आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Monday, November 28, 2011

अमावास्या आणि पौर्णिमा

सूर्याभोवती फिरणार्या बर्याच ग्रहांना उपग्रह आहेत. तसाच चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तो पृथ्वीच्या खूप जवळ असल्याने त्याचा त्याच्या वरच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीवरच्या पाण्यावर आणि पाण्यावरच काय भूमीवरही खूप परिणाम होतो. चांद्रमास गणनेप्रमाणे भारती ओहोटी यांची वेळ बदलते यावरून आपण हे नक्की म्हणू शकतो. चंद्राच्या पृथ्वी च्या भोवती होत असलेल्या परिभ्रमणामुळे चान्द्र्मासाच्या ४ थ्या, ५ व्या, ८ व्या, ११ व्या, १४ व्या, १५ व्या, १९ व्या, २३ व्या, २९ व्या आणि ३० व्या दिवशी पृथ्वी आणि आपले शरीर चंद्राच्या अगदी समोर येते. यावेळी समुद्राच्या आणि शरीरातील पाण्याच्या पातळीत वाढ होते. आणि सध्या चालू असलेल्या संशोधना वरून हे नक्की दिसून आले आहे की अमावास्या पौर्णिमेला वेड्यांच्या [लुनातिक- वेडे आणि लुनार- चंद्र] वेडात वाढ होते.

 एपिलेप्सीचे झटके जास्त येतात. शरीरातील नुसते पाण्यात बदल होत नाहीत तर त्यातील क्षार, हार्मोन्स आणि विद्युत प्रवाह यातही फार मोठे बदल याच वरील काळात होत असतात. पालेभाज्यान मधेही खूप मोठ्या प्रमाणात पाणी आणि क्षार असतात. अमावास्या आणि पौर्णिमेला शारीरातील पाण्याचे प्रमाण वाढून उष्णतेचे प्रमाण घटते आणि त्यामुळे शरीरात वायू वाढून तो वायू डोक्यात शिरतो, माणूस मन:स्वास्थ्य गमावतो, शारीरिक स्वास्थ्य गमावतो आणि वेडेच काय चांगला माणूसही मग वेड्यासारखा वागू शकतो. म्हणूनच या वरील सर्व दिवशी पाणी कमी प्यावे. शक्यतो उपवास करावा. खाल्ले नाही तर तहानही कमी लागते आणि शरीरातील पचन व्यवस्थेलाही आराम मिळतो. त्या दिवशी खजूर, राजगिरा, दुध असा कमी खाऊन जास्त शक्ती देणारा आहार घेताला जातो. पूर्वी अनशन/उपोषण -अजिबात न खाणे, चांद्रायण, कृचछ चांद्रायण असे वेगवेगळे उपवास असत. "उपवास" म्हणजे च्या जवळ राहणे. हा "च्या" म्हणजे देव. मनाने त्याच्या जवळ राहणे अभिप्रेत आहे. सध्या खाल्या जाणार्या साबुदाण्याच्या खिचडीतील एकही पदार्थ भारतीय नाही. तरी खिचडी उपवासाला खाल्ली जाते. खिचडी खाऊन देव प्रसन्न होत असेल तर रोज खा...तो येऊन मिठी मारेल. मुळात साबुदाणा "Tapioka " नावाच्या एका परदेशी झाडा पासून बनवला जातो. त्याचा गार काढून सडवायला पसरून ठेवला जातो. तो पुरेसा चिकट झाला [की त्यात किडे वळवळायला लागतात.] की मग तो मेष मधून गाळून त्याच्या बारीक गोळ्या करून वाळवल्या जातात. हाच तो आपला पवित्र साबुदाणा की ज्याने देव प्रसन्न होतो. असो. तर उपवासाच्या दिवशी "लंघन" हे खरे तर अपेक्षित आहे. त्याउलट आपण खात असतो...केळी, रताळ्याचे काप, [गणपतीसाठी मोदक-तळलेले ]शेंगदाण्याची आमटी, वर्याचे तांदूळ, बटाट्याचे पापड, बटाट्याची उपासाची भाजी, खजूर, राजगिरा लाडू, काकडीची कोशिंबीर....आणि....जाऊ दे.... सगळ्या धर्माचीच खिचडी झालेय...तर पृथ्वीच्या कक्षेत किंवा वेगवेगळ्या ग्रहांवर पाठवली जाणारी "याने" देखील "एकादशी" किंवा या वरील दिवशीच पाठवली जातात. एकादशी सांसारिक कामांसाठी उपयुक्त मुळीच नाहीये. व्यवहारात उलट अपयशच येईल त्या दिवशी हे वरील सर्व दिवस फक्त आणि फक्त "उपासनेलाच" अनुकूल आहेत. उपासाच्या दिवशी केला जाणारा "फराळ" हा "फल आहाराचा" अपभ्रंश आहे. आपण "फळ आहार" सोडून बाकी सारे काही खातो. अमावास्येला अंधार असल्याने म्हणजेच प्रकाशाचा अडसर नसल्याने "उपासने मध्ये" केल्या जाणार्या मंत्रांचा आपल्या आकाश गंगेच्या केंद्राकडे जाण्याचा वेग हा जास्त असतो. आपली आकाशगंगा ही दोन बशा एकावर एक एकमेकींकडे तोंड करून ठेवल्या तर जसा आकार होईल तशी आहे. आणि त्याच्या मध्यातील मूळ नक्षत्रा मध्ये या आकाश गंगेचे केंद्र आहे. उपासना ही तेथे जाणे आवश्यक आहे. "प्रकाश" म्हणजे "पोकळीला आवरीत करत किंवा आवरण घालीत जाणे". मग हे असे आवरण घातल्यावर अडथळा येणारच ना? अमावास्येला चुंबकीय लहरी आणि प्रकाश लहरींचा अजिबात अडथळा नसल्याने आपली उपासना लवकर फलद्रूप होऊ शकते. आणि त्या दिवशी लंघन केल्या मुळे ढेकरा येणे, वायूचा त्रास होणे, जड वाटणे, झापड येणे अशा गोष्टी न होता साधनेत लास्ज लागते. आणि म्हणूनच दिवाळीत लक्ष्मी पूजन अमावास्येलाच असते. हिंदू संस्कृती म्हणूनच म्हणते....असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृतोर्मा अमृतमगमय.....आपल्याला असत्या कडून सत्याकडे जायचे आहे, अंधाराकडून प्रकाशाकडे जायचे आहे आणि मृत्यूकडून अमृत तत्वाकडे जायचे आहे. असो. आज इथेच थांबतो. पुन्हा भेटू.

1 comment:

  1. छान लेख. धन्यवाद. अशा संकल्पनांचा उलगडा करून सांगण्याचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे.

    ReplyDelete