आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Monday, November 28, 2011

श्री सद्गुरू महिमा

साधारणत: खरे गुरु शिष्याकडे काहीच मागत माहीत. गुरुच्या ज्ञानाबरोबरच त्याची त्याच्या शिष्याला ते देण्याची इच्छा जास्त महत्वाची आहे. शंकर महाराजांसारखे सिद्ध पुरुष सिगारेट ओढत, गजानन महाराज चिलीम ओढत.....मग ते वाईट होते का? नाही...आयुर्वेद आणि वेद असे सांगतात की दोष आहे म्हणून जन्म आहे. आपण सगळे हो सगळे अगदी माझ्यासहित दोषयुक्त आहोत म्ह...णूनच आपल्याला जन्म. चांगल्या वाईट गोष्टी प्रत्येकात असतात. चांगल्या गोष्टींचा जास्त आविष्कार जो करतो तो चांगला माणूस आणि वाईट गोष्टींचा जास्त आविष्कार करतो तो वाईट माणूस.

एखाद्या व्यक्तीचे तन आणि मन अतिशुद्ध झाले की तो देहात रहात नाही. त्यांचा देह आपोआप सुटतो. म्हणून मग कार्य करता यावे म्हणून शंकर महाराज, गजानन महाराज हे वरील गोष्टी करत होते. त्या गोष्टींचा दुसरा फायदा हा की यामुळे जी निंदा होते त्यामुळे कर्म करताना होणारे, किंवा भक्तांचे ओढवून घेतलेले दु:ख या निन्देने नष्ट होण्यास मदत होते. आपली भक्ती खरी असेल तर सद्गुरू स्वत: भक्ताकडे येतात हे अगदी खरे आहे. ज्याला पोहता येत नाही त्याला गुरु करावाच लागतो. त्यामुळे "भक्तीमार्गात" तर गुरूची किंवा सद्गुरूंची सर्वात जास्त आवश्यकता. कारण भक्तीमार्गात साधारणत: सामान्य माणूसच असतो. राजयोग, ज्ञानयोग या मोठ्या लोकांच्या गोष्टी. तसेच खरे तर गुरु हा प्रत्येकाच्या पात्रते प्रमाणे आणि त्याच्या Wavelength शी जुळणार्या Wavelength चा मंत्रच किंवा उपासनाच त्या त्या भक्ताला किंवा शिष्याला देत असतात. पारनेरकर महाराजांचे उदाहरण याबाबतीत देता येईल. हे झाले देवच हवा असलेल्या भक्तांबाबत. पण सद्गुरुंकडे जाणारे बहुतेक भक्त हे "गौणी" भक्ती असलेले असतात. म्हणजेच त्यांना भक्तीच्या बदल्यात काहीतरी हवे असते. त्यामुळे मग गुरु त्या सगळ्यांना वेगवेगळे मंत्र न देता एकाच मंत्र देतात. की जो त्यांनी स्वत: सिद्ध केलेला आहे. आणि गुरुमुखातून आलेल्या त्या मंत्राचे सामर्थ्य काय वर्णावे? गुरुचरित्र सांगते ब्रह्मा म्हणतो की "गुरु" या शब्दातील "गु" कार म्हणजे सिद्धगण महिधामा! "र" फार भस्मरक्षा पापांची...! "उ"कार तो उत्तम पुरुष विष्णू जाण ! तिघांमेळी सत्यगुरुचे अधिष्ठान ! .....आणि पुढे म्हणतात रक्षी न कोणी गुरु कोपता... असो......माझ्या गुरुदेवता कलावती आई म्हणायच्या की Laundry मध्ये धुवायला मळलेले कपडेच जातात. तसे आपण सारे जण मनाने अतोनात मळलेले असल्याने सद्गुरुंकडे आपल्याला जायलाच हवे. त्या शिवाय योग्य मार्ग आपल्याला मिळणार तर नाहीच आणि आपला मी कोणीतरी विशेष आहे, किंवा "मी आहे" हा अहंकार नष्ट होणार नाही. मग साक्षीभावही येणार नाही. आणि साक्षी भाव येत नाही तो पर्यंत आपण या भयंकर मायेच्या कचाट्यातून सुटणार नाही. त्यामुळे सद्गुरू देवोभव ...आपल्याला लहानपणी चालायला शिकवणारी, बोट धरून लिहायला वाचायला शिकवणारी आई आपली पहिली गुरु. जगात वागायला शिकवणारे वडील आपले दुसरे गुरु. शाळेतील शिक्षक तिसरे गुरु...गुरूंची ही लिस्ट संपत नाही जन्मभर....हो...अगदी सिगारेट ओढायला, दारू प्यायला आणि गुटखा खायला शिकवणारे गुरूच....रस्त्यावर दुसर्या गाडीला धडकल्यावर "काय राव नीट चालवा ना गाडी" म्हणणारे गुरूच.....मग हे गुरु असल्यावर आपल्याला त्याचे महत्वही कळत नाही आणि वाईट गोष्टी शिकवणार्या गुरुंबद्दल रागही येत नाही. मग सद्गुरू तेव्हढेच का नकोत बरे? आई आपल्या बाळाला जन्म देण्यापूर्वी ९ महिने कधी होताहेत याची वाट बघते... पण सद्गुरूंनी एकदा तुमचे बोट धरले की मग ते तुमचे बोट जन्मोजन्मी सोडत नाहीत. बघा तर अनुभव घेऊन.....गुरूबिन कौन बतावे बाट? बडा बिकट यमघाट गुरूबिन......आज एव्हढेच मित्रांनो....

No comments:

Post a Comment