आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Sunday, November 20, 2011

हिंदू धर्म

हिंदू धर्माचे मूळ नाव आहे "आर्य सनातन वैदिक संस्कृती"...

१] आर्य- अर म्हणजे चिरणे, फाडणे ...संकटांना अडचणींना चिरत पुढे जाणारे....प्रगती करणारे....फक्त गोरे दिसणारे, निळ्या घार्या डोळ्याचे लोक म्हणजे आर्य हा समज खोटा आहे. राम आणि कृष्ण हे काळे सावळे होते हे सर्वांनाच माहित आहे. आर्य असणे ही एक उच्च मानसिक, बौद्धिक, भावनिक, वैद्न्यानिक आणि अध्यात्मिक ...अवस्था आहे. कोणता वंश नव्हे...

२] सनातन- स: नूतन:....नित्य नूतन असणारा किंवा असणारे....हिंदू धर्म हा नित्य नवा आहे...खुळचट जुन्या समजुतींना कवटाळून बसणारा नव्हे...किंवा "सनातन" याचा अर्थ भस्माचे पट्टे ओढून जपाच्या माळा ओढत बसणे, लांब हो लांब हो ....शिवू नको असे म्हणणे मुळीच नव्हे हे पक्के लक्षात घेणे आवश्यक आहे. जसा कालचा सागर कालच्या प्रियकर प्रेयसीन्साठी आणि आजच्याही जोडप्यांसाठी "नवाच" असतो तसा काला प्रमाणे बदलणारा हिंदू धर्म हा "सनातन" म्हणजे सतत नवाच असतो....

३] वैदिक- "विद" या संस्कृत धातूचा अर्थ आहे " आतून, हृदयातून" जाणणे .....म्हणजे कसे? तर ...जर का मी तुम्हाला तासभर "आंबा" विषयावर व्याख्यान दिले तरी तुम्हाला आंबा पाहिला नसेल तर अंबा म्हणजे काय ते यथार्थपणे कळणार नाही. पण ज्या वेळेस तुम्ही आंबा कापून जिभेवर टाकणार त्यावेळेस तुम्हाला कळणार की आंबा काय चीज आहे ते....हे जे आतून कळणे आहे त्याला "विद" म्हंटले आहे. याच "विद" धातू पासून वेद हा शब्द बनला आहे. हेच वैदिक जे दक्षिणेत रहात होते त्यांनी स्वत:ला "द्रु विद" म्हणजे कोणतीही गोष्ट "द्रुत गतीने" "जाणणारे" ही पदवी लावून घेतली. याचाच अपभ्रंश होऊन "द्रविड" झाले. आजही जुन्या इंग्लिश डिक्शनरी मध्ये "Druid " हा शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे "जुने जाणते लोक"... द्रविड या शब्दाचे पुढील रूपांतरण आणि त्याचे संदर्भ हे वादाला तोंड फोडतील असे असतील असे मला वाटते आहे...त्यामुळे ज्यांना जिज्ञासा असेल त्यांना मी वैयक्तिक चर्चेत सांगू शकेन....

४] संस्कृती- प्रकृती ही मूळ आहे. प्रकृती म्हणजे जे जसे आहे तसे....कोणत्याही गोष्टीचे मूळ रूप, निसर्ग अथवा सृष्टी....त्यात बदल केला अथवा झाला की त्याला संस्कृती किंवा विकृती म्हंटले जाते. चांगला बदल- संस्कृती आणि वाईट बदल- विकृती. नुसते पाणी ही प्रकृती, गटार ही विकृती आणि तीर्थ ही संस्कृती...

तसेच माझ्याजवळ समजा २ पोळ्या आहेत आणि दुसऱ्याकडेही २ पोळ्या आहेत, तर प्रत्येकाने आपापल्या पोळ्या खाणे ही प्रकृती, दुसरयाच्या हिसकावून घेणे ही विकृती आणि आपल्याही पोळ्या त्याच्या गरजेनुसार दुसर्याला देणे ही संस्कृती....आणि नेमकी हीच संस्कृती दैत्य, दानव आणि असुरांकडे नव्हती....

वर म्हंटल्याप्रमाणे सप्तर्षीनची अधिक माहिती, मानवाचे पृथ्वीवर आगमन, दत्त गुरु म्हणजे कोण आणि कुठून आले याबद्दल जाणून घेऊ या ....सध्या ऋषी संस्कृतीला वंदन करून इथेच थांबतो....

!! इति लेखन सीमा !!

Dr हेमंत उर्फ कलादास......

No comments:

Post a Comment