.
आपल्या विजेप्रमाणे
तळपणाऱ्या समशेरीच्या एकाच घावात
शत्रुचे मुंडके धडावेगळे
करण्याचा सपाटाचा ह्या रणदुर्गेने
लावला होता.
राणी लक्ष्मीबाईचा नेहमीचा घोडा तीच्यासोबत
नव्हता. वाटेतला ओढा पाहून ते नवखे
जनावर बीचकले
आणि राणीला ईँग्रजांनी घेरले.
त्यावेळीही पुरुषवेश धारण
केलेल्या ह्या स्त्रीयोद्ध्याने
असा काही लढा दिला आणि शत्रूला यमसदनास
धाडण्याचा धडाका लावला की शत्रू
सैनीकही अचंबीत झाले.
ह्या पराक्रमी योद्ध्यास त्या लढाईत
प्राणांतीक जखमा झाल्या.
राणी लक्ष्मीबाईने उपचार घेण्यास नकार
दिला आणि ही स्वातंत्राची धगधगणारी अग्नीशिखा,
ही तेजस्वी समरज्योत मालवली.
ह्या स्त्रीजातीला ललामभूत
ठरलेल्या झाँशीच्या राणीची आज
जयंती आहे.
त्या धगधगत्या, नित्य प्रेरणादायी,
पराक्रमी महाराणीच्या स्मृतीला मनःपुर्वक
अभीवादन.