आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Monday, November 28, 2011

तुळस

म्हणजे हायड्रोजन. पाण्यातील एलेक्ट्रोंस आणि प्रोतोंस त्यांच्या भार स्वरूपात विहरू लागल्यावर त्यांना आयन असेच म्हंटले जाते.} कफ वाढत असल्याने तुळशीचे तीर्थ किंवा रस वापरणे उपयुक्त असल्याने वैदिक धर्मात धर्माच्या माध्यमातून या गोष्टी अगदी सामान्यातील सामान्य माणसापर्यंत पोहोचविल्या गेल्या, ज्या अगदी स्वस्त किंवा बिनपैशाच्या आहेत.
तुळस [ भाग२]
वेंकटेश्वरा विद्यापीठ आणि इतर काही संशोधकांच्या अभ्यासानुसार तुलस हीच एक वनस्पति अशी आहे की जी "ओझोन" [O३] बाहेर टाकते. सध्या म्हंटल्या जाणार्या ग्रीन हाउस इफेक्ट नुसार पृथ्वीवर आलेल्या सूर्य प्रकाशातील थर्मल इन्फ्रारेड किरण वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात येथील भयानक प्रदूषणामुळे धरून ठेवले गेल्याने पृथ्वीचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आणि त्यामुळे बर्फ़ाच्छादित पर्वतावरील बर्फ वितळून हे पाणी समुद्रात मिसळून समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आणि फ्रीज सारख्या उपकरणांमुळे अर्थात त्यात वापरल्या गेलेल्या CFC सारख्या रसायनांमुळे वातावरणाच्या वरील ओझोनचा थरही विरळ होत चालला आहे. आणि या निर्माण झालेल्या मोठ्या जागेतून सूर्य प्रकाश अजून तीव्रतेने पृथ्वीवर येतो आहे. आपण अंगावर जे Body स्प्रे मारतो त्यामुळे शरीराभोवतीचा ओझोन कमी होतो. या सर्वांवर बिन खर्चिक आणि सोपा उपाय म्हणजे तुळस लावणे होय.

तुळशीला सकाळी माय भगिनी पाण्याचे अर्घ्य देऊन नमस्कार करून प्रदक्षिणा करतात. त्यामुळे पाण्यातून परावर्तीत झालेल्या सूर्यप्रकाशातील ७ रंग त्या स्त्रीच्या शरीरावर पडून तिला त्याचा फायदा होतो. तसेच तुळशीच्या वासाने मन प्रफुल्लीत होते. हवा तुळशीने शुद्ध तर झालेलीच असते. त्याचाही लाभ होतो. प्र+ दक्षिणेचा सुद्धा लाभ होतो. प्र म्हणजे पुढे जाणे आणि दक्षिणा म्हणजे आपल्या उजव्या बाजूने. सारे सौर मंडळ, ग्रह, तारे, आकाशगंगा, अणु, रेणू सारे सारे फिरत आहेत. त्यामुळे जगाची निर्मिती, स्थिती आणि पोषण चालू आहे. तर मग आपणही जर आपल्याला पूज्य असलेल्या देव, गुरु किंवा वनस्पती आणि प्रतीकाभोवती जर फिरलो म्हणजेच प्रदक्षिणा केली तर आपलेही जीवन सुलभ, आनंदी आणि सुखमय होईल. ग्रहणकाळामध्ये अन्न आणि पाणी दुषित होऊ नये म्हणून त्यावर तुळशीची पाने ठेवतात. मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजल आणि तुळस घालतात.....दोन्हीही जंतुघ्न असल्याने... तुळशीतून उडणारे यलो ओईल हे हवा शुद्धही करते आणि डासांना पळवून सुद्धा लावते.
इथे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की खूप पूर्वी माझ्या एक गोष्ट वाचनात आली होती ती म्हणजे पुण्याजवळील NCL Laboratory ला तुळशीच्या पानात "सोन्याचा" अंश आढळून आला होता. कदाचित त्यामुळेच रुक्मिणीने श्रीकृष्णाची सुवर्णतुला करताना तुळशीचे एक पान सोन्याच्या पारड्यात टाकले असावे.
तुलस [भाग ३]
आता तुळशीचे काही व्यावहारिक उपयोग पाहू.
तुळस ही हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलायटीस, दमा अशा अनेक रोगांवर गुणकारी आहे. आयुर्वेदाप्रमाणे तुळस ही कफहर, थंडीतापात ज्वरहर, अरुची, जंत, विष, कुष्ठ, मळमळ यांचा नाश करणारी पण उष्ण आणि पित्तकारक आहे. तुळशीची पाने दातांखाली धरल्यास रक्त येणे थांबून हिरड्यांची सूज कमी होते. विड्याच्या म्हणजे नागवेलीच्या पानासारखे श्रीलंकेत तुळशीचे पान कात, सुपारी घालून खातात, त्याने तोंडाचे, घशाचे विकार होत नाहीत. मूत्ररोग, पुरुषांचे रोग, उष्णतेचे विकार यामध्ये तुळशीचे बी अत्यंत उपयोगी आहे. पुरुषाच्या काही विकारात तुळशीचे मूळ देखील अत्यंत उपयुक्त आहे. तुळशीचे बी वापरताना साधारणपणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून टाकून हे बुळबुळीत झालेले बी दुधात साखरे सहित मिसळून घेतल्याने उष्णतेचे विकार बरे होतात. स्त्रियांच्या विकाराताही तुळशीचे अनेक उपयोग आहेत. गरम पाण्यात लिंबाचा रस, अथवा आल्याचा रस, मुठभर तुळशीची पाने आणि मुठभर पुदिन्याची पाने या सर्वांची वाफ चेहरयावर घेतल्यास चेहऱ्यावरील वांग, काळे डाग वगैरे जाण्यास मदत होते. अगदी महत्वाचे म्हणजे तुळशीच्या मूळ आणि खोडाच्या उगाळून केलेल्या लेपाच्या गंधाने लेपण कपाळावर केल्यास जेनेटिक रोग [शरीरातील गुणसूत्रांमध्ये विचित्र बदल होऊन होणारे रोग], आनुवंशिक रोग बरे होऊ शकतात. योग्य वैद्य किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्यास खूप उपयोग होऊ शकतो. कोठेही विश्वास हा महत्वाचा आहे. तुळशीचे शेकडो उपयोग आहेत. ते या छोट्याश्या लेखात देणे शक्य नाही आणि तो लेखाचा हेतूही नाही. माझ्या प्रत्येक लेखात त्या त्या गोष्टीबद्दल प्रचलित नसलेली आणि विज्ञानाचा पाया असलेली माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.
अखेरीस एक सांगावेसे वाटते की तुळस ही फक्त एक वनस्पती नसून एक संस्कृती आहे. कधी तणावात असाल, कंटाळले असाल तर तुळशीचा वास घेऊन बघा ...कसे शांत, तणावरहित वाटते ते!!!! तुळशीच्या वासानेच एक प्रकारची पवित्र, मंगल अशी आध्यात्मिक अनुभूती येते. म्हणून मित्रांनो घराजवळ एक तरी तुळशीचे रोप लावाच आणि देशसेवा, समाजसेवा, विश्व्सेवा आणि निसर्गसेवा करा. छातीवर बिल्ला लावून आणि दारावर समाजसेवक अशी पाटी लावूनच फक्त समाजसेवा होत नसते. ती अशा छोट्या छोट्या गोष्टतूनही पुढे जाते.
आपण आपल्या धार्मिक परंपरा, चालीरीती, सण, उत्सव, कर्मकांड या सारयांकडे स्वच्छ, निर्मल आणि तरीही सजगतेने पहायला शिकू या. आणि या भारतमातेचा, वैदिक धर्माचा झेंडा सारया विश्वात मोठ्या विश्वासाने, डौलाने फड्कावूया.... चला मित्र, मैत्रिणींनो, बंधुंनो, भगिनींनो चला.....स्वत:च्या परंपरांकडे उपहासाने बघण्याचा दृष्टीकोन टाकून जग बदलूया........ मी केव्हाच त्या वाटेवर निघालोय....तुम्ही?
Dr हेमंत उर्फ कलादास.......

No comments:

Post a Comment